(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यंकटेश माडगूळकर

    व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (६ जुलै, १९२७ – २८ ऑगस्ट, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.

      March 26, 2013


  • महात्मा बसवेश्वर

    महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहे. मर्‍हाटी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान केलं आहे.

    या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा विचारसरणीचा व कार्याचा फार मोठा प्रभाव विविध महाराष्ट्रीय धर्म सम्प्रदायांवरही तेराव्या शतकापासूनच पडला. हा इतिहास लक्षात घेतल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रभावकक्षा किती दूरगामी होती, याची कल्पना येते. महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्‍या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्‍या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच महाराष्ट्रावरही पडला. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होय. यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाला. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झालं.

    महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.नाच्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते.

    ११०५ हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म - सन. बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करीत. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होत. मुंजीसारखे विधी/कर्मकांड अनावश्यक आहेत, असं त्यांचं मत असल्यानं त्यांनी मुंज करुन घेण्यास विरोध केला. त्याच प्रमाणं देवदासी, बळी देण्याची प्रथा,

    व्यवसाय व जाती यांच्यातील श्रेष्ठकनिष्ठता, कर्मकांड हा त्यांना मान्यच नव्हतं. त्याला विरोध करुन त्यांनी नवसमाजनिर्मिती केली. सनातनी कर्मठांचा विरोध पत्करुन आचार्य जातवेदमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. प्रथम करणिक असलेले महात्मा बसवेश्वर पुढे कोषागार मंत्री झाले. पण प्रचाराचं कार्य त्यांनी लोकाभिमुख केलं व त्याला समताधिष्ठित, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न्याय देणारी प्रशासन-व्यवस्था निर्मिली.

    इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, कर्म हेच कैलास (काय कवे कैलास ) या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणलं. त्यांच्या पुरुष अनुयाना शिवशरण व स्त्री अनुयायांना शिवशरणी म्हणतात. असे ७०० शिवशरण व सत्तर शिवशरणी होत्या. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनुभव मंटप या विचारपीठाची स्थापना केली व त्यांच्या या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चांभार ब्राम्हण-विवाहासारखे उपक्रम सुरु करुन त्यांनी समाजाची मानसिकता बदलली.

    त्यांच्या विचारांना 'वचन' म्हणतात. त्यातून वीरशैवांचं 'वचनसाहित्य' निर्माण झालं. वीरशैव धर्माच्या तत्त्वज्ञ
    नाचा गाभा म्हणजे षट्स्थलसिध्दान्त होय. वीस वर्ष शासनाच्या महत्त्वाचा पदावर राहून त्यांनी कार्य केलं नंतर पूर्णतया धर्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या कार्याला राहून घेतलं. कायक, दोह, सदाचार, समता व धर्मभावना ही त्यांच्या कार्याची 'पंचसूची' होती .

    महात्मा बसवेश्वरांमुळं नवचैतन्य लाभलेला वीरशैव धर्म हा भारतातला एक प्रमुख धर्म आहे.

    ## Mahatma Basaveshwar

      August 22, 2010


  • राम शेवाळकर

    अमोघ वाणी लाभलेला वक्ता, कवी, ललित लेखक, समीक्षक, विचारवंत ही ओळख राम शेवाळकर यांची.

      February 4, 2010


  • गणपतराव जोशी

    चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

      June 25, 2022


  • बबनराव नावडीकर

    बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले.

      July 9, 2022


  • संत एकनाथ

    महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत.

    जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे.

    वडील सूर्याजी(भानुदास), आई रुक्मिणी.

    देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरीजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

    जीवन

    जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

    १. एकनाथी भागवत: भागवत पुराणातील ११व्या स्कंदावर ओवीरूप मराठी ग्रंथ

    २. समाजाच्या जागृतीसाठी अभंग व भारुडे यांची रचना.

    ३. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.

    ४.रुक्मिणीस्वयंवर

    ५. भावार्थ रामायणाचे लेखन

    ६. संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध.

      December 15, 2010


  • डॉ. आर. कृष्णकुमार

    नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात."

      August 5, 2017


  • गणेश वासुदेव मावळणकर

    गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

      June 25, 2022


  • पार्श्वगायिका आशा भोसले

    आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.

      June 10, 2017


  • डॉ. प्र. चिं. शेजवलकर

    वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करणारे प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर.

    ज्या काळामध्ये आपल्या देशात व्यवस्थापन या विषयाचा शास्त्र म्हणून उदय झाला नव्हता, त्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिली.

    'मॅनेजमेंट गुरू' ही संज्ञा आता प्रचलित झाली आहे. शेजवलकर हे या संज्ञेचे एक चालते-बोलते उदाहरण. याच्या पुढे जात ते 'मॅनेजमेंट एज्युकेशन गुरू' बनले. म्हणूनच पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात त्यांचा उल्लेख 'शेजवलकर शिक्षण संस्था' म्हणून केला जातो. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद ते अखंडपणे भूषवित आहेत. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालक होते. ही यादी आणखी वाढविता येईल; पण केवळ एवढ्या उल्लेखांमध्येही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसून येते.

    त्यांचे मराठी भाषाप्रेमही सर्वज्ञात आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी ते नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करतात. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो. उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. परंतु तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या सार्‍या व्यापातून वेळ काढून त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. गेली ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. 'प्रार्थने'संबंधी ते लिहितात, 'सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वराजवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.' व्यवस्थापनापासून अध्यात्मापर्यंतचा त्यांचा सहजसुंदर वावर खरोखरच स्तिमित करणारा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या निवडीमुळे राजकारणविरहीत भाषासेवेचे बीज रोवले जाईल, अशी आशा आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017