(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते ना. ग. गोरे

    १९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला.

  • हरिवंश राय बच्चन

    हरिवंश राय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते.

    हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.

    हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
    मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
    'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
    मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
    अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
    बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
    रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।

    सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
    सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
    बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
    चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।

    जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
    वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
    डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
    मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।
    हरिवंश राय बच्चन

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ अभिनेत्री पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

  • पटकथाकार ग. रा. कामत

    ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

  • पंडित सी.आर.व्यास

    सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कार मिळाले.

    सी.आर.व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • पंडितराव नगरकर

    पंडितराव नगरकर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्मिणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.
    व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. मा. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मराठी विश्वकोश
    मा.पंडितराव नगरकर यांची गाणी
    सांगा मुकुंद कुणि हा
    गोल तुझ्या शरीराचा
    घडीघडी अरे मनमोहना
    घनश्याम सुंदरा श्रीधरा
    ती पाहताच बाला
    तू पाक सूरत कामिना
    मम हृदयाची ललित रागिणी
    मराठी असे आमुची
    माझी बेगम आली
    शुभमंगल या समया

  • दक्षिणेतील देव अशी ओळख असलेले रजनीकांत

    दक्षिणेतील देव' अशी ओळख असलेले रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत. रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले.

    सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.

    रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.

    रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे चाहते आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारने 'अंधा कानून' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यानी आपले लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केले. तीन वर्षांपूर्वी आलेल्या 'शिवाजी, द बॉस' आणि 'रोबोट' या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांतला डोक्यावर घेतले. आणि ते केवळ साऊथचेच नाही तर संपूर्ण भारताचे सुपरस्टार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

    २००७ साली रिलीज झालेल्या 'शिवाजी' या सिनेमासाठी रजनी यांना तब्बल २६ कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणाऱ्या टॉप १० सिनेमांपैकी एक होता.

    रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’ आहे. ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४० % एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात शिवाजी या चित्रपटासाठी त्यांनी रक्कम घेतली होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये. आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत. एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.

    तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.

    जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रजनीकांत यांना आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. लता रंगाचारी यांच्या बरोबर रजनीकांत यांचा विवाह झाला आहे. लता रंगाचारी या तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला. लता यांनी चेन्नईतून इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. चेन्नईतील वुमन कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेज मॅगझिनसाठी लता यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. हीच रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट होती. त्यानंतर १९८१ मध्ये तिरुपती येथे त्यांनी लग्न केले.

    लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या 'द आश्रम' या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • उस्ताद विलायत खाँ यांचे निकटवर्तीय शिष्य पं. मधुकर दीक्षित

    वडिलोपार्जित त्यांचा भिक्षुकी व्यवसाय होता. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३५ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्या कुटुंबात कोणतीही संगीताची पूर्वपीठिका नसताना त्यांना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली होती. परंतु, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांची सतार वादनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडील बंधूनी त्यांना त्या काळी सतार विकत घेण्यास ३५ रुपयांची मदत करून, त्यांना सतार शिकण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील तत्कालीन नामांकित सतारवादक पं. ज्योतीशचंद्र चौधरी या गुरूंकडे सतार शिकण्यास सुरुवात केली.

    पं. ज्योतीशचंद्र चौधरी हे त्यांचे आद्यगुरू. त्यानंतर त्यांनी सुमारे १९५७-५८मध्ये सतार वादनात प्रगती करण्याच्या दृष्टीने थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्यांनी अफताब-ए-सितार उस्ताद विलायत खान यांची भेट घेऊन सतार शिकण्याचा मनोदय व्यक्त केला. दीक्षित हे पं. ज्योतीशचंद्र चौधरी यांचे शिष्य असल्याने, खाँसाहेबांना त्यांना शिष्य करून घेण्यास, अडचण वाटली नाही. तेव्हापासून उस्ताद विलायत खाँसाहेबांनी त्यांना शिष्य केले. मुंबईत त्यांचे कोणीही नसल्याने व आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने, त्यांची मुंबईत राहण्याची सोय होऊ शकली नाही. परिणामी, खाँसाहेबांनी त्यांना त्यांच्याकडेच आसरा दिला.

    खाँसाहेबांचे तत्कालीन निकटवर्ती असलेल्या शिष्य गणांपैकी पं. अरविंद पारिख, पं. गिरीराज सिंह तथा पं. हरिशंकर पुराणिक हे सर्व दीक्षितांचे गुरूबंधू होत. पं. दीक्षित हे उस्ताद खाँसाहेबांचे विश्वासू शिष्य म्हणून गणले जात. पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे. तरीही नेहमी विनम्रपणे सांगताना खाँसाहेबांसारखे काम आणि गायकी अंगाने सतार वादन करणे कठीण असल्याचे ते म्हणत. त्यांची खाँसाहेबांवर निस्सीम भक्ती होती. ते घरी रियाज करतानाही खाँसाहेबांचा फोटो जवळ ठेवत. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार होता.

    मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खाँसाहेबांच्या परवानगीने स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सतारीच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. भाडेतत्त्वावर जागा घेऊन ते राहू लागले. मुंबईतील एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभागात सतारीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचा विशेष गुण होता, ते सदैव प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. प्रसिद्धी म्हणजे बाजारीपणा, थोतांड आहे, असे त्यांचे ठाम मत होते. परिणामी, आत्तापर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सतत झगडावे लागले. त्यांचा मुलगा श्री मिथिलेश दीक्षित यालाही त्यांनी सतारीचे धडे दिले, तो उत्तम सतार वादन करतो. पं. मधुकर दीक्षित यांचे २ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संगीतकार चित्रगुप्त

    चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.

    एव्हीएम या दक्षिणेकडच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर, महमंद रफी, आशा भोसले, तलत मेहमूद, मुकेश तसंच मन्नाडे इत्यादी गायकांच्या माध्यमातून त्यांनी सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमे आले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट (दिलीप, देव, राज कपूर) त्यांना मिळाला नाही. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी आपल्या संगीताच्या जोरावर ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या संगीतावर अतिशय खूश असत. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत.

    भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी या नायिका होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. चित्रगुप्त यांचे निधन १४ जानेवारी १९९१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    चित्रगुप्त यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=CB52wfw846U

  • मराठी कवि बबनराव नावडीकर

    मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार बबनराव नावडीकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

    बबनराव नावडीकर यांचे मूळ नाव श्रीधर यशवंत कुलकर्णी. त्यांचे वडीलही कीर्तन करीत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कऱ्हाड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक झाले. तेथॆ त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कारसुद्धा मिळाला. पुण्यात आले तेव्हा बबनराव नावडीकर यांना गजानन वाटवे यांच्या गायनाचे फार आकर्षण होते. त्यांना भेटण्याची अनावर इच्छा होती. घर सोडून आलेले नावडीकर एकदा पुण्यात हुजूरपागेवरील फुटपाथवर बसले होते. बाजूला कंपाऊंडची भिंत होती. बबनराव येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. त्यांच्या वडिलांचे- यशवंत नावडीकर यांचे एक मित्र त्या रस्त्याने जात होते. त्यांनी बबनरावांना ओळखले व चौकशी केली. बबनराव म्हणाले, ‘मी घरातून निघून आलो आहे. मला गाणं शिकायचंय.’ त्यांनी बबनरावांना चार-पाच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पुण्यामध्ये हिंडताना एके दिवशी टिळक रोडवरील गोखले बिल्डिंगमध्ये त्यांना गायक गजाननबुवा जोशी हे गुरू भेटले. त्यांच्याकडे नावडीकरांचे संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांची गजाननराव वाटवे यांना भेटण्याची इच्छा मात्र अजून पूर्ण झाली नव्हती. ते गुरूंकडेच राहत होते. तिथे असताना एकदा गजाननराव वाटवे सायकलीवरून जाताना त्यांना दिसले. या भेटीनंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचाही योग आला. आपले गुरूस्थान हेच आहे हे नावडीकरांना तेव्हा समजून चुकले.

    शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. बालगंधर्वांबरोबर त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकां शिवाय होत नसे. बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.

    बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे. त्याचा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत.

    बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला आहे. 'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. बबनरावांचा एक नातू आनंद अरविंद नावडीकर हा सुद्धा बबनरावांचा वसा पुढे चालवीत आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहून तेथे गीत रामायणातील पदे, जुनी मराठी हिंदी गीते आणि बबनरावांची भावगीते सादर करीत आहे.

    बबनराव नावडीकर यांचे २८ मार्च २००६ रोजी निधन झाले.

    त्यांची निवडक गाणी:

    https://www.youtube.com/watch?v=W0a1nq5DHi8&index=1&list=PL759C91FA75E7FC08

    https://www.youtube.com/watch?v=QHiIWXKDSs8

    https://www.youtube.com/playlist?list=PL759C91FA75E7FC08

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.