सिलेंडरच्या भाववाढीने
थंडीच्या या दिवसातही
लोकांची थंडी पळवली…
थंडीतही कित्येकांना
थंड पाण्याने आंघोळ घातली…
थंड जेवन गरम करून
खाण्याचीही पंचाईत केली…
पाहुण्यांनाही चहापाणी करण्याची
आता सोयच नाही ठेवली…
गृहिणींची रोजचीच ती
डोकेदुखी आणखी वाढवली…
मध्यमवर्गीय माणसाचीच पुन्हा
एकदा मुंडकी मुरगळली…
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Author
Post Views: 14