आठव्या शतकातील महान संस्कृत नाटककार भवभूति यांचे एक नाटक आहे. जे समाजातील नायक आणि हिंदू देवता म्हणून पूजनीय असलेल्या रामा च्या जीवनावर आधारित आहे.
हे भवभूती चे पहिले नाटक आहे. त्यांच्या नंतरच्या दोन नाटकांच्या तुलनेत पात्र आणि शैली प्रारंभिक स्तराची आहे. हे नाटक सात अंकात सजलेले आहे. बहुतेक आधुनिक विद्वान सहमत आहेत की भवभूतीने हे नाटक लिहिण्यास आरंभ केला पण ते पूर्ण होऊ शकले नाही. सुरुवातीपासून पाचव्या अंकातील ४६ व्या श्लोका पर्यंतची रचना भवभूतींनी केली असे परंपरा मानते.
या नाटकाच्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय अशा दोन आवृत्ती प्राप्त होतात. यातील उत्तर भारतीय आवृत्ती कवी विनायक याने तर दक्षिण भारतीय आवृत्ती सुब्रह्मण्यम यांनी पूर्ण केली असे मानले जाते अन्य काही आवृत्ती मात्र भवभूतीच्या शैलीशी मिळत्याजुळत्या नाहीत. तथापि उत्तर भारतीय आवृत्ती दक्षिण भारतीय आवृत्ती पेक्षा चांगली मानली जाते.
भवभूतींचे प्रेरणा रामायण असले तरी रामाच्या जीवनातील सर्वात प्राचीन कथा ,सीतेच्या हृदयातील प्रेमाची भावना, कैकयीने सर्व आरोपां पासून मुक्ती, सुंदर वेश धारण केलेली शूर्पणखा आणि रामाने वालीचा केलेला वध यासारख्या अनेक ठिकाणी त्याने रामायणाच्या कथानकात काही बदल आपल्या प्रतिभेने केले आहेत. मलयवनचे कथानक हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. रामायणात स्पष्ट आहे की वाली आणि सुग्रीव द्वंद्वयुद्धात असताना रामाने वालीचा एका गुप्त जागेवरून मारले. मात्र भवभूती ने वालीला खलनायक रावणाशी युती करत असल्याचे चित्रित केले आहे. आणि वाली निष्पक्ष युद्धात मारला आहे. अशाप्रकारे रामांच्या हातून वाली चा मृत्यू वैध ठरतो असे वर्णन करण्यात आले आहे.
रामाच्या पराक्रमी भाषणात वीर रस प्राधान्याने वर्णन केलेला आहे. परशुरामाच्या भाषणातील रौद्र आणि विभस्त रसाचे वर्णन आहे.
भवभूतींनी नाटकाच्या दोनशे श्लोकांमध्ये विविध वीस वृत्तांचा वापर केला आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून भवभूतीच्या जीवनाविषयी बरीच माहिती प्राप्त होते.
दोन अंक राम आणि परशुराम यांच्यातील संघर्षाला समर्पित आहेत. या दोघांच्या भेटीच्यावेळी झालेल्या संवादाचा विचार करता ते भवभूतीच्या अपरिपूर्णतेचे लक्षण मानले जाते.
प्रसंगांची सुसंगत रचना न करता पाठोपाठ घडणाऱ्या अनेक घटनांची केवळ सूची दिली आहे म्हणूनही भवभूतींवर टीका केली जाते.
विविध महान व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती चित्रण आणि कथेची नाविन्यपूर्ण पुनर्रचना, विविध नवीन संकल्पना आणि घटनांना प्रेरित करण्यासाठी भवभूतीची प्रशंसाही केली जाते.
महावीर भगवान रामचंद्रांच्या वीरश्रीयुक्त पराक्रमांचा आढावा घेणाऱ्या या नाटकात श्रीरामांच्या रावण वधापर्यंतच्या जीवनाचा पट उलगडून दाखविला असल्याने रामायणावर आधारित नाटकांमध्ये महावीर चरित्राचे स्वतःचे वेगळे स्थान आहे.
कु. सरिता सुरेश ढेंगळे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. द्वितीय वर्ष
दि. १२. ०५. २०२२
