जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला.
प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.
गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले.
मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2019
“पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या.
July 18, 2017
इलाई राजा यांचे पूर्ण नाव डॅनिअल राजैय्या. त्यांचा जन्म २ जून १९४३ रोजी झाला. इलाई राजा यांनी १९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे, आपल्या आगळ्यावेगळ्या आणि कर्णमधुर संगीताने रसिकांना वेड लावणार्याअ इलाई राजा यांनी ५ हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) विविध भाषांतील गाण्यांना त्यांनी कर्णमधुर चाली दिल्या असून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीप्रमाणेच हिदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आहे.
इलाई राजा यांना "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक मिळाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 3, 2017
बोकील, शांताराम
संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.
विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!
August 5, 2017
बाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
January 4, 2021
अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म१६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.
काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. मा.चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम ह्य़ा साऊथच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन लता, रफी, आशा, तलत, मुकेश व मन्नाडे इ. गायकांकडून सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमा मिळाले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट त्यांना मिळाला नाही.
अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या गाण्यावर अतिशय खूश होते. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत. अगदी भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर नायिका कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी ह्य़ा होत्या.
खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. ८२८ गाणी दिली. त्यातील लता मंगेशकर (२४८), महंमद रफी (२६०), आशा भोसले (२३२) यांच्याकडून गाऊन घेतली. त्यांनी एकूण ६९ चित्रपटाना संगीत दिले. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून अतिशय सुंदर गाणी लिहून घेतली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्याचा वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य.
रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व ह्य़ा कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले "दो दिल धडक रहे है और आवाज एक है" असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले "देखो मौसम क्या बहार है" अथवा "तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो" हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगीतात रोमँटीझम दिसतो. मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत चित्रगुप्त संगीतकार म्हणून जान ओतली होती. ‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेले. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ चित्रगुप्त यांच्या अशा एका पेक्षा एक रचनांनी रसिकांना वेडे केले होते.
हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले. चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद हे सुद्धा नावाजलेले संगीतकार आहेत. चित्रगुप्त यांचे १४ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 15, 2018
देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.
April 1, 2019
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
July 5, 2022
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते.
July 26, 2021
डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते.
August 18, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti