जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ४ जानेवारी... आज आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस
आज फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी झाला. लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली म्हणून ४ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा करतात.
लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्याकची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत. चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत. लुई तीन वर्षांचा असतांना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादत त्यांची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसर्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली. पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला.
लुई ब्रेल यांचे ६ जानेवारी १८५२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 4, 2017
मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.
July 14, 2022
आपली पाळेमुळे असलेल्या भारताशी सहकार्य आणि हिंदी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी त्यांना पहिला प्रवासी भारतीय सन्मान मिळाला. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने त्यांचा ‘पद्मविभूषण’ किताबाने सन्मान केला.
March 29, 2022
वाघ, यतीन
गोदावरीला महापूर आल्यानंतर जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून नागरिकांना मदत करण्याची हिंमत दाखविण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते.. असा प्रसंग २००८ सालच्या पुरात खरोखरच आला होता आणि यतीन वाघ ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. नाशिक नगरीचे मनसेचे पहिलेच महापौर म्हणून जबाबदारी आलेले अॅड. यतीन वाघ यांनी यांसारख्या अनेक प्रसंगातून आपल्यातील या समाजसेवी गुणांचे दर्शन घडविले आहे.
समाजकारण आणि राजकारण यांची गुंफण जर व्यवस्थितरीत्या घातली तर जनता अशा कुटुंबावर कसे प्रेम करते, याचे उदाहरण म्हणून मनसेचे नाशिक येथील महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागेल. राज्यातील मनसेचे प्रथम महापौर हा मान अॅड. यतीन यांनी मिळविण्याआधी या कुटुंबाकडे आलेल्या पदांचा विचार केला तर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य कळू शकेल. त्यांचे आजोबा यादवराव वाघ तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, वडील अॅड. रघुनाथ वाघ उपनगराध्यक्ष, आत्या सुमनताई बागले नाशिकच्या पहिल्या उपमहापौर, अशी अनेक पदे या कुटुंबाकडे मिळालेली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता अॅड. यतीन यांना महापालिकेचा गाडा हाकताना कुटुंबाच्या या वारशाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. वयाची पंचेचाळिशी गाठलेले यतीन यांच्या कुटुंबात आई गंगाबाई यांचा अपवाद वगळता वडील, पत्नी, भाऊ, दोन्ही बहिणी, इतकेच काय वहिनी असे सर्वच कायद्याचे पदवीधर. गंगापूर हे वाघ यांचे मूळ गाव. पेठे विद्यालयातून माध्यमिक, भि. य. क्ष. महाविद्यालयातून उच्च माध्यमिक आणि न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयातून बी.एस.एल., एलएल.बी. पूर्ण करणाऱ्या अॅड. वाघ यांना महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाला. मागील पंचवार्षिकात महापालिकेच्या खर्चातून नगरसेवकांना मोबाइल देण्याच्या ठरावाला कडाडून विरोध करणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख झाली. पक्षकार्यात त्यांनी आपल्या वकिली कौशल्याचाही परिचय वेळोवेळी दिला आहे. मितभाषी असलेल्या अॅड. यतीन यांच्यातील हे सर्व गुणच त्यांना महापौरपदापर्यंत घेऊन गेले.
August 5, 2017
क्लिंट ईस्टवूड यांनी ५ वेळा गोल्डन ग्लोब अवार्ड, ४ वेळा ऑस्कर अवॉर्ड व स्क्रीन एक्टर्स गिल्ड लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड जिंकले आहेत. मिलियन डॉलर बेबी, फॉर अ फ्यू डॉलर्स मोर,द गुड, द बैड एंड द अग्ली, मिस्टीक रिव्हर, ग्रॅन टोरिनो, लेटर्स फ्रॉम आयवो जिमा, चेजेंलिंग, हे क्लिंट ईस्टवूड यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
May 31, 2022
हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे मा.हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”. १९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.
मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमंि अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली. मा.हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / misalpav.com
हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com
हंसराज बहेल यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=1VrSAH4BbIU
May 20, 2017
शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात शिवाजी पेठेत ‘उभा मारूती चौकात’ सन १९३३ मध्ये त्यांनी पहिला पोवाडा म्हटला तो बाजीप्रभूंचा! ‘सावकारी पाश या चिटपटातील पोवाडय़ाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांचा जन्म २८ जुलै रोजी झाला. मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले. पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी सन १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना ‘शाहीर तिलक’ म्हणून गौरवले.
‘म्यानातून तलवार उपसावी’ असा शाहिरांचा आवाज बाहेर पडतो’ अशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव! ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर. ‘जुनं ते सोनं’ हा त्यांच्या गाजलेल्या पोवडय़ांचा संग्रह आहे. शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 30, 2017
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठांसह लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. पहिला श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.
November 5, 2023
मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली.
May 7, 2014
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी झाला. मराठी चित्रपट सुष्टित संतोष जुवेकर यांना एक डैशिंग हीरो समजले जाते. या गोजिरवाण्या घरात'मधला शेखर असो, किंवा 'वादळवाट'मधला शैलेश, टीव्ही मालिकांतल्या संतोष जुवेकरच्या या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
संतोष जुवेकर यांनी त्यानंतर काही सिनेमे केले, नाटकातही तो चमकला. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 30, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti