मद्याला स्पर्श ना अद्याप केला करू मी काय गझलेच्या नशेला

प्रदीप निफाडकरांची गझल



मद्याला स्पर्श ना अद्याप केला
करू मी काय गझलेच्या नशेला

रसिक घर मित्र नाती अन चहाते
किती तुकड्यात मी वाटलेला

किती गोरा तुझा अंधार आहे
तुझा हेवाच वाटे पौर्णिमेला

कधी लिहिणार कविता चांगल्या मी
तुकोबाला कधी मिळणार चेला

कशाला नवस देवाला करू मी
मला माणूस आहे पावलेला

— प्रदीप निफाडकर

Author