साहित्य: -२५ ग्रॅम काजू, १०० ग्रॅम खजूर, २५ ग्रॅम लोणी, पाव चमचा लाल तिखट, ३५ ग्रॅम चीज, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे शेंगदाणे.
कृती : – काजू व शेंगदाण्याचे बारीक तुकडे करावेत. खजूर मध्यभागी चिरून त्यातील बिया काढून टाकाव्या. किसलेले चीज, लोणी, लाल तिखट, मीठ, काजू व दाण्याचा चुरा हे सर्व साहित्य एकत्र मिसळून खजुरामध्ये हे सारण भरावे. एक डिशमध्ये मांडून सर्व्ह करावे.
Author
Post Views: 24
