(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विश्वास महिपती पाटील

    पानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.

      August 2, 2017


  • डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

    भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते.

      January 22, 2010


  • राजेंद्र खेर

    बिंदुसरोवर, देह झाला चंदनाचा, देवांच्या राज्यात, धनंजय, दिग्विजय, गीतांबरी, दी साँग ऑफ सॅल्व्हेशन, उदयन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. राजेंद्र खेर यांचे पांडुरंगशास्त्री आiठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे ही झाली.

      July 26, 2022


  • चंद्रकांत केळकर

    चंद्रकांत केळकरांचा पेशा शिक्षकाचा असला तरी, त्यांचा पिंड सक्रिय कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. गेली तीस-चाळीस वर्षे त्यांनी केलेलं परिवर्तनाच्या चळवळीतील लिखाण, संघटन कौशल्य, चळवळीतील कृतिशीलता अशा चौफेर वाटचालीची दखल घ्यायालाच हवी .

      April 19, 2011


  • संत तुकाराम

    भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.

    तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.

    संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.

      March 12, 2015


  • अनंत हरि गद्रे

    अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्‍यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.

      June 18, 2022


  • लक्ष्मीकांत बेर्डे

    लक्ष्मीकांत बेर्डे हे हे मराठी रंगभूमी व चित्रपट तसंच हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता होय, त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला झाला.लहानपणापासूनच लक्ष्मीजींना विविध कलांची आणि अभिनयाची आवड असल्यामुळे गणेशोत्सवात व इतर सार्वजनिक कार्यक्रमा व महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेत आणि त्यामध्ये अनेकवेळा पारितोषिके पटकावली होती.

      March 13, 2014


  • यतिन टिपणीस

    यतिन टिपणीस गेली २३ वर्षांपासून ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत.

      May 16, 2014


  • नरेंद्र रघुवीर बोडके

    मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.

      July 10, 2012


  • पांडुरंग पाटील

    ठाणे महापालिकेचे नगरसेवक असलेले पांडुरंग पाटील.

    सामान्य करदात्यांना दैनंदिन आयुष्यात वाहतूकींच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मीतीबाबत भेडसावणार्‍या समस्यांच्या बाबतीत पांडुरंग पाटील यांनी अनेक ठोस पाऊले उचलून यासंबंधी अनेक योजना व कार्यक्रम अंमलात आणले आहेत. आपल्या प्रभागाला आधुनिकीकरण व नवविकासाचा मार्ग दाखवणारे सभागृह नेते अशी त्यांची ख्याती आहे.

    पाणी, रस्तेविकास, उद्यानविकास, मलःनिस्सारण योजना, व बी.एस.यू.पी. योजनेची अंमलबजावणी अशा पंचस्तरीय कामांना प्राधान्य देवून त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८७ मध्ये मुलभूत सुधारणांचे पर्व सुरू केले आहे.

      January 22, 2015