जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.
April 22, 2010
विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील “श्रीमान श्रीमती” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले.
September 23, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!
गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
July 27, 2011
१९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
July 2, 2021
सुलक्षणा केवळ गायिकाच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत तिने अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते. उलझन, सलांखे, हेराफेरी, खानदान, वक्त की दीवार, दो वक्त की रोटी हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
July 12, 2017
आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल.
शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही 'विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला.
माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र 'माँटेसरी' असेच म्हटले जाते.
माँटेसरी यांचा इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मा.मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले. बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
शिशुशिक्षणाची त्या पुरस्कर्ती होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढली. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत. माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर माँटेसरीं यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले.
शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. मा.माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.
उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. मा.माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द माइंड, (२) द डिस्कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्ड माँटेसरी मेथड (१९१७). मा.माँटेसरी यांचे ६ मे १९५२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
रईस खान यांच्या मातोश्री उत्तम गायिका होत्या व वडील उत्कृष्ट बीनवादक होते.त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३९ रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे झाला.मामा इनायत खान मेवात घराण्याचे पट्टीचे गायक होते. रईस खान यांनी तर अगदी बालवयात सूर आणि स्वर यावर इतके प्रभुत्व मिळविले होते की, मुंबईच्या सुंदराबाई हॉल मध्ये त्यांनी, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर महाराज सिंह यांच्या समोर आपल्या कलेचे पहिले जाहीर सादरीकरण केले तेव्हा ते केवळ आणि केवळ पाच वर्षांचे होते. १९५५ साली पोलंड देशातील ' वॉर्सा ' या राजधानीच्या शहरात संपन्न झालेल्या यूथ फेस्टिव्हल साठी त्यांची निवड होऊन त्यांनी तिथे आलेल्या देशोदेशीच्या शंभराहून अधिक तंतु-वादकांमध्ये सर्वोत्तम वादन करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तेव्हाही ते फक्त आणि फक्त सोळा वर्षांचे होते. ते उत्तम रागदारी गात असत परंतु ते जगभर विख्यात झाले ते त्यांच्या सतार वादनामुळे. त्यांनी आपल्या सतारवादनाची साथ अनेक दिग्गज हिंदुस्थानी गायकांना केली होती. बिस्मिल्ला खान, हरिप्रसाद चौरसिया, एल. सुब्रह्मण्यम यांच्या बरोबर त्यांची जुगलबंदी गाजलेली होती.
पाकिस्तानी गायिका, बिल्किस खातूम, यांच्याशी लग्न केल्याने ते पाकिस्तानातील कराची शहरात राहत असत. तेथे त्यांनी आपली मूळची इंदौरी मेवात घराण्याची गायकी जपली होती व हिदुस्थानी रागदारी पाकिस्तान मध्ये पोहचवण्याचे काम केले. पाकिस्तानात वास्तव्य असतानाही ते भारतीय चित्रपट -संगीताशी समरस झालेले होते. संगीतकार मदन मोहन हे त्यांचे खास मित्र होते. मा.मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटातल्या गाण्याना रईस खान यांनी सतारीचा स्वरसाज चढविला आहे. १९६४ च्या " पूजा के फूल " या चित्रपटातले लता मंगेशकर यांच्या आवाजातले गाणे, " मेरी आँखों से कोई नीन्द लिये जाता है " या गाण्याला रईस खान यांच्या सतारीची साथ आहे. अगदी अलीकडचा, " गॉड तूसी ग्रेट हो " असो अथवा आणि साजिद -वाजिद या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेला " पार्टनर " चित्रपट असो, रईस खान यांच्या सतारीचे स्वर त्यातल्या गीताना होते. उस्ताद रईस खान यांचे काल ६ मे २०१७ रोजी कराचीतच निधन झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी झाला. पूर्वी एक चांगला मॉडेल उत्कृष्ट अभिनेता होऊ शकत नाही, असे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते असे. मात्र जॉनने यशस्वी मॉडेलसोबतच स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही सिद्ध केले आहे. २००३ मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या जॉनने पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. यशस्वी मॉडेल, अभिनेता आणि पिळदार शरीरयष्टी असलेला जॉन बाइक्ससाठी क्रेजी आहे. त्याच्याकडे बाइक्सचे मोठे कलेक्शन आहे. जॉनला JA या स्वतःच्या ब्रॅण्डची जीन्स परिधान करणे पसंत आहे. याशिवाय तो अरमानी ब्रॅण्ड्सचे शर्ट्स वापरतो. या ब्रॅण्ड्सच्या शर्टची किंमत साठ हजारांपासून सुरु होते. डिझायनर नरेंद्र कुमार अहमद यांचे कट सूट्स तो परिधान करतो. याशिवाय रॉकी एससुद्धा त्याचे आवडते डिझायनर आहे.
जॉनचा फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ असून फुटबॉलपटू होण्याचे त्याचे स्वप्न होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
मुर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुणे शहरास आले. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी मुर्तिजापूर येथे झाला.फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर कवी अनिल यांनी १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली, सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. त्यांची १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. तसेच पाठोपाठ १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका झाली.
कवी अनिल यांनी हे असे मार्गक्रम करत असतानाच मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान दिले. कवी अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे. त्यांच्या 'तळ्याकाठी' आणि 'जुई' या दोन दशपदी कविता खूप गाजल्या. मा.अनिल यांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले असे. अनिल यांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. कवी अनिल यांचे निधन ८ मे १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 8, 2017
‘ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी..
March 7, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti