जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्वीज कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात. मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही,कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्र कथेचा.जी.आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्र कथा सुरू केली.
September 17, 2021
अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला.
अमृता सुभाष यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/amruta-subhash/
June 4, 2017
अमोल मुजुमदार हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्या खेळाडूंपैकी तो एक आहे. प्रथम श्रेणीच्या सामन्यातील अनेक विक्रम अमोलच्या खात्यावर जमा आहेत.
April 2, 2014
मणिरत्नम हे चित्रपट सृष्टीत येण्या आधी कंसल्टंट होते. मणिरत्नम यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट १९८३ साली कानडी चित्रपट ‘पल्लवी अनु पल्लवी’. त्यांचा जन्म २ जून १९५५ रोजी झाला. या चित्रपटाला कर्नाटक सरकार ने मणिरत्नम यांना ‘बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड’ दिले. मा.मणिरत्नम यांना १९८६ साली आलेल्या तमिळ चित्रपट ‘मोउना रागम’ ने तमिळ चित्रपट सृष्टीत ओळख दिली. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले. मणिरत्नम यांनी १९९२ मध्ये ‘रोजा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी ए आर रहमान यांना संगीतकार बनण्याची संधी दिली. हा चित्रपट सुपरहिट झाला. मणिरत्नम यांनी ‘दिल से’ या चित्रपटाद्वारे बॉलीवुड मध्ये आले. या नंतर २००२ मध्ये ‘साथिया’ चित्रपट निर्माण केला. याची कथा मणिरत्नम यांचीच होती. ‘साथिया’ हा मणिरत्नम यांच्या ‘अलायपयुथे’चा अधिकृत रिमेक होता. मणि रत्नम २००४ मध्ये फिल्म ‘युवा’ चे दिग्दर्शन केले. मा.मणिरत्नम यांना बॉलीवूडमध्ये ‘मणी’ सर म्हणून आदराने संबोधले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 3, 2017
उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. अजूनही संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. अनंत फंदी यांचे आडनाव घोलप. हे यजुर्वेदी कौन्डिण्य गोत्री ब्राह्मण.
यांचे पूर्वजांचा धंदा गोंधळीपणाचा व सराफीचाही होता. अनंत फंदी यांनी लावण्या बर्या च केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर अनंत फंदी यांनी तमाशा पण केला. त्यांचे तमाशांतील साथी होते, एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. उतारवयात अहिल्याबाई होळकर सांगण्यावरून हे कीर्तन करू लागला, अशी आख्यायिका आहे.
अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले' अनंत फंदी यांचा ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा होनाजी बाळानी गौरव केला होता. ह्या कवनसागरातील फारच थोडी कवने आज उपलब्ध आहेत. याची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे.
‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ या याचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे. याने श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध असले, तरी सहावा प्रक्षिप्त असावा. दुसऱ्या बाजीरावाची प्रथम याच्यावर मर्जी होती. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.
शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाचा अधिक्षेप करणाऱ्या याच्या काही लावण्या आहेत. मा.अनंत फंदी यांचा मुलगा सवाई फंदी हेही कवी व कीर्तनकार होते. अनंत फंदी यांचे निधन ३ नोव्हेंबर १८१९ रोजी झाले.
काही रचना अनंत फंदी यांच्या समाजाला एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत पटवून देणे/सांगणे, म्हणजे फटका. फटका काव्यप्रकाराचे जनक म्हणजे कवी अनंतफंदी! कवी अनंतफंदींच्या अनेक फटक्यांपैकी एक उपदेशपर फटका:
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरूं नको
चल सालसपण धरुनि निखालस खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी राग कुणावर धरूं नको
नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणां घेउं नको
भली भलाई कर कांहीं पण अधर्ममार्गीं शिरूं नको
मायबापांवर रुसूं नको
दूर एकला बसूं नको
व्यवहारामधिं फसूं नको
कधीं रिकामा असूं नको
परि उलाढाली भलत्यासलत्या पोटासाठीं करूं नको
संसारामधि ऐस आपला उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणें कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्यााचा ठेवा करुनी हेवा झटूं नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि एक चढी जगामधि थोरपणाला मिरवुं नको
हिमायतीच्या बळें गरिबगुरिबाला तूं गुरकावुं नको
दो दिवसांची जाइल सत्ता अपयश माथां घेउं नको
बहुत कर्जबाजारी होउनि बोज आपुला दवडुं नको
स्ने ह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहुं नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी तराजू तोलुं नको
गहाण कुणाचें बुडवुं नको
असल्यावर भिक मागुं नको
नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरूं नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेचि चोरि नको
दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढती पाहुं नको
उगिच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठीं करूं नको
बरी खुशामत शाहण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको
आतां तुज ही गोष्ट सांगतों सत्कर्मा ओसरूं नको
असल्या गांठीं धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटूं नको
सुविचारा कातरूं नको
सत्संगत अंतरूं नको
द्वैताला अनुसरूं नको
हरिभजना विस्मरूं नको
गावयास अनंतफंददिचे फटके मागें सरूं नको
सत्कीर्तिनौबदिचा डंका गाजे मग शंकाच नको.
अनंत फंदी यांच्या विषयी मा.होनाजी बाळानी एक कविता लिहिली आहे.
फंदी अनंद कवनाचा सागर । अजिंक ज्याचा हातखंडा ॥
चमत्कार चहूंकडे चालतो । सृष्टींवर ज्याचा झेंडा ॥धृ०॥
मूळ संगमनेर ठिकाण त्याचा । कीर्ति उदय जैसा अर्की ॥
नविन तर्हार नारळी डोयीला । पदर पागोटयाची फिर्की ॥
वाचावंत संपत्ती सारखी । बहुतांचें तनमन हारकी ॥
लांगे लुंगे कवि भेदरले । अवघ्यांवर त्याची गुर्की ॥
समोर गातां कोणी टिकेना । मनामधीं बसली कर्की ॥
धन ज्याचा हातचा मळ । केवळ तो रुपयांचा हांडा ॥च० ॥१॥
फंदी आनंदी छंदी वरदी । ब्राह्मण त्याव
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 8, 2017
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं.
June 9, 2017
फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास, बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे.
September 1, 2021
‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे. मोकाशी यांनी सातवीत असताना पहिलं नाटक केलं आणि तेही हिंदी, ‘नही नही कभी नही’. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यात. कॉलेजमध्ये असतानाचा ‘थिएटर अॅहकॅडमी’ मध्ये जाण्यास मोकाशी यांनी सुरवात केली. त्याचा मोकाशी यांना खूप उपयोग झालाय. परेश मोकाशी एका मुलाखतीत म्हणतात, थिएटर अॅतकॅडमीने खरोखरंच माझा मेंदू उघडला. तोपर्यंत हिंदी-इंग्रजी चित्रपट किंवा जी काही व्यावसायिक नाटकं उपलब्ध असतात, तेवढयापुरतंच तुमचं विश्व मर्यादित असतं. थिएटर अॅहकॅडमीमुळे पहिल्यांदा माझी जागतिक रंगभूमी, जागतिक नाटक, जागतिक सिनेमा यांच्याशी ओळख झाली. तो एक नवा नाद लागला.
मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, संगीत अशा सगळ्या गोष्टींनी संपुक्त असलेली ती संस्था होती. जब्बार पटेल नाटक बसवताहेत, मोहन आगाशे काम करताहेत, सतीश आळेकर अफलातून नाटक लिहिताहेत, समर नखाते, माधवी पुरंदरे यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत, संस्थेमध्ये ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक होतंय, ‘महानिर्वाण’सारखं होतंय, ‘बेगम बर्वे’सारखं होतंय.. हे म्हणजे अलिबाबाची गुहाच. सगळं फॅण्टॅस्टिक असायचं. तिथे आल्यावर पहिल्यांदा मी गंभीरपणे मी या क्षेत्राचा विचार केला असावा, असं मला वाटतं. याचं सगळं श्रेय थिएटर अॅदकॅडमीचं. २००१ मध्ये ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ हे नाटक केले. त्यानंतर ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’, ‘मंगळावरचे मुंडके’, ‘समुद्र’ अशी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं करता करता त्याने थेट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं. या पहिल्याच चित्रपटाने त्याला ऑस्करच्या दारापर्यंत नेलं.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी सांगतात
‘समुद्र’ झाल्यावर एके दिवशी बापू वाटवेंनी लिहिलेलं दादासाहेब फाळके यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. त्यानंतर माझ्या डोक्यावर वीज कोसळावी असं झालं. मग ठरवलं की, ही अफलातून कथा आहे. ही आपल्याला कशी काय ठाऊक नव्हती? यावर अजून काहीच कसं झालेलं नाही? त्यानंतर पंधरा दिवसांत माझी स्क्रिप्ट लिहून झाली. माझी सगळ्यात वेगवान लिहून झालेली कलाकृती म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. मी लिहायला लागलो आणि एक-दोन प्रसंग लिहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की, ही माझ्या नेहमीच्या नाटकाच्या फॉर्ममधलं नाही. याचा चित्रपट करावा लागेल. मी जाणीवपूर्वक थोडंसं चित्रपटाच्या दृष्टीने काय करावं लागेल, ते डोक्यात ठेवून लिहायला लागलो. त्या दृष्टीने प्रसंग रचायला लागलो. २००५ मध्ये संहिता तयार झाली आणि पुढची तीन वर्ष मला चित्रपटासाठी पैसे मिळाले नाहीत. आम्ही सगळे कॉन्टॅक्टस वापरले, पण अशा प्रकारचा सिनेमा कसा करायचा, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात कुणी स्टार असणार नाही, त्यात गाणं असणार नाही अशा माझ्या काही अटी होत्याच. तसंच ती साधी सिंपल गोष्ट असणार. साधारणपणे पडद्यावर ज्या प्रमाणे चरित्र दाखवण्याची लार्जर दॅन लाइफ, देवत्व दिल्यासारखं चित्रित करण्याची पद्धत आहे, तसा हा चित्रपट नसणार होता. फाळके हे एक साधे माणूस कसे होते आणि तरीही त्यांच्या हातून हे मोठं काम कसं झालं, याची ही कहाणी असणार होती. मुळातच मला चरित्र सांगायचं नव्हतं तर फाळके यांनी पहिला चित्रपट कसा केला त्याची ही गोष्ट होती. हे माझे निर्णय महत्त्वाचे ठरले. मला कुणीतरी सुचवलं होतं की, हा चित्रपट हिंदीत करू या. कारण हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. पण मी मराठीत कम्फर्टेबल आहे. मुळात फाळके मराठी होते. त्यामुळे ते मराठीत जास्त चांगल्या प्रकारे येईल, असं माझं म्हणणं होतं. या सगळ्या अटी असल्याने हा चित्रपट काढायला कुणी धजावेना. मग अखेर मी निर्णय घेतला की, आता आपणच धाडस करूया. वडील आणि काकाही मागे उभे राहिले. मग आम्ही पैसे उभे केले आणि २००८ मध्ये शूटिंग सुरू केलं. सहा महिन्यांत आमच्या हातात सेन्सॉरचं सर्टिफिकेट होतं, इतक्या झपाटयाने आम्ही काम केलं. साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 6, 2019
लेनिन यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिस्ट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. लेनिन कुशाग्र बुद्धिमत्तेचा साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनिय व नेत्रदिपक आहे.
April 25, 2021
मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.
June 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti