जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास असे. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचे निधन झाले.
प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो. १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला.
भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्यास त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्याय लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कादंबऱ्या च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते. विषयातही विविधता असल्याने कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या.
सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणतात. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं. शिकारीचा छंद ही त्यांनी जोपासला. लाखेपासून पक्षी बनवणे व फौंटनपेनापासून विमाने बनविण्याचा रिकामपणातील उद्योग करत असत.
तीन हजार चित्रांचा चित्रकार वाचकांच्या मनातही रंगाची उधळण करीतच राहिला. त्यांच्या न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्या, बलिदान, श्वे तगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्या विशेष गाजल्या. तसेच त्यांनी १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या. मा.बाबा कदम यांचे निधन ९ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विजय बक्षी
October 9, 2017
दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.
March 16, 2022
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.
June 12, 2017
उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले. १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तर'मधून मिळाली. या सिनेमातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत. मा.उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
January 3, 2017
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील “चालता बोलता” आणि जी मराठी वरील “फु बाई फु” या कार्यक्रमातून तो घरा घरात पोहचला. “फु बाई फु” च्या एका पर्वाचे तो विजेते ठरला होता.
June 18, 2022
कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो.
‘जब दिल ही टूट गया’ हे ‘शाहजहाँ’ चित्रपटातील गीत ऐकताना ‘हम जी के क्या करेंगे’मधील ‘क्या’ हा स्वर गाताना उदास, हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही. दोन्ही अंतऱ्यांमध्ये ‘इक भेदी लूट गया’ किंवा ‘हर साथी छूट गया’ ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते. ‘तदबीर’ चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ‘मैं पंछी आजाद मेरा कहीं दूर ठिकाना रे, इस दुनिया के बाग में मेरा आना-जाना रे’ हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही. या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो. ‘जीवन की परभात में आऊँ, सांज भये तो मैं उड जाऊँ, बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे..’ हेच सैगल यांच्या बाबतीत खरे आहे. ‘शाहजहाँ’ याच चित्रपटातील ‘गम दिए मुस्तकिल..’ या गीतातील दोन वेगवेगळ्या पद्धतीत गायलेले.. ‘हाय हाय ये जालिम जमाना..’ ही या गीतातील खास बात आहे. ‘दिया जलाओ जगमग.. जगमग..’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले ‘तानसेन’ चित्रपटातील गीत जेव्हा सैगल स्वरात आपल्यासमोर येते, तेव्हा स्वरांचे झुंबर क्षणार्धात लख्ख प्रकाशमान झाल्याचे जाणवते. आणि हा प्रकाश उमलतो तो सुरुवातीच्या ‘दिन सूना सूरज बिना..’ पासूनच. ‘सो जा राजकुमारी..’ या अंगाई गीताने के. एल. सैगल यांचा गाण्यातील भाव ऐकताना आपण मोहरून जातो. ‘माय सिस्टर’ चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ हे लोकप्रिय गीत, ‘दिया जिसने दिल’ या गीतातील ‘दिल’ या शब्दावरील स्वरमेळ, ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ या गीतातील ‘हंसध्वनी’ राग, ‘देवदास’ चित्रपटातील ‘बालम आये बसो मोरे मन में’ ही तिमिर बरन यांची आकर्षक स्वररचना हे सारे सैगल माहौल निर्माण करणारे आहे. लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2017
कुळकर्णी, राजाभाऊ
विदर्भाच्या वाचनसंस्कृतीचा आधारस्तंभच राजाभाऊ कुळकर्णी यांच्या निधनाने निखळून पडला आहे. राजाभाऊंचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी झाले आणि त्यापैकी गेली ५५ वर्षे ते विदर्भात होते. १९५५ साली अहमदनगर जिल्ह्य़ातला ‘भा.ल.’ कुळकर्णी नावाचा एक नुकताच मिसरूड फुटलेला युवक शिवचरित्राच्या प्रचारासाठी विदर्भात आला आणि ‘भा.ल.’ ही त्याची ओळख विसरून आणि ‘राजाभाऊ’ हे नवे रूप घेऊन विदर्भाच्या भूमीत स्थिरावला.
या साडेपाच दशकांच्या काळात राजाभाऊंची भूमिका विदर्भाच्या वाचनसंस्कृतीला वेगवेगळ्या मार्गाने विकसित करणारी आणि दिशा देणारी ठरली. ते केवळ पुस्तक विक्रेते नव्हते तर, अक्षरांच्या पाऊलवाटांवर अनेक नामवंतांसोबत नवोदितांनाही चालायला लावणारे मार्गदर्शक होते. पुस्तकविक्रीसोबत ते प्रकाशन व्यवसायात शिरले पण, रूढार्थाने ते केवळ साहित्य प्रकाशकच नव्हते तर, साहित्याच्या वाटा उजळून टाकणारा एक दीप म्हणून या काळात राजाभाऊ वावरले. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवर आणि ते लिहिणाऱ्या लेखकांच्या नावावर नुसती नजर जरी टाकली तरी राजाभाऊंचा साहित्यिक संपर्क आणि आवाका केवढा थक्क करणारा होता, हे सहज लक्षात येते. प्रकाशक म्हणून त्यांचा व्यवहारही वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारा, लेखकाचा सन्मान राखणारा आणि प्रकाशित झालेले अक्षरधन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारा राहिला. वाचक जर खरेच भुकेला असेल तर, पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजाभाऊंनी अशा अनेकांना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य हप्त्याने कसे उपलब्ध करून दिले, याविषयी आजही अतिशय आदराने बोलले जाते. दूरचित्रवाणीचा प्रचार आणि प्रसार भारतात सुरू झाल्यावर शाळकरी मुले पुस्तकांपासून लहान वयातच दुरावत आहेत, हे लक्षात आल्यावर राजाभाऊ कुळकर्णी यांनी साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनस्पध्रेचा सुरू केलेला उपक्रम वैदर्भीय वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपकारक ठरला. राजाभाऊंचे साहित्य प्रसार केंद्र केवळ पुस्तक विक्रीचे दुकान म्हणून नागपूर-विदर्भात परिचित नव्हते तर, साहित्यिक आणि वाचकांचा ते एक अड्डा आहे. ग्रेस आणि सुरेश भट, भास्कर लक्ष्मण भोळे आणि प्रा. वसंत वऱ्हाडपांडे, महेश एलकुंचवार आणि प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अरविंद इनामदार, अशी नावे कोणत्याही जोडीने उच्चारली तरी ती परस्पर विरोधी विचारशैली आणि लेखनाची प्रतीके आहेत, मात्र असे सर्व भिन्न विचार-संस्कृतीचे लेखक, कवी, समीक्षक साहित्य प्रसार केंद्रात आपापल्या विचारांच्या झुली बाजूला ठेवून केवळ साहित्य या एका रंगात न्हाऊन निघाले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. व्यक्तिगत पातळीवर राजाभाऊ अध्यात्मवादी होते आणि त्यांच्या विचारनिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. असे असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर आणि सार्वजनिक जीवनात राजाभाऊंनी ते अध्यात्म आणि त्या संघनिष्ठांना डोके वर काढू दिले नाही. किंबहुना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात या निष्ठा कोणत्याही प्रकारे आड येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच संघाशी नाळ जुळलेल्या राजाभाऊंचा साहित्यिक आणि सार्वजनिक परिवार मात्र सर्वपक्षीय, सर्वरंगीय, सर्वजातीय आणि सर्वधर्मीय असा सर्वसमावेशक राहिला. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदेशाने राजाभाऊ कुळकर्णी विदर्भात आले, रुजले, फुलले आणि वैदर्भीय भावजीवनाचा अविभाज्य घटक झाले त्या बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजाभाऊ कुळकर्णीना हृदयविकाराने गाठावे आणि आयुष्यभर पुस्तकांचा ध्यास घेतलेल्या एखाद्याचा मृत्यू पुस्तक प्रकाशन समारंभात आणि त्याच्या आदर्श व्यक्तीसमोरच व्हावा, हेही एखाद्या साहित्यकृतीतच शोभावे.
August 5, 2017
शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.
November 2, 2021
राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.
March 10, 2022
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti