दारी मोगरा फुलला

गंध कोष ह्दयांतरी
ओंजळीत भेट घेतो..
प्रफुल्लित शुभ्र कळ्या
अंगणात सजवितो..

गुंज चाले रात्रंदिन
सखी गुपित जाणतो..
तुझे बोल ऐकून तो
गंध गुपित ठेवतो…

उमलत्या स्वप्नांचे ही
खुलवतो रंग नवे..
सांग सखी श्रृंगारास
सजायला काय हवे?..

सुकलेल्या फुलासही
तुझा स्पर्श अलवार..
बहरल्या सुगंधात
मन वाहे वारंवार…

ओठी माझ्या स्मितहास्य
क्षणोक्षणी हा खुलला..
मन माझे गंधाळले
दारी मोगरा फुलला.

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/



गंध कोष ह्दयांतरी
ओंजळीत भेट घेतो..
प्रफुल्लित शुभ्र कळ्या
अंगणात सजवितो..

गुंज चाले रात्रंदिन
सखी गुपित जाणतो..
तुझे बोल ऐकून तो
गंध गुपित ठेवतो…

उमलत्या स्वप्नांचे ही
खुलवतो रंग नवे..
सांग सखी श्रृंगारास
सजायला काय हवे?..

सुकलेल्या फुलासही
तुझा स्पर्श अलवार..
बहरल्या सुगंधात
मन वाहे वारंवार…

ओठी माझ्या स्मितहास्य
क्षणोक्षणी हा खुलला..
मन माझे गंधाळले
दारी मोगरा फुलला.

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Author