चरक संहिता

महर्षी चरक ज्यांचे समकालीन मानले जातात त्या कनिष्काचा काळ अनि‌‌श्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे . या विषयी तिन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे: इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ. स १२३ यापैकी शेवटच्या पर्यायाला विद्वानांचा सर्वात जास्त पाठिंबा मिळतो.



महर्षी चरक ज्यांचे समकालीन मानले जातात त्या कनिष्काचा काळ अनि‌‌श्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे . या विषयी तिन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे: इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ. स १२३ यापैकी शेवटच्या पर्यायाला विद्वानांचा सर्वात जास्त पाठिंबा मिळतो.

त्रिपिटक या बौद्ध ग्रंथाच्या चिनी भाषांतरात (इ.स. ४७७) आविष्काच्या राजवैद्यांचे नाव चरक असल्याचा उल्लेख आहे.
चरक हे नाव फार प्राचीन वेदकालीन आहे. चरक शब्दाचा भ्रमणशील असा व्युत्पत्त्यर्थ आहे. ललित विस्तार ग्रंथात हिंडणाय्रा संन्याशांना चरक संबंधिले आहे. कृष्ण यजुवैदाच्या एका शाखेच्या प्रवर्तक ऋषी चे नाव चरक आहे. बृहदारण्यक उपनिषदात ‘मद्रेषु चरका: पर्यव्रजाम ( आम्ही फिरत फिरत मद्र देशात गेलो) असा उल्लेख आहे ‘ चरक म्हणजे प्रायश्चित करणारे’ असा ही एक अर्थ होतो.

चरक संहिता : आयुर्वेद किंवा वैद्यक या विषयावर संस्कृत भाषेतील आद्य व मुख्य असा ग्रंथ या ग्रंथाची रचना इसवी सनापूर्वी प्रथम झाली असावी व नंतर त्यात भर पडत गेली असावी असे अनेक विद्वानांचे मत आहे. अग्निवेश, जातुकर्ण, भेड, पाराशर, हारित आणि क्षीरपाणि अशी त्यांचे नाव होते. अग्निवेशाने लिहिलेल्या ग्रंथास अग्निवेश – तंत्र असे म्हणतात. इसवी सनाच्या पहिल्या पहिल्या शतकाच्या शेवटास ही सहा ‘ तंत्रे ‘ उपलब्ध असावीत . हल्ली अग्निवेश- तंत्र व भेडसंहिता उपलब्ध आहेत. अग्निवेश- तंत्राचे पुन: संपादन कनिष्क राजाच्या राजवैद्य चरकांनी केले व म्हणून तो ग्रंथ चरक संहिता म्हणून ओळखले जाऊ लागले.

चरक या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि हजारो वर्षाच्या आपल्या इतिहासात या नावाच्या अनेक व्यक्ती ही आहेत. त्यामधून एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे आयुर्वेदातील चरकसंहिता या नावाने प्रसिद्ध असलेल्या महान ग्रंथाचे कर्ते . त्यांच्या या ग्रंथात उत्तर भारताच्या पश्चिमोत्तर प्रदेशाची वर्णने आढळतात . इ. स. पू. पहिल्या शतकाच्या सुमारास कनिष्क राजा होऊन गेले असावे . राजा कनिष्क व आर्य नागार्जुन समकालीन व्यक्ती असाव्यात असे अनेक विद्वान मानतात.

एका गुरूं वरून दुसऱ्या गुरूंकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चरक म्हणत असत. त्यासाठी विशिष्ट प्रायश्चित्त घेतले जाई. वैशंपायनशिष्य याज्ञवल्क्यांनी मात्र वैशंपायनाकरिता प्रायश्चित केले नव्हते. जे विद्यार्थी एका गुरु जवळ शिक्षण संपवून दुसऱ्याकडे ज्ञान संपादनाकरिता हिंडत जात त्यानां हि चरक म्हणतात.

याच प्रकारे चरक शब्दाचें उपयोग अनेक अर्थाने केलेले आढळतात. ‘चरक’ मानवाचे हित कक्षण्याकरीता हिंडत आणि जनतेची मानसिक व शारिरीक दु: खे दुर होते. म्हणून पुढे चरक या शब्दास वैद्य हा शब्द प्राप्त झाला आहे. या ग्रंथात एकुण आठ स्थाने आहे. चरक संहितेवर संस्कृतमध्ये लिहलेल्या पुष्कळ टिका उपलब्ध आहेत.
चरक संहिता ग्रंथाचे महत्त्व केवळ आयुर्वेदापुरतेच मर्यादित नसुन ते अध्यापन, देवतावाद, पूजा इ. या ग्रंथांच्या अरबी भाषेंत अनुवाद झालेला आहेत. त्या काळी ग्रंथावरही उत्तम प्रकाश पड़तो. या ग्रंथामध्ये विशद केली असली तरी प्रसंगोपात्त सांख्य, योग्य, न्याय इ. विषयाचे परामर्शही घेतले आहेत. त्यास अग्निवेश संहिता असे देखिल म्हंटले जाते.

तनुश्री जोई
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी. ए. भाग २
दि. ०८. ०९. २०२२

Author