(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक दिग्दर्शक अभिनेता विराजस कुलकर्णी

    विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्यांनी एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कनिष्ठ महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. त्यानंतर त्यांनी यूपीजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतले.

  • शाहीर अनंत फंदी

    अनंतफंदीस “फंदी” नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरुन यासही लोक फंदी म्हणूं लागले

  • सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान

    स्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ सर्वस्वी तुलाच ‘ हे आत्मचरित्र असलेले नाटक लिहिले आणि त्यात त्यांनी भूमिकाही केली. इ.स. १९५०च्या नंतर त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली.

  • पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा

    ८५ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्याय वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. “अयोध्येचा राजा” या चित्रपटाने मा. दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस 'प्रभात फ़िल्म ' चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.

    http://www.prabhatfilm.com/home.htm
    अयोध्येचा राजा
    १९३२
    पौराणिक
    ३५ मिमी/कृष्णधवल/१३१४२ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११०६०/ ६-२-३२
    निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
    दिग्दर्शक :व्ही. शांताराम
    कथा :ना. वि. कुलकर्णी
    संवाद :ना. वि. कुलकर्णी
    संगीत :गोविंदराव टेंबे
    छायालेखन :केशवराव धायबर
    संकलक :व्ही. शांताराम
    गीतलेखन :गोविंदराव टेंबे
    कला :साहेबमामा फत्तेलाल
    वेषभूषा :एच्.एस्.काकडे
    गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
    ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
    निर्मिती स्थळ :कोल्हापूर
    रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
    कलाकार :कुमार दिगंबर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, मा. विनायक, मानाजीराव माने, शंकरराव भोसले
    गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल

    श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.

  • ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर

    १९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं.

  • विनोदी अभिनेते भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम

    मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.

  • अभिनेते मिलिंद गुणाजी

    महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही.

  • ज्येष्ठ जादूगार विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर

    इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती.

  • सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर

    प्रा. रमेश तेंडुलकर हे माणूस म्ह्णून खूप साधे आणि मनाने खूप मोठे होते. अत्यंत साधी रहाणी आणि आपल्या घरी येणारा माणूस कितीही साधा असला तरी त्याचे त्यांच्या घरी अगत्याने स्वागत होत असे. त्याचे चिरंजीव नितीन तेंडुलकर उत्तम कवी, लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा सचिन तेंडुलकर हा भारताचा गाजलेला क्रिकेटपटू आहे. तर त्यांचे दुसरे चिरंजिव नितीन तेंडुलकर हे देखील वडिलांप्रमाणे लेखन करतात, कविता करतात.