(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी साहित्यिक, गीतकार प्रवीण दवणे

    प्रवीण दवणे यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९५९ रोजी झाला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. प्रवीण दवणे यांनी विविध माध्यमांतून वाड्मयच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथसंपदा सुमारे साठ पुस्तके मा.प्रवीण दवणे यांच्या नावावर आहेत. “सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह मा.प्रवीण दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत. तर "आई परत येते", "स्माईल प्लीज", "श्रीयुत सामान्य माणूस","प्रिय पप्पा" ही नाटके रंगमंचावर आली आहेत. मा.प्रवीण दवणे यांनी सुमारे ठकास-महाठक, झपाटलेला, आम्ही असू लाडके, आम्ही सातपुते,शुभमंगल सावधान, अदला बदली अशा १२५ मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत. मा.प्रवीण दवणे हे त्यांच्या कविता, लेख, लेखमाला या साठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याही पेक्षा ते एक सामजिक जाणीव असलेला माणूस म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहेत. मा.प्रवीण दवणे यांना सर्वोत्कृष्ट वाडम़याचा राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, मा.दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

    आपल्या ठाण्याविषयी बोलताना मा.प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चिकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचं ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    प्रवीण दवणे यांची काही गाणी.
    कसा प्रकाश पाझरे, घन करुणेचा सूर, चल्‌ झेलूया गाणे, चिंब भिजलेले, ज्यास देव सापडला, तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी, तेजोमय नादब्रह्म हे, दे साद दे हृदया,
    दोन रात्रीतील आता संपला, निघालो घेऊन दत्ताची, पाऊस पहिला जणु कान्हुला, माघाची थंडी माघाची, मुक्या हुंदक्याचे गाणे, ही वाट कुणी मंतरली

    प्रवीण दवणे यांचे कविता वाचन.
    https://youtu.be/NZRFsS729a4
    https://youtu.be/oXiXGHtuqwI

  • ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल

    श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.

  • अनिल बिस्वास – चित्रपट संगीताचे आद्यपीठ

    या संगीतकाराला भारतीय संगीताची प्रचंड आवड होती आणि त्यासाठी कुठलीही लोककला आत्मसात करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे, एक फायदा झाला, त्यांच्या गाण्यात सुश्राव्यता तर आलीच पण लोकसंगीतातील “टिकाऊपणाचा” जो अंगभूत गुण असतो, त्या गुणाचा, या संगीतकाराने केलेल्या गाण्यांना फायदा आपसूकच मिळाला.

  • शतकातला श्रेष्ठ कलावंत, महानायक, अंग्री यंग मॅन – “अमिताभ बच्चन” !

    आज महानायक मा.अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. त्यांचा जन्म. ११ ऑक्टोबर १९४२. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.
    'शतकातला श्रेष्ठ कलावंत' हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं :'हे सर्व कोठून येतं?'
    मा.अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महा विद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महा विद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
    मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची "अंग्री यंग मॅन" ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच 'सुपरस्टार' पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले.
    आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
    मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
    १९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली.
    २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
    फक्त काम करत नाही तर वेगळ्या भूमिकांच्या शोधात ते असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात ‘तरूण’ आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या अभिनय प्रवासबद्दल....
    अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली असली तरी त्यांचा पहिला सिनेमा १९६९ साली आलेला ‘भूवा शोमे’ हा होता. या सिनेमात त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून काम केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमितजींना खरी लोकप्रिय आणि ओळख मिळाली ती १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’ या सिनेमातून. या सिनेमापासून तयार झालेली त्यांची अ‍ॅंग्री यंग मॅन इमेज आजतागायत कायम आहे.
    पहिला पगार ८०० रूपये -
    करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीमध्ये अनाऊंसर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना त्यांच्या आवाजामुळे नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांना महिन्याला ८०० रूपये पगार होता. त्यावेळी दिलीप कुमार आणि आशा पारेख या हे त्यांचे आवडते कलाकार होते.
    ७ फ्लॉपनंतर पहिला हिट सिनेमा -
    १९६९ ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमात त्यांना पहिली संधी मिळाली. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २० सिनेमांमध्ये काम केले. पण तेही फ्लॉप झाले. पण ‘जंजीर’ सिनेमाने त्यांचं नशीब बदललं.
    पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार -
    १९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांना एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
    राजकारणात अपयश -
    अमिताभ बच्चन यांनी राजकारणातही नशीब आजमावलं. पण त्यांना तिथे यश आलं नाही. नंतर ते इलाहाबादचे खासदारही राहिले होते. पुढच्या तीन वर्षात त्यांनी राजीनामा दिला होता.
    रेखा-जया नव्हत्या पहिलं प्रेम -
    अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने खुलासा केला होता की, जया किंवा रेखा त्यांचं पहिलं प्रेम नव्हत्या. त्यांचा एका महाराष्ट्रीय मुलीवर जीव जडला होता. एका ब्रिटीश कंपनीत ही मुलगी काम करत होती. अमिताभ आणि ती मराठी मुलगी एकाच कंपनीच काम करत होते. अमिताभ यांना तिच्याही लग्नही करायचं होतं. मात्र तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर अमिताभ हे मुंबईत आले.
    रोज ओढायचे सिगारेट -
    अमिताभ बच्चन तरूणपणी सिगारेट ओढायचे. त्यासोबतच ते मद्यही प्यायचे. पण त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं. आता ते शुद्ध शाकाहारी आहेत.
    पेन आणि घडाळ्यांचे शौकीन -
    अमिताभ बच्चन यांना पेन गोळा करण्याचा हौस आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे १००० पेक्षा जास्त पेन आहेत. त्यासोबतच त्यांना घडाळ्यांचीही आवड आहे. एकदा घातलेली घड्याळ ते पुन्हा घालत नाहीत.
    दोन्ही हाताने लिहितात -
    अमिताभ बच्चन यांना इंजिनिअर व्हायचं होत. त्यासोबतच त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये भरती व्हायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यांची खासियत म्हणजे ते दोन्ही हाताने लेखन करू शकतात.
    २४०० कोटींची संपत्ती -
    मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकदे तब्बल २४०० कोटींची संपत्ती आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ११ लक्झरी कार्स आहेत.
    संदर्भ:- इंटरनेट
    - गणेश उर्फ अभिजित कदम

  • मन्ना डे

    मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

    मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

    मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक बासू चटर्जी

    सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. त्यांचा जन्म १० जानेवारी १९३० रोजी झाला. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बसस्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले. म्हणजे पुन्हा चित्रीकरणाचे दिवस ते किती? फार-फार तर पस्तीस-चाळीस. तेदेखील बातो बातो में कधी निघून जात, हे समजतही नसेल. पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. मा.हृषिकेश मुखर्जी आणि मा.बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्याज मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. मा.राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.मा.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ अभिनेत्री पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

  • दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

    चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी लाहोर येथे झाला. देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेला चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते. आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया' या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.

    आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला "हकीकत " हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते. बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात 'कर चले हम फिदा जानेमन साथियो" या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद "गाईड" चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला "हकिकत" या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला. पण "हकिकत" हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी "किनारे किनारे "हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी 'हकिकत'नंतर "आखरी खत",हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी "जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. "परमवीर चक्र" ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली.

    नवकेतनचा "कालाबाजार"मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..
    चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले. चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो "हिर रांझा"असेल वा "हसते जख्म..नीचानगर त्यांच्या "हकिकत"या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे

  • वाणी जयराम

    वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.

    वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.

    ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.

    ‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.

    ‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls

  • ए. के. हनगल

    शोले' चित्रपटातल्या 'इतना सन्नाटा क्यों है भाई ?' हा संवाद अजरामर करणारे आणि अनेक चित्रपटांमध्ये वयस्कर वडील आणि आजोबांच्या व्यक्तिरेखांमुळे सर्वसामान्यांच्या परिचयाचे असलेले चरित्र अभिनेते अवतार किशन उर्फ ए.के. हनगल म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. जुन्या चित्रपटांमध्ये नायक किंवा ना‌यिकेचे वडील म्हणजे ए.के. हनगल अशीच प्रतिमा चित्रपट रसिकांच्या मनांमध्ये होती. काश्मिरी पंडितांच्या घरात जन्मलेल्या हनगल यांचे मूळ पाकिस्तानमधील सियालकोट येथील. परंतु आईच्या निधनानंतर त्यांचे लहानपण पेशावर येथे गेले. १९३७-३८ मध्ये 'जुल्म-ए-कंस' या नाटकातील नारदाची व्यक्तिरेखा साकारून हनगल रंगभूमीवर पदार्पण करते झाले. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी शिंपी बनण्याचेठरवले. १९२९ च्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातही उडीघेतली. १९४७ ते १९४९ अशी दोन वर्षे त्यांनी कराचीच्या मध्यवर्ती कारागृहात कारवासही भोगला. डाव्या विचारसरणीचे हनगल स्वातंत्र्यसंग्रामात लढत असतानाच रंगभूमीकडे आकर्षिले गेले. १९४७ मध्ये 'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'च्या (इप्टा) अहमदाबाद येथील वार्षिक परिषदेला त्यांनी हजेरी लावली. भारतातील या पहिल्या प्रवासा नेत्यांना भुरळ घातली. तेथे सादर झालेल्या आशयघन नाटकांनी त्यांचे चित्त वेधले. के. ए. अब्बास, बलराज सहानी, डॉ. राजाराव आणि दिना पाठक यांच्या सारख्या मातब्बर सिनेकर्मींशी त्यांची मैत्री झाली.

    पन्नासच्या दशकात अवघे २० रुपये घेऊन हनगल यांनी आपले वास्तव्य मुंबईला हलविले. बलराज साहनी आणि चेतन आनंद यांनी हनगल यांना चित्रपटात काम करण्यास प्रोत्साहन दिले. प्रारंभी काहीसे अनुत्सुक असलेले हनगल, राजकपूर यांच्या 'तिसरी कसम' या चित्रपटासाठी प्रथमच कॅमेरा समोर उभे राहिले. प्रत्यक्ष सिनेमात मात्र त्यांची व्यक्तिरेखा कापण्यात आली. चाळीशी उलटत असताना हनगल चित्रपटसृष्टीत आले. हनगल यांच्या वाट्याला फार महत्त्वाच्या भूमिका आल्या नाहीत. मात्र, प्रत्येक चित्रपटातील त्यांची भूमिका लक्षात राहणारी होती. शोले, शौकीन, नमक हराम, आइना, अवतार, अर्जुन, आंधी, कोरा कागज, बावर्ची, गुड्डी, अभिमान, अनामिका, परिचय अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये हनगल यांनी भूमिका केल्या होत्या. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये हनगल आणि राजेशखन्ना अशी जोडी काय जमलेली होती. 'आपकी कसम', 'अमरदीप', 'नौकरी', 'थोडीसी बेवफाई', 'फिर वही रात' या सारख्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले. त्यानंतर मात्र चरित्र भूमिकां मधून ते प्रेक्षकांच्या भेटतच राहिले. समंजस, तत्त्ववादी, सुसंस्कृत असे वडिल हनगल यांनी पडद्यावर उभे केले.

    २००१ मध्ये आशुतोष गोवारीकरच्या लगान मध्ये ते शंभू काकाच्या भूमिकेत दिसले. त्या नंतर ही देवआनंद यांच्या मि. प्राइम मिनिस्टर, पहेली, हम से है जहां या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका त्यांनी साकारल्या. कलर्सवरून प्रसारित होणाऱ्या मधुबाला या मालिकेतली पाहुण्या कलाकाराची भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. लाइफ अॅण्ड टाइम्स ऑफ ए. के. हनगल हे आत्म‌चरित्र त्यांनी लिहीले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी २००६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. ७४ वर्षीय विजय हा त्यांचा मुलगा. कॅमेरामन असलेल्या विजय यांनी वृद्धत्वामुळे काम करणे सोडले. ए. के. हनगल यांचे २६ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट