बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.
July 11, 2022
क्रांतिसिंह नाना पाटील हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी समाजास आत्मनिर्भर बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
December 15, 2010
शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.
June 7, 2022
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.
July 9, 2022
भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला.
July 7, 2015
संतकवी, ग्रंथकार रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म १९ डिसेंबर १९०३ रोजी झाला.
त्यांच्या रचना रसाळ व भावमधुर आहेत. अमृतधारा, भावार्थगीता, अभंगज्ञानेश्वरी, संजीवनी ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
## ramchandra vishnu godbole
## swami swaroopanand
July 26, 2017
कुमार विश्वकोशाचे एक लेखक
December 15, 2010
माने, श्रीकांत
सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.
त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.
August 5, 2017
देशोदेशी व्यापार करणार्या प्रत्येक उद्योजकाकडे कंटेनर भरुन पाठविण्याइतका माल नसतो. अशा कंटेनर पेक्षा कमी आकाराच्या मालाची दाही दिशांना निर्धोक ने-आण करण्याच्या व्यवसायात मकरंद प्रधान यांनी संधी शोधली. त्यांच्या सीपी वर्ल्ड ग्रुपने जगात १४०० कोटी तर देशांतर्गत कंपनीने ३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. युरोप, आशिया, अफ्रिका, आखात व अमेरिका अशा जगभर पसरलेल्या उद्योगाबरोबरच प्रधान यांनी भारतातही मोठा विस्तार केला...
दाही दिशा व्यापाराच्या
July 14, 2017
ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्यावरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली.
March 14, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti