लक्ष्मण शंकरराव काटेकर, हे तुळजापूर येथील रहिवाशी असुन परिचीतांमध्ये तात्या या नावाने लोकप्रिय आहेत. तुळजापुरमधील सारोळा तालुक्यात शिक्षक म्हणुन रूजु असलेले तात्या आपल्या मृदु व गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे त्यांचे टोपणनाव सार्थ ठरवितात. सारोळ्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांमधील तान्हं मुलपण, जीवापाड सांभाळुन अत्यंत प्रेमाने व मायेने त्यांना शिकविणारे तात्या समस्त बच्चेकंपनीचे लाडके आहेत.
सारोळ्यामधील कित्येक लहान मुलांमध्ये शिक्षणाचे बीज पेरून त्यांच्या अनिश्चीत आयुष्यांना रेखीव आकार देण्यात, व हसत खेळ्त त्यांच्या मनांवर शिस्तीचे व आभ्यासाचे मह्त्व बिंबवण्यात ते यशस्वी ठरल्यामुळे, गावात त्यांना आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान आहे. तात्यांचा जन्म 18 जानेवारी 1980 रोजी झाला.