लता मंगेशकर
December 15, 2010
स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली.
July 26, 2022
ग्रामीण भाषा व आपल्या अंगणाबाहेरचे जग न अनुभवता देखील स्वत:च्या लेखणीने परिपुर्णता व प्रगल्भतेचा सुरेल संगम साधलेला दिसतो अश्या साहित्यिक म्हणजे उर्मीला पवार. त्यांचा जन्म ७ मे १९४५ रोजी झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले बालपण व्यतीत केले. एम.ए चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लेखनाला सुरुवात केली.
“सहावं बोट” हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. “दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास”, “उदान” या पाली भाषेतल्या ’तिपिटक सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथाचा अनुवाद तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार यांनी केले आहे. त्याशिवाय कथा, समीक्षा, कविता, एकांकीका, प्रवासवर्णन यासोबतच वैचारिक लेखन देखील उर्मिला पवार यांनी केले असून “चौथी भिंत”, “हातचा एक” हे कथासंग्रह “मॉरिशस-एक प्रवास” हे प्रवासावर आधारीत पुस्तक, “आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग”-(सहलेखिका मीनाक्षी मून) व “दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य असे वैचारिक लेखन करुन साहित्य वर्तुळात ठसा उमटवला. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.
“आयदान” या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचे व सामान्य रसिकांचे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लहानपणी त्यांनी जगलेले जीवन, व त्यांच्यासारख्याच हजारो स्वप्नाळू ग्रामीण कुमारिकांचे वास्तवदर्शी जीवन, व त्यांची स्वप्ने, महत्वाकांक्षा, भावविश्व, व समाजाकडून असलेल्या रास्त अपेक्षा या आत्मचरित्रात उत्कटपणे उमटल्या आहेत. याखेरीज, ग्रामीण संस्कृतीचे महत्वाचे पापुद्रे हळुवार उलगडणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली व प्रकाशित केलेली आहेत. मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा “बलुतं ते आयदान” अशीच केली जाते.
उर्मीला पवार यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये २००४सालचा "प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार", नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेचा 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
१३ व १४ जानेवारी २०१३ रोजी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उर्मिला पवार अध्यक्षा होत्या.
January 22, 2015
जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.
July 5, 2022
अभ्यंकर कृष्णा दामोदर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त खगोलभौतिकीतज्ञ, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र विभागप्रमुख.
December 15, 2010
बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
January 14, 2016
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत..
December 15, 2010
पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.
July 6, 2022
माणूस रंगांकडे जसा ओढला जातो, तितके शक्यतो रेखाटनाचे अप्रूप नसते. परंतु याच रेखाटनामध्ये एखाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्याइतके सामर्थ्य असते. नाशिकचे अशोक नागपुरे हे व्यक्तिमत्व जगभरात त्यांच्या रेखाटनासाठी प्रसिद्ध झाले. त्यांनी तयार केलेल्या २ हजार ७०० चौरस फुटांच्या पेन्सिल रेखाटनाची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसनेही घेतली.
केल्याने रेखाटन
July 14, 2017
सुधीर नांदगावकर, हे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष होते. त्यानिमित्त जगातील अनेक महोत्सवात ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आतापर्यंत बर्याच पुस्तकांचे लेखनही केले आहे.
May 23, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti