(१ ऑगस्ट १७३४ - ११ डिसेंबर १७८३)
उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वार्या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली, पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकडया तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या, पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पूण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साहय करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता. तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले, पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेस स्वस्थ बसून राहिला.
March 11, 2015
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले.
July 9, 2022
आपण स्वच्छ राहतो. आपले घर स्वच्छ ठेवतो आणि कचरा घराबाहेर कुठेही टाकतो. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपली अनास्था ठळकपणे दिसते. ही अनास्था संत गाडगेबाबांनी ओळखली आणि स्वच्छतेसाठी हाती खराटा घेतला. त्यांचा औरंगाबादचे खंडुजी गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक नाटकांचे लेखन, अभिनय यात लोकप्रियता मिळवूनही लोककलेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता अभियान महाराष्ट्रा बरोबरच राज्याबाहेरही पोहचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
स्वच्छतेचा संदेशयात्री
July 14, 2017
सदाशिव अमरापूरकर यांनी ३०० पेक्षाही अधिक हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषिक चित्रपटांमधुन खलनायक तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या
April 14, 2010
भारत सरकारतर्फे “अ” क्षेत्राच्या कथ्थक नृत्यांगना म्हणून मान्यता मिळालेल्या आणि गेली तीस वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ता जोशी या ठाण्यातील कलारत्नांपैकी एक ! ठाण्याच नाव कोरिया, चीन, कंबोडिया, ग्रीस या देशांमध्ये पोहोचवण्याचा आणि उज्वल करण्याचा मान मुक्ता जोशी यांच्याकडे जातो
May 29, 2014
सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद, पुढे युतीने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन ठाणे व नवीमुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ साली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध मंत्रीपद गणेश नाईक यांनी भुषविली आहेत. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक प्रथमत: खासदार म्हणुन निवडून आले.
त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या दुरदृष्टीमुळे वा माणसे ओळखण्याच्या त्यांच्या विलक्षण कसबामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांमध्ये भरणारी अशीच राहिली आहे. आपल्या कार्यकाळात नाईक यांनी जव्हार, मोखाडा, कल्याण, उल्हासनगर, पालघर, वसई, मिरा-भाईंदर, विक्रमगड, ठाणे शहर व नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी जनता दरबार आयोजित करून सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व असंख्य समस्यांना नाईक यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले होते.
कामगार मंत्री असताना अनेक गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, बालकामगारांचे पुनर्वसन, राज्यातील असंख्य सुरक्षा कामगारांना वेतन हमी, असंघटित कामगारांसाठी समान वेतनाची तरतुद, कंत्राटी कामगारांच्या समस्या अशा प्रकारचे कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. विशेष म्हणजे कामगार मंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांप्रमाणे वेतन देण्याची तरतूद करून त्यांनी आपल्या देशापुढे माणुसकीचे अनोखे उदाहरण सादर केले होते. पर्यावरण व वनमंत्री असताना वन कर्मचार्यांना पाचवा वेतन आयोग लागू करणाचे, व वन्य जीवांपासून संरक्षण करण्याकरिता लागणारी शस्त्रे त्यांना पुरविण्याचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार झाले होते. तसेच उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर घातली होती. भूगर्भातील उष्णतेवर तयार करण्यात येणरा विद्युतप्रकल्प ठाणे जिल्ह्यात सर्वप्रथम उभारण्यात यावा हे त्यांचे स्वप्न त्यांच्या वेगळेपणाविषयी बरेच काही सांगून जाते.
गणेश नाईक यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नवीमुंबईचे महापौर सागर नाईक व आमदार संजीव नाईक हे चालवत आहे. नवीमुंबई म्हणजे नाईक मुंबई अशी ओळख निर्माण ते यशस्वी झाले असा सूर उपरोधक पणे तर कधी मिश्कीलरित्या माध्यामातुन किंवा जनतेतुन निघत असतो.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.
January 12, 2015
दुर्गम आदिवासी भागात आरोग्याचा कानमंत्र देणार्या कार्यकर्त्यांची फौज डॉ. सतीश गोगुलवार यांनी उभी केली. या कामातून विश्वासाचा पूल बांधला गेला.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा लेख वाचा.
July 24, 2015
चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत.
December 15, 2010
काव्यसुर्य मंगेश पाडगावकर यांच्या सौभाग्यवती यशोदा पाडगावकर यांनी “कुणास्तव कुणीतरी“ हे २००० रोजी प्रकाशित झालेल्या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे साहित्यचिश्वात ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांचे पती मंगेश पाडगांवकर गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधीत, या आत्मवृत्ताला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे.
January 14, 2015
वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
May 23, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti