(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उदय पारकर

    एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी तरुण उदय पारकर. कोकणच्या मातीचा ठेवा मनात जपणार्‍या पारकर यांनी जाहिरात जगतात १२७ मानाचे पुरस्कार मिळवले. आता स्वत:ची जाहिरात कंपनी आहेच, पण सिंधुदुर्गात युरोपच्या तोडीचा स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत...

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख पुढील पानावर वाचा.

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख वाचा.

    parkar-uday-modified

      September 11, 2015


  • गुरुदेव रानडे

    सुप्रसिध्द नामधारक, श्री.गोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रा. के. वि. बेलसरे यांना एम. ए.ची पदवी देणारे श्री. गुरूदेव रा. दा. रानडे हे ‘साक्षात्कार‘ या विषयाचे परमार्थाचे पायाशुध्द व्याकरण तयार करणारे स्वतः साक्षात्कारी पुरूष होते. पाश्चिमात्य राष्ट्रांत डॉ. अंडरहिल व पौर्वात्य राष्ट्रांत गुरूदेव रानडे हे योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस या कोटीतले पुरूष होते. वैज्ञानिकाला अणुरेणू जेवढे महत्त्वाचे वाटतात, त्याप्रमाणे ‘साक्षात्कार‘ विद्येला ईश्वराचे अस्तित्व हे एक पारमार्थिक वास्तव प्रिय असते.

    ३ जुलै, १८५६ साली कर्नाटकातील जामखिंडी गावात त्यांचा जन्म झाला. मुलाने शिकावे, मिळवते व्हावे, सुखाने संसार करावा हे तत्कालीन नीतीपाठ त्यांनाही मिळाले. पुण्यातील परशुराम हायस्कूलमधून ते मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून मुंबई युनिव्हर्सिटीत दुसरे आले. डेक्कन कॉलेजात प्राचार्य बेन व प्रा. वुडहाऊस या थिऑसॉफिस्ट प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या पहिल्या-दुसर्‍या वर्षीच्या परिक्षेत पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते दुसर्या वर्गात बी.ए. झाले. अशातच त्यांना क्षयाची बाधा झाली. ‘जातो तो दिवस आपला‘ असे जीवन ते जगू लागले. तरीही एम. ए. परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.

    प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘निबाळ‘ हे आपले खेडेगाव गाठले. अकादमी ऑफ फिलॉसॉफी अंॅड रिलिजन नावाचे अध्यात्मपीठ त्यांनी स्थापन केले. अॅनी बेझंट यांच्याशी त्यांची भेट झाली होती. गुरूदेवांच्या कृपाछत्राखाली तुम्ही सुखरूप आहात, हा आशीर्वाद त्यांनी दिला होता. पण अलाहाबादला कुलगुरू जगन्नाथ झा यांनी त्यांना विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून बोलावले. विद्यापीठात १९२७ ते १९४६ पर्यंत प्राध्यापक , डीन, कुलगुरू इ. पदे त्यांनी भूषविली, तरी ‘साक्षात्कार‘ हा त्यांचा अनुभवविषय होता. ‘मिस्टिझम‘ हा मौनवाचक शब्द. ते सदा त्याच अवस्थेत असत. त्याचे संशोधन, विवरण, आकलन आणि प्रतिपादन हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ‘विश्वाचा मध्यबिंदू हा त्यांचा लेख जगभर गाजला .भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीला मध्यबिंदू मानतात. तसा ईश्वर हा जगाचा मध्यबिंदू आहे पण ब्रांडाला परीघ नाही, हा त्यांचा सिध्दांत होता, पण तो आध्यात्मिक अनुभूतीवर आधारलेला आहे.

    तासनतास ते भावसमाधीत स्थिरावत. दि. ६ जून, १९५७ मध्ये ते त्या समाधीत स्थिरावले. ‘परमार्थ‘ हा मंदबुध्दीच्या व अनीतीमान व्यक्तींसाठी नसतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार या सर्व पारमार्थिक संज्ञा आहेत. त्या समजण्यासाठी सदाचरणी सत्योपासना हेच साधन आहे.

      March 12, 2015


  • डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी

    बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते.

      February 16, 2022


  • मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

    आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले.

    ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      May 13, 2019


  • सुभाष गुप्ते

    सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.

      April 21, 2010


  • मन्ना डे

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

      July 14, 2022


  • मनोहर कोतवाल

    कोतवाल, मनोहर
    भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने निर्णायक वळण घेतले त्याच कालखंडात, ब्रिटिश राजवटीत राजकीय आंदोलनांबरोबर कामगारांचेही समांतर लढे सुरू होते. पुढे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात राजकीय चळवळीइतकेच कामगार चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कामगार संघटना स्थापन केल्याचे दिसते.

    इंटक, आयटक, एचएमएस, बीमएस ही काही त्याची ठळक उदाहरणे. परंतु त्या काळातील नेतृत्वाने राजकीय विचारांची बांधीलकी मानूनही केवळ कामगारांच्या हितासाठी या कामगार चळवळीचे अस्तित्व जाणीवपूर्वक वेगळे व स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. देशातील संघटित व विशेषत: कंत्राटी कामगारांचे ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केले, त्यात भाई मनोहर कोतवाल यांचे नाव अग्रभागी होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अगदी जागतिकीकरणापर्यंत जे काही बरे-वाईट कामगारवर्गावर परिणाम झाले, या संबंध ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील राजकीय, आर्थिक व कामगारविषयक घडामोडींचे ते साक्षीदार होते. एक अभ्यासू, लढाऊ आणि कामगार संघटनांमध्येही शिस्तीचा आग्रह धरणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अध्ययन सुरू असतानाच त्यांनी लोकसेना संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घेतला. एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ निर्णायक टप्प्यात आली असताना कामगारांचे लढेही ब्रिटिश सरकारपुढे आव्हान म्हणून उभे होते. अशा वातावरणात कामगार चळवळीचे पितामह म्हणून ज्यांना ओळखले जात होते, त्या ना. म. जोशी यांच्या संपर्कात कोतवाल आले आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बीपीटी रेल्वेमेन्स युनियनच्या माध्यमातून त्यांनी कामगार चळवळीत प्रवेश केला. या युनियनचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे एक संस्थापक नेते पी. डी’मेलो यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. देशातील प्रमुख बंदरातील कामगार व गोदी कामगार महासंघाच्या मुख्य प्रवाहात ते आले. पुढे डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी आदी नेत्यांच्या बरोबरीने कोतवाल यांनी गोदी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले. गोदी कामगारांच्या न्याय-हक्काच्या लढय़ांमध्ये ते कायम अग्रभागी राहिले. देशात १९७५ मध्ये लादल्या गेलेल्या आणीबाणीने राजकारणाबरोबर कामगार चळवळही ढवळून निघाली होती. कामगार चळवळींच्या नेतृत्वामध्येही आणीबाणीचे समर्थक व विरोधक अशी विभागणी झाली. मनोहर कोतवाल हे समाजवादी विचारातून तयार झालेले नेतृत्व, परंतु काँग्रेस विचारांशी थोडी जवळीक ठेवणारे होते. अंतर्गत राजकीय मतभेदांचा गोदी कामगार चळवळीवर परिणाम झाला. देशव्यापी बंदर व गोदी कामगार महासंघाचे दोन गट पडले. एका गटाचे नेतृत्व शांती पटेल करीत आहेत, दुसऱ्या गटाचे नेतृत्व एस. आर. कुलकर्णी व मनोहर कोतवाल यांच्याकडे गेले. तरीही नेतृत्वांमधील सामंजस्य, सभ्यता आणि समजूतदारपणामुळे गोदी कामगारांमध्ये कधी अंतर्गत संघर्ष उभा राहिला नाही. निर्णायक क्षणी सारे नेते एकत्र येऊन कामगारांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देत. या अर्थाने मनोहर कोतवाल मोठे व वेगळे नेते होते. समाजवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या हिंद मजदूर सभेचे ते अनेक वर्षे सरचिटणीस होते. भारतीय अन्न महामंडळातील कंत्राटी कामगारांचा लढा त्यांनी यशस्वीपणे लढविला. सरकारी उपक्रमात काम करूनही या कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. पुढे कंत्राटी कामगारांचे कोतवाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा.

      August 5, 2017


  • प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम

    प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचे निधन झाले.

    प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो. १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला.

    भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्यास त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्याय लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कादंबऱ्या च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते. विषयातही विविधता असल्याने कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या.

    सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणतात. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं. शिकारीचा छंद ही त्यांनी जोपासला. लाखेपासून पक्षी बनवणे व फौंटनपेनापासून विमाने बनविण्याचा रिकामपणातील उद्योग करत असत.

    तीन हजार चित्रांचा चित्रकार वाचकांच्या मनातही रंगाची उधळण करीतच राहिला. त्यांच्या न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्या, बलिदान, श्वे तगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्या विशेष गाजल्या. तसेच त्यांनी १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या. मा.बाबा कदम यांचे निधन ९ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विजय बक्षी

      October 9, 2017


  • भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.

    पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला.

      November 16, 2023


  • सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. राही मासूम रझा

    उत्त्तर प्रदेशातील गाझीपुर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२७ रोजी झाला. डॉ. राही मासूम रझा महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पी.एच.डी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्य कृती बरोबरच ते हिंदी सिनेमाला जोडले गेले. डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शन साठी १०० हून अधिक धारावाहिक त्यांनी लिहिल्या त्यातील 'महाभारत' और 'नीम का पेड़' या अविस्मरणीय होत्या. "महाभारत" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ.राही मासूम रजा यांनी काम केले. "महाभारत" बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी बी.आर.च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं. बी आर चोप्रा यांनी "महाभारत"ची कल्पना जेव्हा डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली. आश्चर्य म्हणजे डॉ. राही मासूम रझा केवळ चोवीस तासातच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन चोप्रांकडे आले, इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. मा.चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ.राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. मा.राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या तसेच कविताही लिहिल्या आहेत. निमका पेड या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. "तिलिस्म -ए -होशरुबा" हा त्यांचा कथा संग्रह आहे. आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये 'मैं तुलसी तेरे आँगन की' या चित्रपटासाठी फिल्म फेयरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने ’पद्मश्री’ , पद्म भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमेटोग्राफर आहेत. डॉ.राही मासूम रजा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    डॉ. राही मासूम रझा यांची रामजन्म भूमी वरील कविता
    "लेकिन मेरा लावारिस दिल”
    मस्जिद तो अल्लाह की ठहरी
    मंदिर राम का निकला
    लेकिन मेरा लावारिस दिल
    अब जिस की जंबील में कोई ख्वाब
    कोई ताबीर नहीं है
    मुस्तकबिल की रोशन रोशन
    एक भी तस्वीर नहीं है
    बोल ए इंसान, ये दिल, ये मेरा दिल
    ये लावारिस, ये शर्मिन्दा शर्मिन्दा दिल
    आख़िर किसके नाम का निकला
    मस्जिद तो अल्लाह की ठहरी
    मंदिर राम का निकला
    बंदा किसके काम का निकला
    ये मेरा दिल है
    या मेरे ख़्वाबों का मकतल
    चारों तरफ बस खून और आँसू, चीखें, शोले
    घायल गुड़िया
    खुली हुई मुर्दा आँखों से कुछ दरवाजे
    खून में लिथड़े कमसिन कुरते
    जगह जगह से मसकी साड़ी
    शर्मिन्दा नंगी शलवारें
    दीवारों से चिपकी बिंदी
    सहमी चूड़ी
    दरवाजों की ओट में आवेजों की कबरें
    ए अल्लाह, ए रहीम, करीम, ये मेरी अमानत
    ए श्रीराम, रघुपति राघव, ए मेरे मर्यादा पुरुषोत्तम
    ये आपकी दौलत आप सम्हालें
    मैं बेबस हूँ
    आग और खून के इस दलदल में
    मेरी तो आवाज़ के पाँव धँसे जाते हैं।

      March 16, 2017