व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.
July 9, 2022
मुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली.
July 3, 2013
December 15, 2010
(१८२४-१८७४)
एकोणिसाव्या शतकातील मुंबईच्या सामाजिक जीवनात समरस झालेले एक प्रमुख व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर. त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. लोकांमध्ये स्वत्वाची भावना जागवण्याचे कार्य तळमळीने केले.
महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रुढ झाले. त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटूंब मुंबईला गेले (१८३२). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करुन विकत असत. भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एलिफन्स्टन विद्यालयात व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियूक्ती झाली. (१८४३). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घरापूरी) येथे वास्तव्य केले.
भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषंात एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उदधृत केला आहे.
March 12, 2015
बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे...
सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख पुढील पानावर वाचा.
सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख वाचा.
September 8, 2015
घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
--------------------------------------------------------------------------------------------
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.
पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 5, 2017
किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.
July 26, 2011
ज्या काळात स्त्रीयांनी कलेच्या क्षेत्रात विशेषत: नाटक व चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी बोलपटांमध्ये सुध्दा अर्थात १९३०च्या दशकात, पण अश्यावेळी काही महिला कलाकारांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचे धाडस दाखवले त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री लीला चिटणीस यांचे. लीला चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे ९ सप्टेंबर १९०९ झाला होता. त्यांचे मूळचे नाव लीला नगरकर. नागपूर विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर त्याच वर्षी “उसना नवरा” या नाट्यमन्वंतरच्या नाटकात मालतीच्या भूमिकेने त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर “आंधळ्याची शाळा” मध्येही त्यांनी बिंबाची भूमिका साकारली होती. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्च विद्याविभूषित व ब्रम्हो समाजाचे पुरस्कर्ते होते. समाजाच्या विरोधाला व बंधनांना न जुमानता लिला नगरकर यांनी डॉ.चिटणीस या गृहस्थांसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अश्या प्रकारे लिला नगरकर या लिला चिटणीस झाल्या.
लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने ज्यामुळे इतिहास घडला तो टप्पा म्हणजे, “लक्स”या विख्यात साबणाच्या जाहिरातीत झळकून या ब्रॅंडसाठीच्या पहिल्या भारतीय मॉडेल ठरल्या.
रुपेरी पडद्यावर लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक तर कधी बुजर्या व बावळट भूमिका साकारल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले १९३५ च्या “सत्यनारायण” या चित्रपटातून ! त्यापाठोपाठ म्हणजे १९३० च्या उत्तरार्धात लिला चिटणीस यांच्या कलाक्षेत्राची कमान १९८०च्या उत्तरार्धा पर्यंत अगदी अखंडरित्या चढती राहिली.प्रभात चित्र, “रणजीत मुव्हीटोन”, “बॉम्बे टॉकीज” सारख्या अनेक नामांकीत फिल्म कंपनीच्या निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी लिला चिटणीस यांनी अभिनेत्री म्हणुन काम केले. या काळात लिला चिटणीस यांनी अनेक चित्रपटातून नायिका, सहनानिका तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या . “धुवाँधार”, “छाया”, “वहाँ ”, “ इंसाफ ”, “राजा गोपीचंद”, “जेलर”, “छोटे सरकार”, “संत तुलसीदास”, “कंगन”, “छोटीसी दुनीया”, “घर की रानी”, “रेखा”, “बंधन”, “आज़ाद”, “अर्धांगी”, “कांचन”, “घर घर की कहानी”, “सौदामिनी”, “हरिदर्शन”, “माँ ”, “नया दौर”, “पोस्टबॉक्स ९९९”, “मैं नशेमे हूँ ”, “काला बाज़ार”, “दुल्हन एक रात की”, “हम हिंदुस्तानी”, “गंगा जमुना”, “धर्मपुत्र”, “जीवन मृत्यू”, “भाई-भाई”, “बडी दीदी”, “औरत”, “वक्त”, “सत्यम् शिवम् सुंदरम्”, “दिल तुझको दिया” हे लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीतील मुख्य चित्रपट; त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नृत्य करायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून अक्षरश: घायाळ व्हायचे. “झूला” चित्रपटातल्या “हिंडोले कैसे झूलू...” व “झूलो के संग...” ही दोन गाणी म्हणजे मूर्तीमंत उदहारण होय.
अशोककुमार यांचा अभिनयातील आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी “शहीद” मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील.
अनंत काणेकरांचे फार्स हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे श्रेयही लिला चिटणीस यांना जाते. त्यांचे दुसरे पती ग्वालानी ह्यांच्या सहकार्याने एक चित्रपटसंस्था काढून “कंचन” आणि “किसीसे ना कहना” ह्या चित्रपटांच्या कथा, तसेच प्रमुख भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजू देखील त्यांनी सांभाळली.
त्याचबरोबर “एक रात्र आणि अर्धा दिवस” या नाटकात देखील लिला चिटणीस यांनी भुमिका साकारली आहे
लीला चिटणीस यांनी “चंदेरी दुनियेत” हे आत्मचरित्र देखील लिहिले आहे.
लिला चिटणीस यांचा आयुष्यातील उत्तरार्ध अमेरिकेत त्यांचा मुलांकडे व्यतित झला होता. १४ जुलै २००३ या दिवशी वृध्दापकाळाने वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले
(लेखन व संशोधन - सागर मालडकर)
लिला चिटणीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (17-Jul-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2018)
January 12, 2015
डॉ. वा. म. कुलकर्णी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे संचालक, एशियाटिक सोसायटीच्या म. म. पां. वा. काणे इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच एशियाटिक सोसायटीच्या वाषिर्क जर्नलचे प्रमुख संपादक अशी अनेक महनीय पदे भूषवली होती. तरीही त्यांच्या उपजत ऋजुतेमुळे तसेच भिडस्त स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिले
June 1, 2011
त्यांच्या स्वभावातच अणकुचीदारपणा होता. टीका करायची तर ती समोरच्या व्यक्तीला बोचणारीच असली पाहिजे, तरच त्या टीकेला काही अर्थ असे. आपले म्हणणे स्पष्टपणे समोरच्याला समजेल अशा भाषेत सांगताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. चित्रे काढायची तर त्यातही कुंचल्याचा फटकारा ‘शार्प’ असे. कुशल प्रशासक, कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला न जाता समाजाशी कायम आपले लागेबांधे ठेवणारा आणि तरीही राज्याचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी मनाचा हळवा कोपराही जपणारा असे एक वेगळे रसायन सदाशिवराव तिनईकर यांच्यात होते.
म्हणूनच शिवसेनेशी शाब्दिक दोन हात करणारे आयुक्त तिनईकर महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सांस्कृतिक ठेव्याला उत्तेजन देण्यासाठीही प्रयत्नरत असत. दर महिन्याला विविध प्रांतांतील सर्वोत्तम गायक, वादकांना आमंत्रित करून त्यांची कला निमंत्रितांपुढे ते सादर करत. एका वर्षी तुकाराम बीज साजरी करण्यासाठी त्यांनी वि. स. पागे यांचे कीर्तन आयोजित केले होते. राज्य सरकारने वेदपठण करणाऱ्या मंडळींचा सत्कार केला तेव्हा त्या मंडळींना त्यांनी आयुक्तांच्या बंगल्यावर बोलवून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित केली होती. वाङ्मय, साहित्य, कला यात रुची असणाऱ्या तिनईकरांचे इंग्रजीवर फर्डे प्रभुत्व होते. मुंबईत सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांना सुरुवात झाली ती त्यांच्याच काळात. स्वातंत्र्योत्तर काळात देशात नवनिर्माणाच्या संकल्पनेचा पुरस्कार करणारी उच्चविद्याविभूषितांची जी एक तडफदार पिढी उदयाला आली तिची अस्सल ओळखमुद्रा म्हणजे सदाशिव तिनईकर. भारतीय प्रशासन सेवेच्या माध्यमातून सरकारच्या विविध विभागांची शक्य तितकी ‘साफसफाई’ करणाऱ्या या कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्वाच्या कारकीर्दीचा अखेरचा टप्पा म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद. तिनईकरांनी अशी काही कामगिरी बजावली की, ती एखाद्या सनदी अधिकाऱ्याने आपल्या सत्यान्वेषणाच्या भूमिकेबाबत अखेपर्यंत कसे आग्रही असायला हवे, याचा वस्तुपाठ ठरली. भारतीय प्रशासन सेवेच्या १९५६ च्या तुकडीतून जे पाच अधिकारी महाराष्ट्राच्या सेवेत आले त्यापैकी तिघे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त झाले. जमशेद कांगा, द. म. सुकथनकर आणि सदाशिव तिनईकर. या तिघांनीही आयुक्तपदाच्या कारकीर्दीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. मात्र तिनईकर हे सर्वार्थाने ‘मुंबईकर’ ठरले. या शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांनी हे शहर बकाल होण्यास कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवला. तो ज्यांना रक्तबंबाळ करून गेला त्या सत्ताधारी शिवसेनेने अर्थातच तिनईकरांविरोधात आकांडतांडव केले. विशेषत: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि तिनईकर यांचे महापौर आणि आयुक्तांच्या अधिकारांबाबत तीव्र मतभेद झाले. मात्र नियम आणि कायद्यापुढे कुणीही व्यक्ती मोठी नाही, हे तत्त्व तिनईकरांनी ठामपणे पाळले. त्यांची शिवसेनाविरोधाची ही प्रतिमा एवढी मोठी झाली की, काही काळ हीच त्यांची ओळख ठरली. मात्र हे चित्र खरे नव्हते. याचे कारण तिनईकरांची तळमळ ही महानगरपालिकेतील आर्थिक बजबजपुरीविरोधात होती. तिनईकरांच्या पालिका बरखास्तीच्या शिफारशीवरून तर राजकीय पक्षांत गहजब झाला. पालिका प्रशासन, पालिकेची आर्थिक घडी यांचा तिनईकरांनी खास अभ्यास केला होता. झपाटय़ाने वाढत चाललेल्या मुंबई शहराचे विद्रूपीकरण पालिकेच्या माध्यमातूनच कसे रोखता येईल, याबाबत ते कमालीचे दक्ष होते. मुंबईबाबतची त्यांची ही कळकळ जाणूनच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यांना बोलावून आपल्या नगरसेवकांना उपदेशाचे चार डोस पाजले आणि नियतीच्या अजब न्यायाचे एक वर्तुळ पुरे झाले. स्वच्छ चारित्र्याचा आग्रह, स्पष्टवक्तेपणा आणि उत्तम प्रशासकाची दूरदृष्टी लाभलेल्या तिनईकरांचे म्हणूनच देशपातळीवर कौतुक झाले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही तिनईकरांच्या कर्तव्यकठोरतेची आणि मतांची दखल घेतली होती. विधिनिषेधशून्यता आणि भ्रष्ट आचरणाचा कळस गाठल्या जाणाऱ्या काळात तिनईकर ताठ मानेने वावरले आणि व्रतस्थ योग्याप्रमाणे ठाम राहात निर्भीडपणे जगले.
Text from News-0012-LS
----------------------------------
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त स. शं. तिनईकर यांचे निधन
प्रशासकीय सेवेवर कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे आणि कडक शिस्तीचे भोक्ते असणारे मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सदाशिवराव तिनईकर पालिकेतील सत्तारूढ शिवसेना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तिनईकर यांच्या काळात टिपेला पोहोचला होता. मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची अनधिकृत कार्यालये तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र बहुतांशी शिवसेनेच्या शाखांवरच त्यांचा हातोडा पडल्याने शिवसेना आणि त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. महापालिका तोट्यात गेली असताना तिनईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या शिफारशींमुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. प्रशासनाचा एखादा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये मंजूर करण्यात आला नाहि तर तो मंजूर झाला असे गृहीत धरण्यात येईल. असे फर्मान तिनईकर यांनी काढले होते. त्याचे तीव्र पडसाद त्यावेळी पालिकेत उमटले होते.
VV
News
August 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti