कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरुरकर यांचा जन्म १४ डिसेंबर १८९२ रोजी झाला.
“मुलींची शाळा” ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १,२ तसेच साधना व नवा नमुना या कादंबर्या. प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथासंग्रह, तसेच “मधली सुट्टी, माणूस अणि पशू, शिलाचे मोल” ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांनी लिहिली.
## Vitthal Krishna Nerurkar
July 26, 2017
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'संगीतकार दत्ताराम' हे नाव एके काळी खूपच गाजले होते. दत्ताराम हे डिचोली तालुक्यातील. त्यांचे मुळ नाव दत्ताराम शिरोडकर, मुळगावी त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान होते. पुढे आई ९ वर्षाच्या दत्तारामला घेऊन सांवतवाडीला गेली, तिथे शाळेत घालताना शेजारच्या मुलाने त्यांचे नाव 'दत्ताराम वाडकर' सांगितले आणि तेच नाव कायमचे लागले. शिक्षणात त्यांचे फार लक्ष नव्हते. त्यामुळे आई त्यांना घेऊन मुंबईत गेली. तिथे तबला शिकले, ढोलक शिकले, त्यातूनच पुढे पृथ्वी थिएटर हुस्नलाल - भगतराम, संगीतकार शंकर आदीशी त्यांचा संबंध आला. राजकपूर तेव्हा 'आग' चित्रपटाद्वारे निर्माते झाले, पण 'आग' आपटला. पुढे 'बरसात' जोरदार चालला. दत्ताराम त्यावेळच्या दर्दभ-या गाण्यात ढोलकचा ठेका धरायचे. 'चोरी चोरी' चित्रपटात 'ये रात भिगी भिगी' या गाण्यात ढोलकचा अप्रतिम ठेका दत्ताराम यांनी दिला आणि तोच हिंदी चित्रपटसृष्टीत 'दत्ताराम ठेका' म्हणून गाजू लागला. त्यातूनच पुढे राजकपूरने दत्ताराम यांना 'अब दिल्ली दूर नही' या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. या चित्रपटातील ''चुन चुन करती आयी चिडिया, मोरभी आया चूहाभी आया, बंदरभी आया'' हे गाणे हिट झाले.
दत्ताराम यांचा सुवर्णकाळ म्हणजे 'परवरिश' चित्रपटातील एकापेक्षा एक हिट गाणी होय. यमन रागातील चाल दत्ताराम यांनी बांधली आणि हसरत जयपुरीने त्याचे शब्द लिहिले. "ऑसू भरी है ये जीवन की राहें, कोई उनसे कहदे, हमे भूल जायें " या गाण्याने लोकप्रितेचा कळस गाठला. राज कपूर भलताच खुश झाला. राजकपूर हा ग्रेट शोमन होता. तसाच संगीताचा जाणकार होता. १९५९ साली 'कैदी ने ९११' मधील लताच्या आवाजातील ''मिठी मिठी बातोंसे बचना जरा'' हे गाणेही खूप लोकप्रिय झाले. ''आसू भरी है ये जीवन की राहे'' हे मुकेश यांचे गीत आजही रसिकांच्या लक्षात आहे. ही गीते संगीतबध्द करणारा माणूस होता मा.'दत्ताराम'. १९५० नंतरची ही गाणी आहेत, पण त्यामध्ये आधी चाल बांधण्यात आली आणि हसरत जयपुरींनी त्या चालीवर शब्द गुंफले. दत्ताराम त्यावेळी संगीतकार जय-किशन आणि राजकपूर यांच्याएवढेच लोकप्रिय होते. ढोलक या लोकवाद्याचा वापर प्रतिष्ठित हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खुबीने केला. असे हे दत्ताराम काळ बदलल्यानंतर अज्ञातवासात गेले. १५ - १६ चित्रपटांना दत्ताराम यांनी संगीत दिले. तो जमाना वेगळा होता. आजच्या लाखाच्या, कोटीच्या आकडयांत मानधन कधी मिळाले नाही, 'परवरिश' साठी जेमतेम पाच हजाराचे मानधन मिळाले होते असे दत्ताराम सांगत. पुढे जमाना बदलला, शंकर-जयकिशन यांना साथ देत दत्ताराम यांनी मुबंईत बरीच वर्षे काढली.
मा.दत्ताराम यांचे ८ जून २००७ रोजी निधन झाले.
#Dattaram #DattaramShirodkar
May 4, 2022
समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.
उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.
July 27, 2011
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर हे मराठी चित्रपट, रंगमंच आणि टिव्ही अभिनेते होते. रमेश भाटकर यांनी आपल्या ‘डॅशिंग’ आणि सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवली.
February 4, 2019
इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.
पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.
इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.
गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.
दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.
वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.
August 5, 2017
जुई जोशी ह्या फिलान्थ्रोपिक एन्गेजमेन्ट च्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस् पैकी एक आहेत. जुई जोशी यांची जगातील मोजक्या काही अतिशय सन्मानाने व संपुर्ण राजेशाही बंदोबस्तामध्ये वावरणार्या महिला उद्योजकांमध्ये गणती होते.
July 27, 2011
तडफदार, धाडसी पत्रकारांपैकी एक अशी नारायण आठवलेंची ओळख महाराष्ट्राला नवी नाही.
June 24, 2013
December 15, 2010
गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ वर्षं ठाणे सन्मित्र हे व्हिडिओ वार्तापत्रही चालवलं. तसंच “ठाणे समाचार” हे इंग्रजी वृत्तपत्र देखील १ वर्ष चालवलं.
May 24, 2014
गोडबोले, उदयराज
भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.
नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti