(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मधुरा कामत

    तिच्या बोटात चित्रांची जादू आहे, समोरच्या माणसाला ती आपल्या चित्रांतून व्यक्त करते. शिवाय लहान मुलांसाठी चित्रकलेचे क्लासही चालवते. आपल्या या कलेबद्दल सांगतेय मधुरा कामत.

    मधुराच्या चित्रकलेची सुरूवात इतर मुलांप्रमाणेच घराच्या भिंतीपासून झाली. पण तिची ही गिरबिट थोडी निराळी आहे, हे तिच्या पालकांना कळत होतं. म्हणूनच त्यांनी तिला चित्रकलेच्या वर्गात घातलं. लहानपणीची ही आवड मधुरा कामतचं मोठेपणीचं तिचं पॅशन ठरलीय. ज्युनिअर कॉलेजनंतर तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रचना संसद या दोनही विद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया दिल्या. त्यामधून तिला रचना संसदच्या अप्लाइड आर्ट अँड क्राफ्टसाठी प्रवेश मिळाला. वेगवेगळ्या असाइनमेंटसोबत तिचं पेंटींगही कायम सुरूच असतं. तिला फाइन आर्टमध्ये जास्तं रस आहे. आणि सरावाचे तिच्या पद्धतीही वेगवेगळया आहेत. कल्याणला तिचं घर आहे. कल्याण ते दादर, किंवा सीएसटी या लोकलप्रवासात ती चक्क समोरच्या सहप्रवाशांची चित्रं रेखाटते. यामुळे अभ्यासही होतो, वेग वाढतो आणि गंमतही येते हा तिचा फंडा. शिवाय आपलं चित्रं काढल्याने बायका खुश होतात ते वेगळंच. रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, कॉलेज कॅम्पस असो किवा तिच्या वडिलांचे दुकान कुठेही गेली तरी मधुराची हात आणि पेन्सीलची गाठ काही सुटत नाही.

    तिचे वडील वेशभूषा पुरवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे या कामातही आपली कला आणि कल्पकता मधुरा वापरत असतेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्टं म्हणजे, तिला मिळालेलं कलाज्ञान, इतरानाही मिळावं यासाठी ती परिसरातील छोट्या मुलांसाठी चित्रकलेचा क्लासही घेते. मधुराच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे तिच्या क्लासना मुलांची आणि पालकांचीही पसंती असते. भविष्यात तिला भारताबाहेर जाऊन पारंपरिक भारतीय कला प्रकार जगासमोर मांडण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • कल्याण वासुदेव काळे

    कल्याण वासुदेव काळे हे संत साहित्य आणि भाषा विज्ञानाचे अभ्यासक होते.

    त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९३७ रोजी झाला.

    mss

    ## Kalyan Vasudeo Kale

      July 28, 2017


  • समीर धर्माधिकारी

    उत्तम शरीरयष्टी, देखण्या व रुबाबदार अदा यामुळे समीर धर्माधिकारी यांचं व्यक्तिमत्व नायक, खलनायक यासह सर्वच भूमिकांना शोभेल असंच आहे. निर्मला मच्छिंद्र कांबळे, दिल क्या करे, सत्ता, रेनकोट, मनोरंजन-द एंटरटेन्मेंट, अग्नीपंख, मुंबई मेरी जान, गेम, रंग रसिया, सिटी ऑफ गोल्ड अश्या हिंदी तर; रेसटॉरंट, लालबाग परळ, मॅटर, बाबुरावला पकडा, समांतर, मात अश्या मराठी चित्रपटातून समीर धर्माधीकारींनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत.

      March 13, 2014


  • माधव केशव काटदरे

    हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.

      July 15, 2022


  • उमेश इनामदार

    उमेश इनामदार

    श्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले.

      December 7, 2011


  • डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

    लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३ रोजी झाला.

    लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.

    ## Dr Padmakar Bhanudas Mande

      July 26, 2017


  • शाहू मोडक

    शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली.

      April 13, 2010


  • एम. एल. टहलियानी

    व्यक्तिवेध : एम. एल. टहलियानी
    शुक्रवार, ७ मे २०१०

    २६/११ चा खटला हा कसाबमुळे जसा लक्षात राहणार आहे तसाच तो, हा खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे निर्भीड न्यायाधीश एम. एल. अर्थात मदन लक्ष्मणदास टहलियानी यांच्यामुळेही लक्षात राहणार आहे. खटल्याच्या निकालपत्रावर टहलियानी यांची खास छाप पाहायला मिळते. विशेषत: दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये. अनलॉफुल अ‍ॅक्टिविटीज अ‍ॅक्टच्या कलम१६ अन्वयेदेखील कसाबला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम विसरले होते. हा मुद्दा स्वत टहलियानी यांनी लक्षात आणून दिला. केवळ युक्तिवादावर निर्णय न देता, कायद्याचा सारासार विचार करून निर्णय देणारा न्यायाधीश आदर्श मानला जातो. शिवाय कंदहार प्रकरणाचा उल्लेखही न्यायाधीश टहलियानी यांनी केला. त्या वेळेस मौलाना मसूद याला दहशतवाद्यांच्या ताब्यात देऊन त्यांनी ओलीस ठेवलेल्या देशवासीयांची सुटका करावी लागली होती. कसाबला फाशी दिल्यास अशा प्रकारच्या मानहानीकारक प्रसंगाला देशाला भविष्यात सामोरे जावे लागणार नाही; अर्थात त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण उल्लेख टहलियानी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींच्या निमित्ताने टहलियानी यांनी आदर्शाचा एक नवा पायंडाच न्यायदानाच्या क्षेत्रात घालून दिला आहे. टहलियानी यांचे घराणे मूळचे राजस्थानातील. रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे ते स्थायिक झाले. न्या. टहलियानी यांचा जन्म मात्र राजस्थानातला. नागपूर येथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. गोंदिया येथे वकिलीची एक वर्षांची उमेदवारी केल्यावर ते चंद्रपूरला गेले. नामवंत वकील दादासाहेब देशकर यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. गडचिरोली, वडसा, सिरोंचा इत्यादी ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर मुंबईमध्ये महानगर दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वांद्रे न्यायालयापासून त्यांनी सुरुवात केली. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून काम करत असतानाच कसाबच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. यापूर्वी सीबीआयचे अनेक खटले त्यांच्यासमोर चालले. त्याचप्रमाणे कॅसेटकिंग गुलशन कुमार हत्या आणि कामगार नेते दत्ता सामंत हत्या या खटल्यांचीही सुनावणी न्या. टहलियानी यांच्यासमोर झालेली आहे. तपासात ढिलाई दाखविलेली असेल तर पोलिसांवर बरसणारे टहलियानी यापूर्वी अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध आहेत. सध्याच्या जगात न्यायाधीशांनीही ‘अपडेट’ होण्याची गरज आहे. बदलत्या काळासोबत नव्या बाबी शिकत, कायद्याचा सारासार विचार करून निवाडा करेल तोच उत्तम न्यायाधीश, असे विधान अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशांनी केले होते. ही व्याख्या त्यांनी न्या. टहलियानी यांच्याकडे पाहूनच केली असावी! तांत्रिक बाबी आल्या की सहसा न्यायालयीन अधिकारी गोंधळून जातात मात्र न्या. टहलियानी यांच्यासमोर अशा बाबी येतात तेव्हा, ‘गृहपाठ’ व्यवस्थित केलेला नसेल तर समोरच्या अधिकाऱ्याची ‘शाळा’च घेतली जाते. याचा प्रत्यय तर कसाबच्या या खटल्यामध्येही सर्वाना आला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हीओआयपी या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस समोर आलेल्या साक्षीदारापेक्षाही अधिक ज्ञान त्या संदर्भात त्यांनाच होते. त्याचप्रमाणे सायबर क्राइम सेलचे अधिकारी साक्षीसाठी आले, त्याही वेळी याचा प्रत्यय आला. ई-मेल हॅकिंग कसे घडते, याबाबतची माहिती तुम्ही कशी शोधली, अशी विचारणा टहलियानी यांनी केली. त्यावर अशा प्रकारचा शोध घेणाऱ्या अनेक वेबसाइटस् उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले; मात्र त्यानंतरच्या संवादातही त्यांनाच अधिक विश्वासार्ह माहिती असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातही अनेकदा त्यांनी सांगितले आहे की, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना मी स्वतच कोणाचीही मदत न घेता संगणक- इंटरनेट आदी सारे शिकलो आहे. फक्त शिकलो असेच नव्हे तर ते वापरतोही. शिवाय आजही रोज काही तरी शिकत असतो.. सकाळी मरिन ड्राइव्हवर मॉर्निग वॉक, शक्य झाल्यास रात्रीही एक फेरी मारायला त्यांना आवडते. एरवी कामाच्या बाबतीत कडक शिस्तीचे न्यायाधीश म्ङणून ते ओळखले जातात. या कडक शिस्तीचा त्रासही काही वेळा त्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. मात्र कामे वेळच्या वेळीच व्हायला हवीत, असा त्यांचा कटाक्ष असतो. याच खटल्यात अगदी सुरुवातीच्या काळात काही बाबी वेळच्या वेळी न झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी खासगीत त्यांची भेट घेऊन कामे व्यवस्थित करण्याचे त्यांना आश्वासन दिले आणि जाहीरपणे न्यायालयात सुनावणे टाळावे, अशी त्यांना विनंती केली. ती त्यांनी मोठय़ा मनाने मान्यही केली. त्यानंतर न्यायालयात कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगास कधीच सामोरे जावे लागले नाही. माणूस म्हणूनही ते आपल्या सहकाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चांगले वरिष्ठ असतील, तर कर्मचारीही स्वतमध्ये चांगले बदल घडवून आणतात हे कर्मचाऱ्यांनीही दाखवून दिले. कर्तव्यकठोर अशी त्यांची प्रतिमा असली तरीही दुसऱ्या बाजूस ते पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्वाना चांगले परिचित आहेत. वृक्षवेलींत ते रमतात. झाडांची निगा राखणे हा त्यांचा आवडता छंद आहे. म्हणूनच तर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या आवारातच असलेल्या विशेष न्यायालयाच्या मागच्या बाजूस झाडे लावली असून तिथे भेंडी व इतर काही भाज्यांचीही लागवड केली आहे. त्यांचे हे पर्यावरणप्रेमही त्यांच्या कर्तव्यकठोरतेइतकेच लक्षात राहते. याशिवाय अनेक गोष्टींतून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा या खटल्यादरम्यान अनेकांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच ठिकाणी आर्थर रोडमध्ये असलेले न्यायालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याचे डिझाइन कसे असावे इथपासून ते पार त्याला अंतिम रूप प्राप्त होईपर्यंत दररोज स्वत ते प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कामावर लक्ष ठेवत. वास्तविक ते काम इतर कोणाच्याही हाती सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र हा खटला लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर तो निकालातही निघावा, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही, सुनावणीदरम्यानदेखील, वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ वाया जातो आहे, असे एकदोनदा लक्षात आले तेव्हा त्यांनी अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील दोघांनाही कडक शब्दांत तंबी दिली होती. त्यांना सिंधी उत्तम येते. घरी संभाषणाची भाषा सिंधीच. त्यांचे उर्दूचे ज्ञानही उत्तम आहे. कसाबशी संवाद साधणे त्यामुळेच त्यांना सोपे जात असे. .आणि अनेक वर्षे महाराष्ट्रातच गेल्याने त्यांचे मराठीचे ज्ञानही तेवढेच उत्तम आहे. सुनावणीदरम्यान क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याने साक्ष देताना आपले नाव ‘शीरसागर’ असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, ‘तुमचे नाव क्षीरसागर की, शीरसागर?’ त्यावर त्याने ‘शीरसागर’ असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘क्षीरसागर’चा अर्थ समजावून सांगितला! त्यांच्या उत्तम मराठीचा प्रत्ययही असाच वेळोवेळी खटल्यादरम्यान उपस्थितांना अनुभवता आला. वर्तमानपत्रांचे वाचन हाही त्यांचा आवडता छंद आहे. रात्री ते विदेशी वर्तमानपत्रांच्या वेबसाइटस् आवर्जून पाहतात. खटला पारदर्शीपणे जगासमोर जाईल आणि त्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेची निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमाही जगासमोर जाईल, असे त्यांनी कटाक्षाने पाहिले, ही भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे!

      August 5, 2017


  • डॉ. दत्ता सामंत

    डॉ.दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले.

      June 29, 2022


  • यदुनाथ दत्तात्रय थत्ते

    ‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

      July 19, 2022