जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले.
July 4, 2022
माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव.
August 30, 2010
मोठाल्या मिशांचे कवी नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात.त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते उत्तम सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे. योगी पुरुष बाबुराव कुळकर्णी हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत असे मानले जाते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते २०१० पासून सदस्य होते. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मा.अशोक नायगावकर भूषविले होते. या संमेलनात ते म्हणाले होते,'महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.' उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृध्द व्हाल, असे ते म्हणतात. कतार, सिंगापूर, बँकॉक, दुबई, इस्त्रायल, लंडन, न्यूकॅसल, शिकागो, डेट्राईट, लॉसएंजेलिस, बफेलो, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून आल्या होत्या. अशोक नायगावकर ह्यांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2017
अण्णा हजारे
December 15, 2010
डॉ. खडसे यांची आजवर ३४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘काला सुरज’ या कादंबरीला १९९२ चा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयवंत दळवी यांच्या ‘कालचक्र’ या मराठी नाटकाचा तसेच ‘रामनगरी’ या राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे. ‘अपने ही होने पर’ या हिंदी काव्य संग्रहात विं. दा. करंदीकरांच्या कवितांचा अनुवाद संग्रहित केला आहे.
July 19, 2011
बाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र.
March 2, 2024
श्री विद्या प्रकाशनचे दामोदर दिनकर कुलकर्णी उर्फ मधुकाका यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला.
मधुकाका नावाने परिचित असणारे दामोदर दिनकर कुलकर्णी हे १९४७ ते १९६२ या काळात कॉन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे येथे तसेच १९६२ ते १९६७ या काळात त्यांनी संयुक्त साहित्य या संस्थांमध्ये काम केले.
पुढे त्यांनी १९६८ मध्ये श्री विद्या प्रकाशनाची मूहमर्तमेढ रोवली. 'वाळवंटातील चंद्रकोर' हे त्यांचे पहिले प्रकाशन. ललित व शैक्षणिक अशी एक हजारावर पुस्तके प्रकाशित केली. 'आंबेडकरी चळवळ', 'अक्करमाशी', 'उचल्या', 'काबूलनामा', 'श्री विठ्ठल एक महासमन्वय','मेड इन इंडिया', 'लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक' ही त्यांनी प्रकाशित केलेली महत्वाची पुस्तके.
मधुकाका कुलकर्णी मुंबई येथे ३ जून १९९० रोजी झालेल्या सहाव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
'प्रकाशकनामा' हे त्यांनी आत्मचरीत्र पण लिहिले आहे.
मधुकाका कुलकर्णी यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे मधुकाका कुलकर्णी यांना आदरांजली.
#MadhuKakaKulkarni #DamodarDinkarKulkarni
November 26, 2021
December 15, 2010
डॉ. मीना नेरूरकर या जितक्या नृत्यात, लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवॉक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हॉलीवूडपटात अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘One life to Live’ यात व इतर मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत.
June 21, 2022
आविष्कार दारव्हेकर! मराठी मालिका , नाटक आणि चित्रपट क्षेत्रात नावाजलेलं नाव.
August 6, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti