जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता.
April 28, 2022
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठ, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुस-या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.
उमाजी नाईक यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
# Naik, Umaji
June 12, 2017
पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या तात्या टोपे यांचे मूळ नाव रघुनाथ! रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत व्यतीत झाले.
November 17, 2015
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस' कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये 'फायलॉजिकल सोसायटी'च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून 'ऑक्सफर्ड' या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला.
१८८४ मध्ये 'A New English Dictionary on Historical Principles' या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम अनौपचारिकरीत्या 'The Oxford English Dictionary' हे नाव वापरण्यात आले. १९३३ पासून मात्र या नावानेच हा शब्दकोश प्रकाशित होत आहे.
या शब्दकोशाच्या आजपावोतो असंख्य आवृत्या निघाल्या आहेत. प्रारंभी केवळ इंग्रजी शब्दांचे इंग्रजीतच अर्थ देणारा हा शब्दकोश जग बदलत गेले तसे निरनिराळ्या भाषांतूनही अर्थ समजावून देऊ लागला, त्यात विविध भाषांमधील शब्दही अंतर्भूत होऊ लागले आणि आता तर रोजचा एक शब्द निवडण्यापासून वर्षभरातील एका शब्दाचीही निवड होऊ लावली आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा 'शब्द' ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. 'फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन' या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. हा प्रकल्प किती काळ चालेल, किती निधी त्यात गुंतवावा लागेल, वगैरे कसलीच कल्पना कोणालाही आली नाही. पण जेम्स मरे, हेन्री ब्रॅडले, डब्ल्यू. ए. क्रेग, सी.टी. ऑनियन्स, यांसारख्या निष्णात शब्दकोश रचनाकारांनी पुढील सुमारे चाळीस वर्षे जीव ओतून अथक परिश्रम केले आणि इंग्रजी शब्दकोश इतिहासात मैलाचा दगड ठरलेली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रसिध्द झाली. यासाठी शब्द संकलन कसे केले, अर्थ कसे लावले गेले, मुद्रण कसे झाले, याबद्दलची माहिती रोचक आहे. जिज्ञासूंनी सायमन विन्चास्टर यांच्या 'The Meaning of Everything : The Story of Oxford English Dictionary हा ग्रंथ अवश्य पाहावा.
१९२८ साली प्रकाशित 'बारा' खंडांच्या शब्दकोशामध्ये १९३३ साली पुरवणी खंडाची जोड मिळाली. शब्दकोश अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, त्यामध्ये विसाव्या शतकातील शब्दांची भर घालण्याकरिता चार खंडातील पुरवणी १९७२ ते १९८६ पर्यंत प्रकाशित केली गेली. याच दरम्यान १९८४ साली न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी प्रकल्प सुरू झाला. याच सुमारास कम्प्युटर तंत्रज्ञानाचा विकास झाला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या माध्यमाचे साधर्म्य ओळखून शब्दकोशाच्या मुद्रित आवृत्तीबरोबरच इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये साठवणीला भरपूर वाव असल्याने नवे शब्द सहज समाविष्ट करण्यात येऊ लागले. हा शब्दकोश सी. डी. रूपात मिळू लागला. अनेक नवे शब्द भाषेत येत असताना त्यांचा शब्दकोशात अंतर्भाव करण्याबाबत काही निकष कटाक्षाने पाळले जातात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जगातील भाषाविषयक सर्वात मोठा आणि व्यापक कार्यक्रम राबवते.
नवे शब्द शोधण्याकरता ऑक्सफर्ड इंग्लिश कॉर्प्स (शब्दांची गंगाजळी) आणि ऑक्सफर्ड रीडिंग प्रोग्राम ही मुख्य संसाधने आहेत. अनेक मान्यवान योगादानकर्ते आपण जे वाचले त्यातील नवे शब्द व त्यांचे अर्थ यांचा पद्धतशीर पाठपुरावा करतात. रीडिंग प्रोग्राममध्ये या प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (गाण्यांच्या ओळीपासून शास्त्रीय शोधनिबंधांपर्यंत) संग्रह केला जातो. गंगाजळीत हे दस्तऐवज आणि त्यांचे स्त्रोत यांची नोंदणी होते. असे नवे शब्द मिळाले की तो शब्द किती ठिकाणी, कोणत्या संदर्भात, कोणत्या अर्थाने, या अर्थाला काही विविध छत आहेत काय, किती काळ वापरला जात आहे, याचा आढावा तज्ज्ञांच्या संघाद्वारे घेतला जातो. अपशब्द वर्ज्य नसतात. पण ते वापरू नयेत, असा इशारा दिलेला असतो.
याखेरीज शब्दकोश कोणाकरता आहे, पृष्ठ संख्यांची मर्यादा, व्याख्या देतानाची शब्द मर्यादा, अशा तांत्रिक, वित्तीय मुद्द्यांचा देखील विचार केला जातो. एखादे वेळी एखाद्या शब्दाला जर अनेक वर्षांचा इतिहास नसतो, पण तो समर्पक असला तरी त्याचा अंतर्भाव करण्याचा विचार केला जातो. कम्प्युटरवरील गेममधले एखादे पात्र मेले आणि पुन्हा जिवंत झाले, तर त्याचे वर्णन respwan या क्रियापदाने केले जाते, आणि कायमचे मेले तर permdeath असे वर्णन केले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या शब्दांचा विचार करताना इंग्रजी भाषेतील शब्दांचा विचार होत नाही, अन्य भाषेतील शब्द विचारार्थ घेतले जातात. बंड, धरणे (असे संपाचे प्रकार) याच रूपात इंग्रजी भाषेत प्रवेशले. कधीकधी स्पेलिंगच्या फरकाने वेगळे अर्थ सुचवले जातात. Pundit म्हणजे तज्ज्ञ आणि pandit म्हणजे पदवी.
नव्या शब्दांचे अर्थ देणे, हे देखील आव्हानात्मक काम आहे. यासाठी व्यापक सामान्यज्ञान असणारी तज्ज्ञ मंडळी, संदर्भग्रंथ, माहितीचे अन्य स्त्रोत, विषय तज्ज्ञ, इतर समानार्थी शब्द यांचा आधार घेतला जातो. उद्या अण्णू गोट्या होणे हा वाक्प्रचार मराठी शब्दकोशात समाविष्ट करायचा झाला तर त्या तज्ज्ञाला अंतू बर्वा माहिती हवा. शब्दकोशशास्त्र जसे शब्दकोशांचे स्वरूप बदलेल तसे विकासात होत गेले आणि शब्दकोश जसे बदलत गेले तसे शब्दकोशशास्त्र बदलत गेले. आज शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांचे समूह राहिलेले नाहीत. कधीतरी आकडे वापरून संकल्पना सादर केली जाते, जसे २६/११ कधी आकडा आणि अक्षर एकत्र नांदतात, २द सारखे शब्द यात मोडतात. कधी A1 असा त्यांचा क्रम असतो. आता तर संकल्पना इमॉटीकॉनद्वारे दर्शवली जाते. अशा सर्वांचा क्रम काय असावा, हेही इंग्रजी शब्दकोशात रूढ होत आहे.
अविनाश पंडित.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत.
November 26, 2021
अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.
कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
June 18, 2018
जलरंगांची सखोल जाण हे त्यांचे वैशिष्टय़. आपल्या निष्ठांशी आणि कलेशी प्रामाणिक राहिलेल्या या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच १८९५ मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या धुरंधरांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये व ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होता.
June 1, 2022
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला.
साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
September 5, 2017
श्रीपाद नारायण पेंडसे यांनी मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ रोजी झाला.गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ अशा यशाच्या शिखऱ गाठणा-या कादंब-यांचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता. शिक्षणानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. पुढे ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ इ. कादंबर्यांरनी यशाचे शिखर गाठले. श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे. श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या कादंबरीचं केलेलं नाटय़रूपांतरही तितकंच प्रभावी आहे. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यांकमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. पण ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते. त्यानंतरची मा.श्री.ना.पेंडसे यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. चार पिढ्यांच्या कहाणीची ही चौदाशे पानांची कादंबरी दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते. ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘श्री. ना. पेंडसे. लेखक आणि माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. श्री.ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. श्री.ना.पेंडसे यांचे २४ मार्च २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 24, 2017
‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत.
July 20, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti