(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उमेश वासुदेव वाघमारे

    श्री. उमेश वाघमारे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यात झाले.

      October 4, 2010


  • शांता शेळके

    शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.

      July 28, 2017


  • डॉ. विजय जोशी

    लोखंडापासून निघणाऱ्या मळीचे रिसायकलिंग करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. भारतातील पद्मश्री पुरस्काराच्या दर्जाचा हा सन्मान आहे.

    डॉ. विजय जोशी हे मूळचे ठाणेकर. मो. ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी. त्यांनी व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअरींगची पदवी घेतली. त्यानंतर मास्टर्सही पदवी मिळवली.

    पुढे टाटा, हमफ्रीज् अॅण्ड ग्लेक्सो (आताची जेकब इंजिनीअरिंग) या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना २५० फूट उंच प्रिलिंग टॉवरच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंड येथील वास्तव्यात त्यांनी रस्तेबांधणीच्या कामात विशेष प्राविण्य मिळविले. गेल्या २० वर्षांपासून जोशी सिडनी येथे स्थायिक आहेत. तेथे स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यांसाठी कसे वापरता येतील या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

    लोखंडापासून निघणाऱ्या मळीचा (स्लॅग) उपयोग करून रस्ते बांधणीचे नवे तंत्र त्यांनी विकसीत केले. ऑस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते त्यातून बांधले गेले. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती , खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून २ कोटी टन (मुंब्रा पारसीक डोंगराएवढे पाच डोंगर भरतील एवठी खडी व माती) एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीची बचत झाली. याच कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने डॉ. विजय जोशी यांना ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

    इंजिनीअरींग बरोबरच संगीत, साहित्य, कला यातही जोशी यांना विशेष रुची आहे. सिडनीत येणा-या तमाम भारतीय कलाकारांचे आदरातिथ्य आपुलकीने करतात. सिडनीतले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यातही आणि त्यावर विविध कार्यक्रमांच्या आयोजनातही जोशी यांचा पुढाकार असतो. नैसर्गिक साधन संपत्ती वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे डॉ. विजय जोशी नेहमी सांगत असतात. शहराची निर्मिती आणि विकासाच्या प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर होत असतो. अलिकडच्या काळात या वापरावर कुठलेही निर्बंध राहिलेले नाहीत. बेसुमार जंगलतोड , खाडी व नद्यामतील वाळू तसेच छोट्या टेकड्या व मोठे डोंगर पोखरून दगड आणि मातीचा उपसा केला जातोय. त्यामुळे भविष्यात मानवी समाजासमोर अनेक संकटे उभी ठाकणार आहेत. याची जाणिव राज्यकर्ते आणि समाजानेही ठेवायला हवी असेही जोशी आवर्जुन सांगतात.


      August 9, 2017


  • (डॉ.) श्रीपाद कृष्ण बेलवलकर

    डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर हे लेखक, प्राच्यविद्या संशोधक होते. 

      January 4, 2021


  • कीर्ती शिलेदार

    संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

      June 24, 2022


  • श्रीधर गजानन माडगूळकर

    साहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.

      September 21, 2012


  • महात्मा बसवेश्वर

    महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहे. मर्‍हाटी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान केलं आहे.

    या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा विचारसरणीचा व कार्याचा फार मोठा प्रभाव विविध महाराष्ट्रीय धर्म सम्प्रदायांवरही तेराव्या शतकापासूनच पडला. हा इतिहास लक्षात घेतल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रभावकक्षा किती दूरगामी होती, याची कल्पना येते. महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्‍या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्‍या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच महाराष्ट्रावरही पडला. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होय. यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाला. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झालं.

    महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.नाच्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते.

    ११०५ हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म - सन. बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करीत. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होत. मुंजीसारखे विधी/कर्मकांड अनावश्यक आहेत, असं त्यांचं मत असल्यानं त्यांनी मुंज करुन घेण्यास विरोध केला. त्याच प्रमाणं देवदासी, बळी देण्याची प्रथा,

    व्यवसाय व जाती यांच्यातील श्रेष्ठकनिष्ठता, कर्मकांड हा त्यांना मान्यच नव्हतं. त्याला विरोध करुन त्यांनी नवसमाजनिर्मिती केली. सनातनी कर्मठांचा विरोध पत्करुन आचार्य जातवेदमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. प्रथम करणिक असलेले महात्मा बसवेश्वर पुढे कोषागार मंत्री झाले. पण प्रचाराचं कार्य त्यांनी लोकाभिमुख केलं व त्याला समताधिष्ठित, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न्याय देणारी प्रशासन-व्यवस्था निर्मिली.

    इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, कर्म हेच कैलास (काय कवे कैलास ) या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणलं. त्यांच्या पुरुष अनुयाना शिवशरण व स्त्री अनुयायांना शिवशरणी म्हणतात. असे ७०० शिवशरण व सत्तर शिवशरणी होत्या. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनुभव मंटप या विचारपीठाची स्थापना केली व त्यांच्या या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चांभार ब्राम्हण-विवाहासारखे उपक्रम सुरु करुन त्यांनी समाजाची मानसिकता बदलली.

    त्यांच्या विचारांना 'वचन' म्हणतात. त्यातून वीरशैवांचं 'वचनसाहित्य' निर्माण झालं. वीरशैव धर्माच्या तत्त्वज्ञ
    नाचा गाभा म्हणजे षट्स्थलसिध्दान्त होय. वीस वर्ष शासनाच्या महत्त्वाचा पदावर राहून त्यांनी कार्य केलं नंतर पूर्णतया धर्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या कार्याला राहून घेतलं. कायक, दोह, सदाचार, समता व धर्मभावना ही त्यांच्या कार्याची 'पंचसूची' होती .

    महात्मा बसवेश्वरांमुळं नवचैतन्य लाभलेला वीरशैव धर्म हा भारतातला एक प्रमुख धर्म आहे.

    ## Mahatma Basaveshwar

      August 22, 2010


  • सुरेशचंद्र नाडकर्णी

    नाडकर्णी, सुरेशचंद्र

    प्राणिशास्त्र हा आयुष्यभराचा अभ्यासाचा विषय. फक्त डॉक्टरेट मिळविण्याएवढाच या विषयाचा अभ्यास न करता ४० वर्षे विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याचे भाग्य लाभलेले डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे लौकिक जीवन मात्र त्यांच्या अन्य अनेक कलागुणांमुळे सतत नजरेसमोर राहिले.

    क्रीडा, संगीत, साहित्य आणि विज्ञान अशा क्षेत्रांत चौफेरपणे वावरणाऱ्या नाडकर्णी सरांचे निधन त्यामुळेच चटका लावणारे ठरले आहे. फारसी आणि उर्दूमिश्रित स्वरोच्चाराने समोरच्यावर सहजपणे छाप पाडणारे नाडकर्णी जेव्हा हिंदीतून बोलायला लागत, तेव्हा ते बहुधा पेशावरचे असावेत, असा समज व्हायचा. गजल हा जसा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय, तसाच संगीत! बेगम अख्तर या त्यांच्या गुरू आणि त्यांची ठुमरी हा त्यांचा श्वास! अख्तरबाईंवर ते बोलायला लागले की, श्रोताच हरखून जायचा. त्या वेळी हे गृहस्थ ‘सर्प’ या विषयावर तपश्चर्या करीत होते, यावर कुणाचा कसा विश्वास बसणार? प्राणिशास्त्रावर डॉ. नाडकर्णी यांची १०-१२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि क्रीडा ज्ञानकोशकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खो खो, कुस्ती, मल्लखांब, हॉकी, ब्रीज या खेळात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या नाडकर्णी सरांनी टेबल टेनिस या खेळात महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते. ज्ञानाची तहान भागली नाही म्हणजे जी तडफड होते, ती नाडकर्णी यांच्यामध्ये दिसत असे. वेगवेगळय़ा विषयांवर अक्षरश: प्रभुत्व असतानाही आणखी काही करण्याएवढी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून यायची, हे सगळय़ांना पडलेले कोडे असे. आकाशवाणीवर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्व. सुरेशबाबू माने यांच्यावर कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. मग अनेकांना भेटून त्यांचे ध्वनिमुद्रण मिळविले आणि एक सुरेख कार्यक्रम सादर केला.अशा कामांमध्ये त्यांना जो आनंद मिळत असे, तो त्यांच्यालेखी अवर्णनीय असे. बहुतेक सगळय़ा क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत असल्याने आणि अनेक भाषांवरही प्रभुत्व असल्याने अशा सगळय़ा खेळांसाठी ते निवेदनआणि समीक्षा करीत असत. ‘उर्दू काव्यातील देशप्रेम’ अशा विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवणाऱ्या नाडकर्णी सरांचे ‘गज़्‍ाल’ हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उर्दू मुशायरे आयोजित करण्याची त्यांची धडपड असे. या सगळय़ा व्यासंगावर मात म्हणून नाडकर्णी यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक याही विषयात विशेष अभ्यास केला. मानवाच्या पृथ्वीवरील उत्पत्तीसंबंधी नवीन शास्त्रीय विवेचन करणारे ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले. नॉस्ट्रेडेमस या भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा खटाटोपही नाडकर्णी यांनी केला. इतक्या सगळय़ा विषयांचा पसारा आपल्या आयुष्याला बांधणारा हा माणूस गप्पांच्या मैफलीत बादशहा न होता, तरच नवल! पण माणसांच्या गराडय़ात राहूनही स्वत:चा व्यासंग सतत वाढवीत नेणारा संशोधक आणि अभ्यासक म्हणून आपले स्थान त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांच्या निधनाने या सगळय़ाच विषयांमध्ये नव्याने प्रवेशणाऱ्यांचा एक फार मोठा आधार गेला आहे.

      August 5, 2017


  • चंद्रकांत देवताले

    अब मुद्दत बाद सुना है की दिन रात लिख रहा है

    संभालकर- चिडीयों के जवाब, खोल दिया है उसने बीचोंबीच आकाश के, मँझरात एक डाकघर
    हिंदीतील ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताले यांच्या ‘पत्थर फेंक रहा हू’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता त्यांच्या प्रतिभेचा आणि अनोख्या प्रतिमा योजनांचा अविष्कार घडवते.

    अन्य भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठी अनुवाद करण्याची परंपरा काही वर्षांत ‘पॉप्युलर’ झाल्याने मराठी रसिकांनी देवतालेंच्या प्रतिभेची केव्हाच दखल घेतली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ देवतालेंना शनिवारी नाशिकमध्ये देण्यात आला. त्यापूर्वी हिंदीतील ज्येष्ठ कवींनी एकत्र येऊन सुरू केलेला पहिला ‘कविता समय’ हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या देवतालेंना आजवर अनेक पुरस्कार लाभले आहेत. मात्र हे पुरस्कार त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत.

    भूखंड तप रहा है, पत्थर की बेंच, इतनी पत्थर रोशनी आदी ११ काव्यसंग्रह गाठीशी असणाऱ्या या कवीला सन्मानित करावे, असे साहित्य अकादमीला अद्याप वाटले नाही. हा कवी खरं तर ज्ञानपीठ पुरस्काराच्या योग्यतेचा. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील जौसखेडा येथे जन्म झालेले देवताले मराठीला मावशीची बोली मानतात. मराठी कवितेतील नवे-जुने प्रवाह त्यांना ज्ञात आहेत. नामदेव ढसाळ, चंद्रकांत पाटील आणि कै. दिलीप चित्रे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री. त्यामुळेच चित्रेंच्या काही कविता त्यांनी हिंदीत नेल्या तर देवतालेंच्या कविता चंद्रकांत पाटील यांनी ‘तिची स्वप्ने’ या काव्यसंग्रहाद्वारे मराठीत अनुवादीत केल्या आहेत. हे कमी म्हणून देवताले यांनी संत तुकारामांच्या दीड एकशे अभंगांचा अनुवाद हिंदीत येऊ घातला आहे.

    मराठीशी असलेल्या या जवळीकीमुळे चव्हाण विद्यापीठाने केलेला गौरव देवतालेंना सुखावून गेला असेल. शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेला हा कवी डाव्या विचारसरणीशी बांधिलकी मानतो. स्त्रीच्या विविध भूमिका-नाती आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारा सर्वसामान्य माणूस देवतालेंच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतो आणि म्हणूनच त्यांचा हात आजही लिहीता आहे. हिंदीतील शीर्षस्थ कवी गजानन माधव मुक्तीबोध यांना केवळ गुरूस्थानी न मानता त्यांच्या काव्यावर पीएचडी करण्याची कामगिरी देवतालेंनी केली आहे.

    आधुनिकतेच्या रेटय़ात हरवत चाललेला साधेपणा या कवीला अस्वस्थ करतो आणि त्यामुळेच ते तुमच्या-आमच्यातील होऊन जातात. शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकीपासून प्राचार्यपदाचा अनुभव घेतलेल्या या कविचे सभोवतालच्या सामाजिक बदलांबाबत अखंड चिंतन सुरू असते. या चिंतनाला उपजत प्रतिभेची जोड मिळते आणि अस्वस्थ करणाऱ्या शब्दांच्या लडी उलगडत जातात. या चिंतनामुळेच वयाच्या या टप्प्यावरही त्यांची सृजनशीलता अखंडपणे टिकून आहे. याच अस्वस्थतेमुळे लेखणी म्यान करून वयाच्या ज्येष्ठतेची साथ घेऊन मोठेपणा वसूल करणे त्यांना मान्य नाही. विचार ठासून मांडणारे विचारवंत व्यक्तीगत पातळीवर दांभिकही असतात.

    आत्मपरिक्षणाचे त्यांना वावडे असते. देवताले मात्र स्वत:ला ही संधीही देत नाहीत. सर्वसामान्य माणूस सर्वार्थाने सबल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या या कवीला याच सर्वसामान्यांपासून आपण लांब गेल्याची जाणीव आहे, हे त्यांचे वेगळेपण!

      August 5, 2017


  • दुर्गा नारायण भागवत

    एक विदुषी, तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इ. विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. दुर्गाबाईंचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला.

      February 4, 2010