अतूट मैत्रीचे बंध
मनाचे धागे जुळताना..
मनमोकळ्या जीवांचे
मैत्रसौख्य फुलताना..
श्वासा समिप मैत्री
काळजात जपताना..
मैत्रीची हाक येताच
धावत जाताना..
आशा निराशेच्या
वादळी हरवताना..
मैत्रीनेच सावरले
जीवन जगताना…
सुवर्ण कोंदणात
हिरे जडवताना..
आयुष्य सुदर ते
मैत्री निभवताना.
Author
Post Views: 12