गांजलेल्यांची बहुरंगी दैना (अजाबळी )

उन,वारा,थंडी यांची नाही तमा

जन्मभर साथ देतो बहुतेकांना दमा

बालमजुरांचे नशिबी कुणा जीणे

खळगी भरण्या पोटाची रक्तही पडे उणे



पाण्याखाली माती असो वा मातीखाली पाणीपीडितांना चालावे लागे नेहमीच अनवाणीधनिकांना मिले सदा पुरण-पोळीनसे नशिबी गरिबांच्या साडी चोळी ||१|| पैसा जाई सदा पैशाकडे अन्नासाठी दारोदार गरिबांचे रोज साकडे दीनदलितांची सदा उपेक्षा चोरभामट्यांची नियमित रक्षा ||२||अर्धपोटी कुणी,नुसता उपाशीरस्त्यावर झोपतो कोणी भिंतीपाशीचंद्रमौळी झोपडीला महालाचे लेणेअसंख्य

बळी जाती असाध्य रोगाने ||३|| उन,वारा,थंडी यांची नाही तमा जन्मभर साथ देतो बहुतेकांना दमा बालमजुरांचे नशिबी कुणा जीणे खळगी भरण्या पोटाची रक्तही पडे उणे ||४||भ्रष्टाचारी पुढारी आश्वासने देतीगरजेच्या वस्तूंवर कर वाढविती’ विषमता नष्ट करू ‘ सांगे अभिमानेहप्तावसुली सदा करी दंडुक्याने रंजल्या गांजल्यांची बहुरंगी दैना ‘हाक’ पीडितांची देवही एकेन…!!! ||५||

* कविता * नरेंद्र श्रावणजी लोहबरे

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Author