(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री के क्षीरसागर

    श्री के क्षी. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते उर्दू शायरीचे अभ्यासक होते प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
    त्यांनी अनेक सामाजिक व साहित्यिक विषयात अभ्यासपूर्वक लेखन केले. श्री के क्षीरसागर यांचे निधन २९ एप्रिल १९८० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 6, 2017


  • मुकुंद श्रीनिवास कानडे

    नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार होते.

      July 27, 2017


  • मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र

    आज ९ नोव्हेंबर..आज मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा वाढदिवस.
    किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.
    काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.

    वृद्धांपासून युवकांपर्यंत अनेकांच्या ओठावर ‘बघ माझी आठवण येते का? ’सारख्या ओळी रुजू लागल्या. ‘ऊन थोडं जास्त आहे’ सारखं काव्य कविता न वाचणार्यांकच्याही कंठात जाऊन बसले. हे यश जितकं अल्बमची निर्मिती करणार्याा ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या मार्केटिंग विभागाचं आहे. ‘गारवा’ हा अल्बम गाजल्यावर किशोर कदम यांना हिंदीत लिखाणासाठी विचारले गेले, पण लाखो रुपयाचं आमिष नाकारत त्याने हिंदीत लिहिणे त्या क्षणी नाकारले. किशोर कदम यांचे शिक्षण आर.व्ही.टी.एच.एस. शाळेत झाले. त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे सलून होते. किशोर यांच्या घरच्यांनी त्यांना तू हवे ते कर, असे सांगितले. त्याच्या हातात कात्री-कंगवा येऊ दिला नाही. किशोर कदम यांचे अभिनयाचे शिक्षण सत्यदेव दुबे यांच्याकडे झाले. ते दुबेजींचा लाडका शिष्य होता.

    पालेकर दिग्दर्शित ‘ध्यासपर्व’(मराठी), ‘कल का आदमी’(हिंदी) या चित्रपटांत त्याने काम केले. प्रा. र. धों. कर्वे या संततिनियमनासंदर्भात कार्य करणार्या’ जगावेगळ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी ‘ध्यासपर्व’ या सिनेमात केली. श्याम बेनेगल यांच्या ‘सलीम’चाही तो हिरो होता. अरुण खोपकर यांनी बनवलेल्या नारायण सुर्वेंवरील लघुपटात त्यांनी सुर्व्यांची व्यक्तिरेखा साकारली. इतर कलावंत आणि किशोर यात फरक असा, की तो खूप वाचनात रमणारा कवी आहे. तत्त्वज्ञान, झेन बुद्धिझम, ओशो रजनिशांची पुस्तके, नेरुदा, सीझर वाह्येव्होसारखे स्पॅनिश कवी, हेन्री डेव्हिड थोरो असे वाट्टेल त्या विषयावरचे तो वाचत असतो. ‘टाइम्स म्युझिक’तर्फे ख्यातनाम कवी गुलजार व मराठी कवी सौमित्र यांनी स्वत:च सादरीकरण केलेल्या २४ कवितांची ‘तरीही’ ही सीडी ऐकणे, हा एक वेगळाच अनुभव आहे.

    प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. किशोर कदम यांच्या बाबतची एक आठवण. आशा भोसले यांनी ‘आपली माणसं’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले. ते गाऊन झाल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांनी कुतूहलाने गीतकाराचे नाव विचारले. तो आशातार्इंच्या डोळ्यांत पाणी आणणारा गीतकार होते म्हणजेच, किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र. समुद्र हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या कवितांमधून अनेकदा समुद्राविषयी उल्लेख असतात.

    उदाहरणार्थ
    जगण्यास तेव्हा खरा अर्थ होता,
    निरर्थास ही अर्थ भेटायचे
    मनासारखा अर्थ लागायचा,
    अन् मनासारखे शब्दही यायचे
    नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने,
    किती वेळ बोलायचे
    निघोनी घरी शेवटी जात असता,
    वळुनी कितीदा तरी पाहायचे

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      November 9, 2016


  • बेबीताई कांबळे

    कांबळे, बेबीताई

    ‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या.

    बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.

    -------------------------------------------------------

    कांबळे, बेबीताई

    दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे.

    दलित आत्मचरित्रांच्या प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरेत ज्या मोजक्या महिला आत्मचरित्रांचा समावेश आहे, त्यात बेबीताई कांबळे यांच्या 'जिणं आमचं' या आत्मकथनाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांचे "जिणं आमचं' या आत्मचरित्राचे सात भाषांमधून भाषांतर झालेले आहे. राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरविले होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून थेट प्रेरणा घेतलेले विविध क्षेत्रांमधले जे धडाडीचे कार्यकर्ते आजही कार्यरत होते, त्यात बेबीताईंचा समावेश होता. १९३० च्या दशकात जेजुरीच्या जत्रेत बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण करून 'पोरांना शिकविल्याशिवाय आपली या नरकातून सुटका होणार नाही' असे बजावले होते. ते ऐकून बेबीताईंच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे शाळेत घातले आणि बेबीताईंचे जीवनच बदलले. त्यांचे आजोबा इंग्रज साहेबांचे बटलर; तर वडील ठेकेदार होते. असे असूनही 'महारवाड्या'तले कष्टाचे, रोगराईचे, अज्ञानाचे जिणे सगळ्यांप्रमाणेच त्यांनाही जवळून पाहायला लागलेच.

    पुढे अनेक वर्षांनी हे जीवन शब्दबद्ध करताना बेबीताईंनी 'बिनशेपटाच्या जनावराचं जिणं' असे त्याचे मामिर्क वर्णन केले होते. हे आपले आत्मकथन नाही, तर त्या पिढीचे, समाजातल्या दबून गेलेल्या वर्गाचे ते प्रातिनिधिक प्रकटन आहे, असे बेबीताई म्हणत. त्यांचे आत्मकथन हा बहुमोल सामाजिक दस्तावेज आहे. त्यामुळेच, माया पंडित यांनी त्याचा 'प्रिझन्स वुई ब्रोक' असा अनुवाद केला, तेव्हा जगभरच्या वाचकांना दलित समाजाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे कथन नंतर फ्रेंच व इतर भाषांमध्येही गेले.

    'तुम्ही आणखी लिहा' असा आग्रह बेबीताईंना होई, तेव्हा आपण कार्यकर्त्या आहोत, लेखन हे आपले साधन आहे, असे त्या म्हणत. त्यामुळेच, फलटणला काढलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेची त्यांना अधिक चिंता असे. दलित संघटित होत नाहीत, याची त्यांना काळजी वाटे. 'गटातटांच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य उरलेले नाही' असे कठोरपणे सांगतानाच आता दलित महिलांनीच 'दलित पँथर'सारखी आक्रमक संघटना उभारली पाहिजे, असे बेबीताई आवर्जून सांगत. हा त्यांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास होता.

    बेबीताई कांबळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देत साहित्याची सेवा केली. अल्पशिक्षित असलेल्या बेबीताई विवाहानंतर फलटणमधील मंगळवार पेठेमध्ये दुकान चालवीत होत्या. दुकानात येणारे रद्दीचे कागद व वह्यांचे कागद यातील अक्षर ओळखीने त्यांना साहित्याची आवड निर्माण केली आणि हळूहळू जमेल तसे त्या कोऱ्या कागदावर लिहीत गेल्या. त्यातूनच दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होत गेली. श्रीमती बेबीताई यांनी दलित बांधवांची दु:ख अत्यंत जवळून अनुभवली आणि त्याचबरोबर स्वत:ही त्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. त्यातूनच त्यांच्या "जिणं आमचं' या आत्मचरित्राचा जन्म झाला. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी, हिंदी, फ्रेंच, पंजाबी, बंगाली या भाषांत भाषांतरे झाली. इंग्रजी भाषेमध्ये या साहित्यकृतीचे भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला होता.

    बेबीताई कांबळे यांच्या "जिणं आमचं' या पुस्तकावर पुणे विद्यापीठात पीएचडी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितासंग्रह (भीमगीते) त्यांनी लिहिला असून, केवळ साहित्य सेवा करताना चळवळीतून दलित बांधवांना प्रगतीचे, शिक्षणाचे विचार देण्याबाबत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व दलित चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. फलटण भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांनी निंभोरे (ता. फलटण) येथे भटक्‍या जमातीतील मुलांसाठी काढलेली आश्रमशाळा गेली २० वर्षे त्या चालवीत होत्या. याच परिसरामध्ये संविधान भवन बांधण्याच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले होते. फलटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील दलित चळवळ व साहित्यामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता.

    दलित साहित्यात स्त्रीवादाचा जोमदार प्रवाह वाहू शकला नाही. मात्र, स्त्रीवाद व दलित चळवळ यांचे जे अभिन्न, अतूट नाते आहे, त्याची नेमकी जाण बेबीताईंना होती. त्यामुळे त्या ज्याला 'भीमाचं वारं' म्हणत, ते वारे प्रत्येक घरातल्या मुलीच्या मनात शिरायला हवे, ही त्यांची तळमळ असे. म्हणूनच, बाबासाहेब शहरांत रुजले, आता ते खेड्यापाड्यांमध्ये रुजायला हवेत, यासाठी त्या अखेरपर्यंत धडपडल्या. २१ एप्रिल २०१२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12904269.cms - बेबीताई कांबळे यांच्या निधनानंतर लिहिलेले महाराष्ट्र टाईम्समधील संपादकीय...

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर आणि विविध वर्तमानपत्रांतील लेख)

      August 5, 2017


  • कृष्णा कल्ले

    नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.

      June 24, 2022


  • सिने-अभिनेत्री किरण खेर

    १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान काँग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सल व आम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 23, 2018


  • हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

    प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला. शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

    शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या.ते ज्ञानेश्वरांची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकाने त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या मा.शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच. माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे मा.शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. मा.शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता.

    निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. मा.शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. मा.शाहू मोडक हे ख्रिश्चन तर मा.प्रतिभा या जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!
    शाहू मोडक प्रवास ... एका देवमाणसाचा
    लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
    अनुवाद: सुधीर गाडगीळ

    शाहु मोडक यांचे चित्रपट संत ज्ञानेश्र्वर व संत तुलसीदास

      March 11, 2017


  • मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

    मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.

      March 3, 2018


  • गजानन वाटवे

    आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.

      May 24, 2014


  • आर. आर. पाटील

    आर. आर. पाटील

    कर्तृत्व आणि परिश्रम या गुणांच्या बळावर सामान्यातील सामान्य माणूस देखील यशस्वी होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

      March 3, 2018