माझे मत



माझे मत मी देतो माझ्या मनानेच मला
विचारलेल्या सार्‍या प्रश्नांच्या उत्तराला

माझे मत मी देतो माझ्या हृदयाचा ही
माझ्या नकळत ठाव सहजच घेणार्‍याला

माझे मत मी देतो माणसातच राहून
मनीचे माणूसपण त्याच्या जपणार्‍याला

माझे मत मी देतो लोटत दूर असत्यास
सत्याच्याच बाजूने उभा राहणार्‍याला

माझे मत मी देतो संस्कृती आणि सभ्यता
सदैव देशासाठी जपू पाहणार्‍याला

माझे मत मी देतो वर्षानुवर्षे माझ्या
विचारांवर नियंत्रण सहज ठेवणार्‍याला

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author