(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रामचंद्र शंकर वाळिंबे

    डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

      August 2, 2022


  • आनंद भाटे

    आनंद भाटे हे पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य. संगीत नाटकांतील नाटय़पदे आणि अभिनयामुळे मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे बालगंधर्व आणि शास्त्रीय संगीताबरोबरच संतवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांवर आपल्या आवाजाचे गारुड करणारे पं. भीमसेन जोशी या दोघांचीही गायनशैली पूर्णपणे वेगळी होती. आनंद भाटे हे दोघांना जोडणारा समान धागा आहे.

    अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली. आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आले.

    आनंद भाटे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/anand-bhate/

    # Bhate, Anand

      June 4, 2017


  • दया पवार

    दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो.

      December 15, 2010


  • ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

    निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.

      July 16, 2017


  • नारायण केशव बेहरे

    कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक नारायण केशव बेहरे यांचा जन्म ४ जुलै १८९० रोजी झाला.

      July 14, 2017


  • डॉ. कल्पना संजय जोशी

    गेली वीस वर्षे डॉ. कल्पना जोशी ह्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकतील, अशा प्रभावी औषधांचे संशोधन कार्यकरीत आहेत. त्या सध्या गोरेगांव येथील पिरामल लाईफ सायन्सेस या भारतीय औषध संशोधन संस्थेत औषधशास्त्र विभागाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 

      May 23, 2014


  • दिवाकर नारायण भिष्णूरकर (शाहीर योगेश)

    ‘जय भवानी-जय शिवराय.,’ ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार.’ हे शिवछत्रपतींचे गुणगान ऐकत-त्याच्यातील जोश कानात साठवत महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. या पंक्ती राज्यातील अनेक गायक मनसोक्तपणे गात आणि श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होई, मात्र त्या रचना नेमक्या कोणाच्या याची माहिती सर्वानाच नव्हती. मराठी मनांचा ठाव घेणारे या पंक्तींचे कर्ते होते शाहीर योगेश. योगेश ऊर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर.

    आपले काव्य आणि पोवाडे योगेश स्वत:च गात असत, तेव्हा त्यांचा आवेश पाहण्यासारखा असे, खडा आवाज ऐकण्यासारखा असे. तो ऐकण्याचे भाग्य लाभलेले मराठीजन त्यांच्या सादरीकरणाविषयी सांगतातच, पण त्यांच्या रचना दुसऱ्यांकडून ऐकलेलेही त्या पंक्तीतील चमक, देशप्रेम पाहून दिपून जात. शाहीर मूळचे विदर्भातील. अमरावती जिल्ह्य़ातील अंजनगाव सुर्जी या लहान गावात त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२८ ला झाला. आपल्या भावामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचनांकडे ओढले गेले. त्यांच्या रचना म्हणण्याचा छंद त्यांना लागला. मात्र त्यानंतर शाहीर पांडुरंग दत्तात्रेय खाडिलकर यांचा शाहिरी कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि शाहिरीतील तेजाने ते तिकडे आकर्षिले गेले. खाडिलकर यांचे पोवाडे गातगात ते स्वत:च रचना करू लागले. मराठी आणि हिंदीतील तब्बल पाचशे काव्यरचनाही त्यांनी केल्या. जुन्या मॅट्रिकनंतर चरितार्थासाठी त्यांनी पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली, पण त्यांचा खरा ओढा हा काव्यरचना करून त्या गाण्याकडे होता. त्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजीमहाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवछत्रपतींप्रमाणेच शंभूराजे, संत तुकाराम, रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, लहुजी वस्ताद साळवे, डॉ. हेडगेवार आदींवरही त्यांनी केलेले पोवाडे गाजले. त्यांची गीते चटकन ओठांत खेळू लागत आणि मग ती पाहतापाहता सर्वच जण गाऊ लागत. सातवीच्या एका पुस्तकात त्यांचे शिवबाचे गोंधळी हे गीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र त्यांचे नावच त्यात नव्हते, तसेच ‘देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था।’ या संभाजीमहाराजांचे यथार्थ चित्र रंगणारे गीतही कोणीतरी स्वत:च्या नावाने छापले. हे लक्षात आल्यावर आपल्या रचनांची पुस्तके प्रसिद्ध करण्याचे योगेश यांनी ठरविले. ‘शिव-मातृ वंदना’, ‘वीरश्री गाथा-पोवाडे’, ‘प्रहरी’ अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. केवळ शाहिरीला नव्हे तर राज्यातील सर्वच शाहिरांनाही कायम आठवणीत राहील अशी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शाहीर हिंगे यांच्या साथीने स्थापन केलेली शाहीर परिषद. १९६८ मध्ये स्थापन झालेल्या या शाहीर परिषदेच्या २६ जिल्ह्य़ांत शाखा सुरू झाल्या आणि शाहिरांचे प्रश्न सोडविण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरूवात झाली. आपल्या आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत म्हणजे तब्बल ८३ व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते, खडय़ा आवाजात ‘ही रात्र शाहिरांची’ सारखे कार्यक्रम गाजवत होते. मात्र अचानक काळाने त्यांना हिरावून नेले आणि खडय़ा आवाजातील शाहिरी आवाज मुका झाला.

      August 5, 2017


  • क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई

    दिलीप सरदेसाई यांची ओळख विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज
    अशी होती. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी मडगाव गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती. त्यावेळी गोवा राज्यात मध्ये तसे क्रिकेट कमीच होते. लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत. ते शाळेच्या अनेक स्पर्धेत टेबल टेनिस खेळले. परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे.

    त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे. दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम. एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली.

    एम. एस. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ' हिट विकेट ' करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.

    दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले.

    ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या. दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही.

    दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.

    दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ' दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.' दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे, गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.

    ३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.

    विजय मर्चंट यांनी दिलीप सरदेसाई यांना'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले.

    १९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.

    दिलीप सरदेसाई यांनी बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत यांच्याशी लग्न केले. असे म्हणतात दिलीप सरदेसाई हे नंदिनी पंत यांना दररोज एक पत्र लिहीत असत. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत.

    दिलीप सरदेसाई यांची पत्नी नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं.

    दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा. (

    8-Aug-2021)

    क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई स्मृतिदिन (2-Jul-2021)

    #DilipSardesai

      May 4, 2022


  • मोतीराम गजानन रांगणेकर

    वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत.

      December 15, 2010


  • नंदिनी बेडेकर

    शेवटी संगीत हे मृगजळ आहे. म्हणूनच संगीताच्या या अथांग सागरात डुबकी मारून कोणकोणती रत्नं हाताला लागतील काहीच सांगू शकत नाही. मग काही वेळा या प्रवासात गटांगळ्या सुद्धा खाव्या लागतील मात्र डगमगून नं जाता एकेका स्वराचा आधार घेऊन ही नाव तरून न्यावीच लागते. तेव्हा आणि तेव्हाच हे मृगजळ पार करणं शक्य आहे हे नंदिनी बेडेकर यांच्या या सांगीतिक प्रवासातून दिसून येईल.

      June 30, 2022