(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ अभिनेते प्राण

    प्राण किशन सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवले. खलनायक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. लोकांमध्ये त्यांची भिती अशाप्रकारे होती,की त्याकाळी कुणीच आपल्या मुलाचे नाव प्राण ठेवत नव्हते. मात्र “उपकार’मधील मलंग चाचाच्या भूमिकेनंतर त्यांची पडद्यावरील प्रतिमा साफ बदलून गेली.

  • सनदी अधिकारी तुकाराम मुंढे

    तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहील्यांदाच CEO ने डॉक्टरला निलंबित केले होते.

  • प्रतिभाताई पवार

    शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील.

    प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार.

    नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • इटालियन नाटककार व अभिनेते दारियो फो

    नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक विषयाची फार्सशी सांगड घालणारे इटालियन नाटककार दारियो फो यांनी इटालियन भाषेत लिहिलेल्या नाटकांचे अनुवाद व प्रयोग इंग्रजीसह मराठी, बंगाली, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम् आदी भारतीय भाषांतूनही झाले आहेत.

  • गीता दत्त

    गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) यांचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. गीता दत्त यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. १९४६ साली ललिता पवार यांचे पती हनुमानप्रसाद यांनी प्रथम गीता दत्त यांना गाण्यासाठी पहिला ब्रेक दिला. गीता दत्त यांनी १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. १९४६ ते १९६६ या २० वर्षाच्या काळात गीता दत्त यांनी अनेक प्रकारची, वेगवेगळय़ा ढंगाची, मूडची आणि बाजाची गाणी गायिली. त्यांच्या आवाजात मादकता होती, पण संयत अन् जीवघेणी.

    ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्यांनी तर काळजाचा ठोका चुकावा, पण तोच मादक, मदिर आवाज ‘मै तो प्रेम दिवानी’, ‘मेरा दर्द न जाने कौन’ किंवा ‘घुंघट के पट खोल तोहे पिया मिलेंगे’ अशा भजनांमध्ये तितकाच लीन-तल्लीन होताना दिसतो. गीता दत्त यांनी पुरुष गायकांसोबतही तितक्याच आत्मविश्वासाने गाणी गायिली. ‘खयालो में किस के इस तरह आया नहीं करते’ हे ‘बावरे नैन’मधलं गीत मुकेशबरोबर गाताना त्याच्या दमदार आवाजाला ताकदीने साथ दिली. तशीच ‘न ये चाँद होगा ना तारे रहेंगे’ गाताना हेमंतकुमारच्या भारदस्त आवाजापुढे ती दबली किंवा कोमजली नाही. ‘हम आप की आँखो को इस दिल में बसा ले तो’ या महंमद रफीबरोबरच्या गाण्याला खेळकर साथ देणारी गीता दत्त असते. गीता दत्त यांनी मराठी गाणीसुद्धा गायिली आहेत, ‘मुक्या मनाचे बोल सजना, बोल झाले फोल’ किंवा ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला, म्हणावे न्या तुझा सीतेला’ ही मराठी गाणी गाणारी गीता दत्तच होत्या यावर विश्वास बसत नाही.

    गीता दत्त यांनी संगीतविश्वात आपल्या सुरांनी चौफेर सैर केली. गाण्याच्या आशयाला आपल्या वैविध्यपूर्ण सुरावटींनी न्याय दिला. आपल्या विशिष्ट आवाजाची छाप संगीतक्षेत्रात उमटवली होती. असं असूनही तिच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नाही. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी त्यांनी विवाह केला. गुरुदत्त नावाच्या शोकांतिकेचा गीतादत्त ही एक हिस्सा होती. ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहाँ है’ असं म्हणणारा गुरुदत्त, स्त्रीजीवनाचं वास्तव आपल्या कॅमे-याच्या तीक्ष्ण डोळ्यांतून टिपणारा गुरुदत्त गीताला स्वत:च्या चित्रपटांखेरीज इतरत्र गाऊ देत नव्हता, हे वास्तव नाकारता येत नाही. संगीतक्षेत्रात आणि व्यक्तिगत आयुष्यातही गीतादत्तच्या वाटय़ाला उपेक्षाच आली. ज्या मधूर-मदिर आवाजावर लुब्ध होऊन गुरुदत्तने गीता दत्तशी प्रेमविवाह केला होता, त्याच गीताला गुरुदत्तने वहिदा आयुष्यात आल्यानंतर दुरावलं होतं. गीता दत्त यांचे २० जुलै १९७२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=KsMrpO0YuxY

  • वॉलमार्ट’चे जनक सॅम वॉल्टन

    १९८० च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.

  • वसंत देसाई

    हिंदी चित्रपट संगीतकारांचा विचार करताना, बरेचसे संगीतकार हिंदी चित्रपटांपुरते किंवा हिंदी भाषिक गीतांपुरते आपले अस्तित्व ठेवतात. यात अगदी इतर भाषिक संगीतकार जसे बंगाली, मराठी, पंजाबी दक्षिण भारतीय संगीतकार (जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांसाठीच स्वररचना करीत होते) यांनी आपली कारकीर्द हिंदी चित्रपटाभोवतीच साकार केली. अर्थात हे त्यांची मर्यादा असे म्हणता येणार नाही पण त्यांनी हिंदी चित्रपट हेच आपले ध्येय ठेवले. या मताला सणसणीत अपवाद म्हणून वसंत देसाई यांचे नाव अवश्यमेव घ्यावेच लागेल.

    कोकणपट्टीतील सावंतवाडी जवळील सोनवड गावी जन्म. हा तपशील जरा महत्वाचा म्हणायला लागेल कारण हा परिसर धर्म आणि लोकसंगीताने गाजणारा आहे. याचा प्रभाव आणि परिणाम वसंतदेसायांवर नक्कीच झाला असणार. त्यांच्या नंतरच्या कारकिर्दीचा बारकाईने आढावा घेतला तर वरील मताला पुष्टी मिळते.

    संगीतात लहानपणापासून अतोनात रस, याची परिणीती, उस्ताद इनायत खान आणि डागर बंधू, यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताची तालीम घेतली. वसंत देसायांच्या स्वररचनेवर रागसंगीताचा फार प्रभाव आहे, याचे मूळ इथे सापडू शकते. पुढे तरुण वयात प्रभात कंपनीत, गोविंदराव टेबे यांच्या हातखिळी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि प्रभात कंपनीत स्थिरावले. इथे त्यांना व्ही. शांताराम भेटले आणि नंतर जेंव्हा व्ही. शांतारामांनी प्रभातपासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला तेंव्हा वसंत देसाई यांना तिथे भरपूर संधी मिळाल्या. या दोघांना प्रभातचा वारसा मिळाला होता, हे मुद्दामून ध्यानात ठेवावे लागेल. समान विचार आणि ध्येये यांचा परिणाम दोघांच्याही कार्यात दिसला. राजकमल बरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले.

    वास्तववादी चित्रपटनिर्मितीत ज्याचा उद्भव होतो त्या संगीतावरच भर असल्याकारणाने विविध आणि वास्तव ध्वनी-उगम वापरण्यावर देसाई यांचा कटाक्ष होता. उदाहरणार्थ, " डॉ आँखे बारा हाथ" या चित्रपटातील "सैय्या झुठो का बडा सरताज निकला" या गाण्यात "रावणहथ्था" या लोकवाद्याचा समर्पक उपयोग!! तसेच याच चित्रपटातील "ऐ मालिक तेरे बंदे हम" या गाण्यात योजलेला लयबंध वाऱ्याने उघडझाप करणाऱ्या खिडकीने पुरवला जातो.

    वसंत देसाईंच्या रचनांत थोडाफार नाट्यगीतांचा गंध राहिलापण हे थोडे अपेक्षित असेच म्हणावे लागेल. याशिवाय असे जाणवते, पारंपरिक सांगीत चलने आणि चाली यांच्या अंगभूत सांगीत आकर्षणशक्तीवर विश्वास असल्या कारणाने त्या जशाच्या तशा व परिणामकारकतेने वापरण्यात त्यांनी मागेपुढे पहिले नाही. याचाही संबंध मराठी नाट्यसंगीताशी असलेल्या त्यांच्या जवळच्या नात्याचा असावा. हिंदुस्थानी कलासंगीताचा आपण यथातथ्य वापर करतो असा मराठी नाट्यसंगीतपरंपरेचा दावा बऱ्याच अंशी सार्थ असतो, हा दृष्टिकोन इथे महत्वाचा आहे. या परंपरेचा आणि देसाई यांचाही कलासंगीतास पातळ करून वापरण्यावर भरवसा नव्हता. उदाहरणार्थ "दिल का खिलौना हाये टूट गया" (भैरवी), "बोल रे पपीहरा" ही गाणी ऐकावीत. तसेच "गुड्डी" या चित्रपटातील गाणे - हमको मन की शक्ती देना - या प्रार्थना गीताला केदार या शांत-गंभीर रागाचा आधार आहे पण रागविस्ताराची अपेक्षा निर्माण होऊ नये अशी खबरदारी चालीच्या चलनातून घेतली आहे. या उलट "बोल रे पपीहरा" ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहेरवासारख्या तालात बांधून जरा हलकी फुलकी केली आहे. याचाच वेगळा अर्थ असा घेता येतो, परंपरेत राहून प्रयोग करण्याकडे देसायांचा कल होता.

    "झनक झनक पायल बाजे" या चित्रपटातील "नैन सो नैन" या गाण्यासाठी "मालगुंजी" रागाचा आधार घेतला आहे आणि हा राग प्रेम-प्रणय इत्यादींसाठी वारंवार वापरलेल्या बागेश्रीपासून नाजूक अंतर राखून असतो म्हणजे तास ठेवावा लागतो. याच चित्रपटातील, भारताच्या अनेक प्रांतांत प्रचलित "बारमासा" या पारंपरिक लोकगीतप्रकारच्या धर्तीवर त्यांनी ऋतूवर्णनपर पद्यें योजली आहेत. या रचनांना गीतांचे स्वरूप न देता केवळ चाली ठेवण्यात देसाई यांनी परंपरेत राहून थोडा बदल करण्याच्या रचनापद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे त्यांच्यावर काही बंधने आली हे खरे, पण त्याचबरोबर तयार चाली व त्यासाठी सज्ज ऐकणारेही निश्चित झाले. "जो तुम तोडो पिया" किंवा " ऐ मेरे दिल बता" या रचनासुद्धा ठरीव दृश्यांसाठी साचेबंद संगीत, वसंत देसाई कसे वापरीत असत, याची कल्पना येते,

    आणखी एका बाबीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. व्ही. शांतारामांसाठी काम करताना केलेल्या रचना नाट्यप्रभावित वास्तववादाला धरून असत पण इतर चित्रपटांसाठी त्यांचे धोरण वेगळे रहात असे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी दिलेले "मेघा बरसने लगा है आज की रात" - शक चित्रपटातील गाणे अधिक वेधक उदाहरण म्हणून मांडता येईल. राजकमलसाठी केलेल्या संगीतरचनांत न आढळणारे विशेष अशा संगीतरचनांत आढळतात याचा वेगळा अर्थ, त्यांच्या सर्जनशीलतेस व्यापक रूप होते.

    वसंत देसायांच्या पुढील सांगीतिक रचनांचा आराखडा अत्यंत व्यामिश्र तसेच परंपरेत राहून प्रयोग करणारा आणि नंतरच्या काळात आधुनिक वाद्यांच्या सहाय्याने अधिक गुंतागुंतीचा होता, असे विधान ठामपणे करता येते. अशी प्रतिभा लाभलेला संगीतकार विरळाच असतो. एका बाजूने हिंदी चित्रपट, दुसरीकडे मराठी चित्रपट आणि तिसरीकडे मराठी रंगभूमीवरील कामगिरी - इतका व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे हाताळणे, हीच खरी वसंत देसायांची सर्जनशीलता म्हणायला लागेल.

  • अभिनेत्री मुक्ता बर्वे

    जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणा‍‍‍र्‍या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.

  • भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

    डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला.