कोटी कोटी उड्डाणे तुझी…………

खरे रूप माणसा तुझे

कोणते कळेना?

तूच नगरपालिकेतही तूच

तुझा सरकारी देखील बाणा……….



कोटी कोटी उड्डाणे तुझी…………

(संत महंतांची तसेच देवादिकांची क्षमा मागून हे विडंबन काव्य लिहिण्याचे धाडस करीत आहे तरी वाचकजन क्षमा करतील असे गृहीत धरतो.)

कोटी कोटी उड्डाणे तुझी

कोटी कोटी रुपये सारे

कुठे कुठे शोधू तुला

तुझे अनंत कोपरे……

बीज अंकुरे ज्या ठायी

तिथे तुझा वास

तुझा स्पर्श आणून देतो

खिशाला मिजास……….

चरा चरा रंगवीशी

रंग तुझा कोणता रे?

कोटी कोटी उड्डाणे तुझी

कोटी कोटी रुपये सारे……..

कधी दाह खड्ड्याचा तू

कधी रस्ता ओला

जनी निर्जनीहि तुझा

तुझा पाय रोवलेला………

तुझी खुण नाही ऐसा

गाव तरी कोणता रे?

कोटी कोटी उड्डाणे तुझी

कोटी कोटी रुपये सारे……….

खरे रूप माणसा तुझे

कोणते कळेना?

तूच नगरपालिकेतही तूच

तुझा सरकारी देखील बाणा……….

तुला आळवाया द्यावा

शब्द तरी कोणता रे?

कोटी कोटी उड्डाणे तुझी

कोटी कोटी रुपये सारे………….

…………………………….(मयुर तोंडवळकर)

(ह्यासोबत मूळ काव्यही येथे दिलेले आहे.)

कोटी कोटी रूपे तुझी

कोटी सूर्य चंद्र तारे

कुठे कुठे शोधू तुला

तुझे अनंत देव्हारे…….

बीज अंकुरे ज्या ठायी

तिथे तुझा वास

तुझा स्पर्श आणून देतो

फुलाला सुवास……….

चरा चरा रंगवीशी

रंग तुझा कोणता रे?

कोटी कोटी रूपे तुझी

कोटी सूर्य चंद्र तारे………..

कधी दाह ग्रीष्माचा तू

कधी मेघ ओला

जनी निर्जनीहि तुझा

तुझा पाय रोवलेला………

तुझी खुण नाही ऐसा

गाव तरी कोणता रे?

कोटी कोटी रूपे तुझी

कोटी सूर्य चंद्र तारे………..

खरे रूप देवा तुझे

कोणते कळेना

तूच विटेवरी तूच

वैकुंठीचा राणा……….

तुला आळवाया द्यावा

शब्द तरी कोणता रे?

कोटी कोटी रूपे तुझी

कोटी सूर्य चंद्र तारे………..

– श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author