पुण्याच्या ललित कला केंद्रात मेवाती घराण्याच्या गायकीसाठी गुरुपद मिळवणारे औरंगाबादचे सचिन नेवपूरकर हे सर्वात तरुण गुरु ठरले आहेत. आजवर ११० बंदिशींची रचना करणारे नेवपूरकर हे स्वत:ही मेवाती घराण्याचे अनेक विद्यार्थी घडवत आहेत व शास्त्रीय संगीताच्या मासिक सभांमधून शास्त्रीय संगीताविषयीची रुची सर्वदूर पोहोचविण्यात योगदान देत आहेत.
घरंदाज मेवातीचा 'ध्यास'
July 24, 2015
- वयाच्या आठराव्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ.
- टेलीकम्युनिकेशन मधील नोकरीतून १९८८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती.
- तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध
१) अबोली - महाराष्ट्र राज्य अनुदान प्राप्त
२) लाख आठवांचे दिवे - विश्व मानव एकता २००० पुरस्कार प्राप्त
३) मिळूनी सार्या गाऊ - गीत संग्रह तृतीय आवृत्ती प्रकाशित
- काव्य प्रेमी कला प्रतिष्ठान उपाध्यक्षपदी ६ वर्षे
- नीलपुष्प साहित्य मंडळ - कार्यकारी सभासद
- म.सा.प व को. म.सा. प साहित्य संमेलनात, कवी संमेलनात सहभाग
- शब्दांगण, मेनका, माहेर, वसुधा, अनुराग, ऑल दि बेस्ट, कायस्थ प्रबोधन, कायस्थ विकास, उत्तम कथा, वहिनी व इतर अनेक मासिकातून कथा, ललित लेखन विशेषत: कविता प्रसिद्ध
- कमलाबाई सोवनी पुरस्कार, रुणाली पुरस्कार व अनेक कवितांना बक्षीसे,
- चां.कां. प्रभू महिला गौरव पुरस्कार प्राप्त, स.पां. जोशी पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, कै. सुशीलाबाई कदम काव्य पुरस्कार
- आकाशवाणीवर पुस्तक परिक्षण व महिलांसाठी कार्यक्रम सादर.
- स्वरचित काव्यमय स्त्री जीवन कार्यक्रमाचे पासष्ट कार्यक्रम पुणे, अंबरनाथ, कल्याण, पार्ले, ठाणे येथील विविध संस्थातून सादर.
- दै. सन्मित्रमध्ये पुस्तक परिक्षणे सदरासाठी नियमित लेखन.
(संदर्भ : स्वतः दिलेल्या माहितीवरुन)
May 16, 2011
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.
June 11, 2022
भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
June 22, 2022
वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.
तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.
नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.
वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :
तुझ्यावाचून करमेना
गंमत जंमत
खट्याळ सासू नाठाळ सून
सगळीकडे बोंबाबोंब
मज्जाच मज्जा
रेशीमगाठी
आत्मविश्वास
हमाल दे धमाल
कुठं कुठं शोधू मी तुला
नवरा बायको
अफलातून
भुताचा भाऊ
पसंत आहे मुलगी
आमच्या सारखे आम्हीच
मालमसाला
उपकार दुधाचे शेजारी शेजारी
पटली रे पटली
घनचक्कर
बाप रे बाप
डोक्याला ताप नाही
मुंबई ते मॉरिशस
ऐकावं ते नवलच
एक होता विदूषक
शुभमंगल सावधान
विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)
## Varsha Usgaonkar
April 14, 2010
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. यांचे मूळनाव गणेश गोविंद बोडस. गणपतरावांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला.
January 30, 2010
जवळजवळ ४० वर्षे पोलिस दलासाठी कार्यरत असताना, मधुकर झेंडे यांनी त्यांच्या काळात खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज, हाजी मस्तन आणि करीम लाला यांना जेल मध्ये टाकले.
July 14, 2022
नाना पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला. नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर.
नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होते, त्या वेळी नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील."
त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ' नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुबंईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ' देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ' बॅरिस्टर की बीबी' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ' धुवादार' चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ' दुर्गा', नया संसार', ' कंगन', ' आझाद ' या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ' माली ' या हिंदी चित्रपटात आणि ' भक्तीचा मळा ' या मराठी चित्रपटात भूमिका दिली.
'माल' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.
त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असत' आणि १९६३ च्या ' फकिरा ' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या ' द गुरु ' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले ' की त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.' त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ' कानून ' ह्या चित्रपटातील भुमीकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरची पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे त्यांना १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतहोत्सवानिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. नाना पळशीकरांनी कंगन, कुवारा बाप (१९४२) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी, कानून क्या करेगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.
नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व फक्त ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.
नाना पळशीकर यांचे २ जून १९८४ रोजी निधन झाले.
May 5, 2022
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.
July 16, 2017
बहुमत गाठीशी नसतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा विक्रम करून दाखविणारी शिवसेना येत्या काही दिवसांनी त्यांच्याच पसंतीचा उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आणून दाखविण्याचा पराक्रम करेल, अशी दाट शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अर्थात हा चमत्कार काही केवळ पक्षनेतृत्वाच्या चलाखपणातून घडला असेल वा घडेल अशी शक्यता नाही,
ते घडण्याला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले आहे ते महापौरपदावरील व्यक्तीचे, म्हणजे वैजयंती गुजर घोलप यांचे, अजातशत्रू आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्व. वैजयंतीताई नगरसेवकपदी सर्वप्रथम निवडून आल्या त्यालाही आता पंधरा र्वषे होऊन गेली. २०१० च्या निवडणुकीत एकतर भलेभले तिकिटाविना राहिले, किंवा तिकिटे मिळालीच तर मनसेच्या लाटेत उद्ध्वस्त तरी झाले अशी बहुसंख्य उमेदवारांची स्थिती असताना एकाच वॉर्डातून सलग चौथ्यांदा निवडून जाणाऱ्या, आणि तिकिट नको असे म्हटल्यानंतरही तुम्हालाच तिकिट घ्यावे लागेल हा पक्ष नेतृत्वाचा आदेश मानणे भाग पडलेल्या, वैजयंतीताईंनी यंदा हा महापराक्रम केला आहे.
वैजयंतीताईंचा जन्म कल्याणचा, शिक्षण कल्याणचं, सामाजिक कार्य कल्याणातलं, नोकरी कल्याणातली आणि विवाहही कल्याणच्याच समविचारी कार्यकर्त्यांबरोबरचा. धनगर समाजात त्या जन्मल्या, घरचा व्यवसायच खाटकाचा. आईवडील मटणविक्रीच्या व्यवसायात. पण दोघंही सातवीपर्यंत शिकलेली असल्यानं त्यांनी वैजयंतीताईंना आनंदानं शाळेत घातलं. शाळकरी वयातच आईवडील दोघंही दुकानावर जात असल्यानं स्वयंपाकघर सांभाळण्यापासून सारी कामं वैजयंतीताईं करू लागल्या. गणित चांगलं, त्यामुळे दुकानाचे हिशेबठिशेब वैजयंतीताईंकडेच असत.
उत्तम गुण मिळवून त्या दहावी पास झाल्या खऱ्या, पण इंग्रजी फारसं चांगलं नसल्यानं त्यांनी कलाशाखेकडे प्रवेश घेतला. अकरावीचं पहिलं र्वष कसंबसं पार पडलं, पण बारावीच्या पहिल्या महिन्या-दोन महिन्यातच वैजयंतीताईंना आपली चूक कळून आली, त्यांनी थेट प्राचार्याच्या केबिनवरच धडक मारून कॉमर्सला प्रवेश मागितला. कॉमर्स विषयांची चाचणी द्यावी लागेल असं प्राचार्यानी बजावलं. गणित चांगलं होतंच, मनापासून अभ्यास करून ताईंनी दोन्ही विषयात पहिला वर्ग मिळवला, कॉमर्सला प्रवेश घेतला आणि त्या सरळ कॉमर्स पदवीधर झाल्या. पदवीधर झाल्यानंतर मटणविक्रीच्या दुकानावर बसणं काही शक्य नव्हतं, त्यामुळे नोकरी करणं ओघानं आलंच, अपंगांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत कारकून म्हणून त्या नोकरीस लागल्या आणि पुढली सारी र्वष नगरसेवक म्हणून सार्वजनिक कार्य करीत असतानाही त्यांची नोकरी सुरूच राहिली.
तीस मुलांनिशी त्यांनी सुरू केलेली ती संस्था, आता दोनशे मुलांच्या निवासी शाळेत रूपांतरित झाली आहे आणि जैन समाजातली काही परिचित मंडळी आता ती चालवताहेत, पण वैजयंतीताईंचा संस्थेशी असणारा संबंध पूर्वीप्रमाणेच कायम आहे. महापौरपदी गेल्यामुळे आता दाराशी गाडी आहे, पण ती गाडीही अडल्यानडल्यासाठी ठेवून वैजयंतीताई आजही पायी फिरणंच पसंत करतात. निवडून गेल्यानंतर सगळे मतदार सारखेच, पक्षीय बंधनांमध्ये न अडकता प्रत्येकासाठी धावून जाणं, आनंदाच्या क्षणांबरोबरच मृत्युप्रसंगी तिरडी बांधण्यापर्यंत सहभागी होणं हे वैजयंतीताईंनी विनासंकोच केलं म्हणूनच मतदानप्रसंगी अवास्तव खर्च करण्याची वेळ त्यांचेवर कधी आली नाही.
नोकरी होती तेव्हा पगार मिळायचा, पण नगरसेवकपदाचं मानधन आणि नोकरीतला पगार खर्च व्हायचा तो सार्वजनिक कामासाठी, महिनाअखेरीला पर्समध्ये ठणठणाटच असायचा. महापौर झाल्याच्या निमित्तानं एका संस्थेनं वैजयंतीताईंच्या आईवडिलांचा सत्कार केला, सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांचं चहापान त्यांच्याच घरी झालं, ते स्वाभाविकही होतं. पण अस्वाभाविक होतं, ते त्यांचं स्वत:च पुढे होऊन चहाचे कप देण्यासाठी धावपळ करणं. वडिलांच्या आजारपणामुळे सत्कार घरगुतीच होता, आणि तोही घरासमोरच्याच मोकळ्या जागेत.
आयोजकही होते स्थानिकच. पण आईचा सत्कार करताना, तिला साडी देण्याची वेळ आली तेव्हा साडीवर रीतीप्रमाणे हळद-कुंकवाचं बोट लावायला पाहिजे असं कुणातरी म्हणालं आणि आपलं पद विसरून कुंकवाची कुयरी आणण्यासाठी मैदानातून थेट घराकडे धाव घेतली, ती वैजयंतीताईंनीच. कार्यकर्तेपण इतकं निखळ पारदर्शी असू शकतं याची ती खूणगाठच होती. वैजयंतीताई आता 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन मतदारांना सामोऱ्या जाताहेत, असा कार्यक्रम घेणाऱ्या त्या काही पहिल्याच नव्हेत, पण त्यांच्याठायी असलेली कार्यप्रवणता आणि त्याला मिळणारी तेवढीच जनताभिमुख आयुक्ताची जोड याबरोबरच त्यांचा आजवरचा पारदर्शकतेचा व्यवहार पाहता मतदारांना खरोखरीच महापौर आपल्या दारी आल्याचे अनुभवण्यास मिळेल अशी आशा करावयास हरकत नाही.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti