आपण महाराष्ट्रात रहातो म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची माहिती असणारच. पण सगळी माहिती खरोखर आहे का? तपासून बघा खाली दिलेली सगळी माहिती आपल्याला आहे का?
- स्थापना : ०१ मे १९६०
- राज्यभाषा – मराठी
- एकूण तालुके – ३५३
- पंचायत समित्या – ३५१
- एकूण जिल्हा परिषदा – ३३
- आमदार विधानसभा – २८८
- आमदार विधानपरीषद – ७८
- महाराष्ट्र लोकसभा सदस्य – ४८
- सुमद्रकिनारा – ७२० किमी
- नगरपालिका – २३०
- महानगरपालिका – २६
- शहरी भाग – ४५%
- ग्रामीण भाग – ५५%
- लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
- क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
- संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग
- सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
- महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
- महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
- महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
- महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
- महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
- महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
- महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
- पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
- महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई
- जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
- भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई