माझं पहिलं प्रेम

 



माझं पहिलं प्रेम

प्रेमात पडलो मी जेंव्हा

माझ्याही नकळ्त पहिल्यांदाच…

ती होती तेंव्हा गोरी-गोमटी

नाजूक अवघ्या दहा वर्षाचीच…

आजही आठविते ती मला

अगदी तेंव्हा होती तशीच…

व्यक्त केल नाही मी

तिच्यावरील माझं प्रेम कधीच…

ते अव्यक्त होत आणि आता

सदैव राहणार होत अव्यक्तच…

आज ती माझ्या जगात

आजू-बाजूला नव्ह्ती कोठेच…

माझ्या कवितेत ती होती

आणि कथेतही राहणार होतीच…

असूनही ती माझं पहिलं प्रेम

जगासाठी अनभिज्ञ होतीच…

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →