(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेटपटू विजय मर्चंट

    आपल्या १८ वर्षाच्या करीयर मध्ये त्यांनी एकूण ८५९ धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.

      October 12, 2021


  • शीतल करदेकर

    शीतल करदेकर

    महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्‍या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा वृत्तपत्रांमधून राजकीय चित्रपट तसंच नाटकांशी संबंधित सातत्याने लेख तसंच बातमीदारी केली आहे.

      August 23, 2013


  • वीरेंद्र भांडारकर

    भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) औरंगाबाद केंद्राचे सहायक संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी त्यांच्या उमेदीत उत्कृष्ट बास्केटबॉलपटू व हॅंडबॉलपटू म्हणून नाव कमावले. पण केवळ यशात न रमता त्यांनी उत्तम खेळाडूंची पिढी घडविण्यासाठी गेली दोन दशके योगदान दिले. औरंगाबाद व मुंबईची साईची केंद्रे विकसित करुन देशाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले.

    खेळाची मशागत

      July 24, 2015


  • जयश्री शांताराम

    जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्‍याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.

      March 28, 2013


  • स्वातंत्र्यवीर सावरकर

    मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य !!!

      February 26, 2022


  • संत आडकोजी महाराज

    महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसेच त्यांचे गुरु आडकोजी महाराज.

      August 22, 2010


  • ज्येष्ठ कलाकार नयना आपटे

    नयना आपटे या ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांच्या कन्या, शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या. लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या.

      April 29, 2024


  • डॉ. शिवाजीराव पटवर्धन

    विदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक.

      February 10, 2010


  • पी.सावळाराम

    शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.

    १९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, मा.गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.

    शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (मा.शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. मा.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...

    "बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
    त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • पत्रकार अनंत दीक्षित

    केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते.

      December 12, 2021