तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला.
June 30, 2022
मंदीच्या लाटेमध्ये वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांपुढे मोठी आव्हाने असतात. त्यामुळेच जगभरातील आर्थिक वार्यांचा वेध घेतच आता वाहन उद्योगांना आपली धोरणे ठरवावी लागतात. पुण्याचे ऑटो एक्सपर्ट विवेक वैद्य हे देशोदेशीच्या बड्या वाहन उद्योगांना त्यांची धोरणे पाठविण्यासाठी उपयुक्त सल्ला देतात. आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत त्यांच्या नावाचा दबदबा तयार झाला आहे.
विवेक वैद्य यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'ऑटो' एक्सपर्ट! हा लेख पुढील पानावर वाचा.
विवेक वैद्य यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'ऑटो' एक्सपर्ट! हा लेख वाचा.
September 9, 2015
बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
January 14, 2016
लग्नाच्या आधी आईने प्रेमाने निव्वळ छंद म्हणून शिकवलेल्या कला व कौशल्ये, लग्नानंतर एक कौटुंबिक गरज म्हणून अर्थार्जनासाठी कशा उपयोगी पडू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे विनया गुप्ते यांचा व्यवसाय आहे. १९९१ साली कल्याण मध्ये घरगुती स्वरुपात सुरू झालेला ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचा विस्तार आजमितीस अतिप्रशस्त “शगुन इन्स्टिटयूट ऑफ ब्यूटी कल्चर आणि फॅशन डिझायनिंग”मध्ये रुपांतर करण्याची किमया उद्योजिका विनया गुप्ते यांनी केली आहे. स्वतःच घर प्रचंड आत्मविश्वासाने व जिद्दीने उभे करत असतानाच हजारो निराधार महिलांना रोजगार व स्वयंसिध्दतेच्या मार्गांनी आपापल्या आयुष्यांना रेखीव आकार देण्यास शिकविणार्या विनया गुप्ते आज महिला सक्षमीकरणाच्या कॉर्पोरेट चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या या व्यवसायाचं विस्तारीकरण करताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचं नवं पर्व कल्याणमध्ये उभं केलं आहे.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणार्या सुवर्ण जयंती शहरी योजनांसाठी कल्याण, मिरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, माथेरान, खोपोली या भागांतील नगरपालिका व पालिकांमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबीरे व चर्चासत्रे आयोजित करुन ब्युटी पार्लर, शिवणकाम, ज्वेलरी मेकिंग, डॉल मेकिंग, स्नॅक्स, चॉकलेट मेकिंग, बॅग मेकिंग, एम्ब्रॉडरी, स्टाफ टॉईज मेकिंग अशा अनेक लहान-मोठ्या उद्योगांसाठी महिलांना प्रशिक्षण त्यांनी आजतागायत दिले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
नंदा या सुप्रसिध्द सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि नट मास्टर विनायकांची कन्या. लहानपणी बेबी नंदा या नावाने १९४६ रोजी प्रथम बालकलाकार म्हणून “मंदिर” या चित्रपटातनं एका मुलाची भूमिका साकारली व त्यानंतर १५ ते १६ चित्रपटांमधुन काम केले.
May 7, 2014
कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते
June 9, 2011
मौज या मराठीमधील सर्वात जुन्या व उल्लेखनीय प्रकाशन संस्थेचे साक्षेपी संपादक व प्रकाशक राहिलेल्या श्री. पु. भागवत यांचा जन्म २७ जानेवारी १९२३ रोजी झाला .
मुंबई विद्यापीठातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.
मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.
२१ ऑगष्ट २००७ या दिवशी श्री. पु. भागवत यांचे निधन झाले.
भागवत यांच्या स्मत़ीप्रित्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेला श्री.पु. भागवत पुरस्कारने सन्मानित करते. आजपर्यंत औरंगाबाद येथील 'साकेत' प्रकाशन, मौज प्रकाशनच्या संजय भागवत व मॅजेस्टिक प्रकाशन संस्थेला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
प्रकाशक श्री पु भागवत (27-Dec-2021)
पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत (27-Dec-2018)
January 14, 2015
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे.
December 15, 2010
बावीसाव्या वर्षीच क्रीडा शिक्षक झालेले औरंगाबादचे सतीश पाटील यांनी हजारांहून अधिक अॅथलिटस् घडविले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे वैजापूर तालुक्यातील बाभूळगावची वेगवान दौड सुरु आहे...
सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख पुढील पानावर वाचा.
सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख वाचा.
September 7, 2015
समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.
January 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti