गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं.
May 24, 2014
संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला.
“माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.
गोविंदराव टेंबे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे (9-Oct-2016)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (5-Jun-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (9-Oct-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (7-Jun-2021)
# Pandit Govindrao Tembe
November 10, 2016
पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं.
October 24, 2016
मोहन आपटे हे खगोल अभ्यासक व मराठीतले विज्ञान कथा लेखक आहेत. खगोलशास्त्र या विषयावर त्यांची अनेक भाषणे होत असतात.
December 15, 2010
नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं.
१९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम नयना आपटे यांनी केले होते.
२४ फेब्रुवारी १९६४ ला शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा.
नयना आपटे यांच्यावरील लेख वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
# Apte, Nayana
June 4, 2017
December 2, 2010
पांडुरंग वामन जोशी हे केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यांचे शिक्षण माजलगाव तालुक्यात झाले.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दहा वर्षे काम केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांनी दोन महिने कारावासही भोगला होता.
शुक्रवार दि. २९ जानेवारी, २०१० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
April 20, 2016
मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
November 8, 2013
रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्या असंख्य हिर्यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.
August 16, 2011
मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.
July 26, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti