दिशाच हरवली आहे





धुमसणार्‍या ज्वालामुखींतीललाव्हारस बाहेर पडायलावेळ का?आदळणार्‍या मेघखंडांतूनविद्युल्लतेच्या लखलखाटालाउशीर का?वेगाने येणार्‍या लाटाखडकावर फुटत आहेतओंजळीत निखारे धरल्यानेहात आता पोळलेले आहेतसूर्य विझल्यानेअंधारप्रकाशाला गिळतोयमहान प्रलयांतमाणूस ओळखायलाकठीण जातयंम्हणूनच आजवल्ह मारायलादिशा शोधतोयवल्ह मारायला दिशा शोधतोय

— भारती मेहता

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →