(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चितळे बंधू मिठाईवालेचे संस्थापक भाऊसाहेब चितळे

    दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.

  • मराठी रंगभूमीचे जनक नाट्याचार्य विष्णुदास भावे

    विष्णुदास भावे यांचे संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८१९ रोजी झाला. सांगली संस्थानाचे श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता.

    १८४२ मध्ये कर्नाटकातून 'भागवत' नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर' नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले.

    भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले.

    सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नचहर्त्या गजाननाचे स्त वन, सरस्व्तीस्त्वन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत.

    नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला 'कचेरी' असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढेमहाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ' तागडथोम नाटके ' असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या 'अलल् डुर्र' अशा डरकाळीमुळे ' अलल् डुर्र ' नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.

    ५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्याचत पडून राहिल्या होत्या व भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत.

    विष्णुदास भावे यांनी तयार केलेल्या आणि आता जीर्ण झालेल्या कळसूत्री बाहुलीचे रुप प्रख्यात रंगभूषाकार प्रभाकर भावे यांनी बदलले असून ती बाहुली सांगलीच्या विष्णुदास भावे रंगमंदिरात कायमस्वरुपी जतन करण्यात आली आहे. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे असून या कठपुतळ्या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येत. भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ' नाट्याख्याने ' असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत.

    भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह १८८५ साली प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.

    विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले.

    नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८४३ साली मुंबईच्या दौर्याापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरु केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करुन १८५१ ते १८६२ सालापर्यत एकूण सात दौरे केले. १४ फेब्रुवारी १८५३ रोजी प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या.

    मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. या विष्णुदास भावे यांनी एकूण ५२ नाटके लिहिली. यांची सर्व नाटके पौराणिक होती. हा काळ धर्मप्रबाल्याचा असल्याने ते स्वाभाविक होते. नाटक मंडळीत पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णूदास भावे यांच्या पध्दतीची नाटकांची परंपरा १९१० सालापर्यत चालू ठेवली.

    विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती विष्णुदास भावे पुरस्कार दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाच्या दिवशी देते. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला होता. या वर्षीचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात आला. विष्णुदास भावे यांचे ९ ऑगस्ट १९०१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / रणजीत कुलकर्णी

  • जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय

    पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

  • विकिपीडिया चे सहसंस्थापक व प्रमुख जिमी वेल्स

    आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला.

    जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा त्यातच कुठे तरी असावी. या शिवाय लहानपणापासूनच त्यांना संगणकाची ओढ होती. तासन् तास संगणकावर खेळ खेळणे, कॉम्प्युटर कोड तयार करणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यातूनच त्यांना या माध्यमाची महती लक्षात आली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली.

    अलाबामा आणि इंडियाना विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी संगणक क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सहकाऱ्यांसह बोमीस हे वेबपोर्टल तयार केले. ते अश्लील मजकुराचे, छायाचित्रांचे पोर्टल होते. पण त्याचेही एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपली छायाचित्रे अपलोड करू शकत असत. मात्र त्यांचा तो प्रयोग सपशेल फसला आणि जिमी वेल्स ऑनलाइन विश्वकोश निर्मितीकडे वळले. २००० साली त्यांनी ‘नूपीडिया’ हा ऑनलाइन विश्वकोश सुरू केला. तत्पूर्वी त्यांची लॅरी सँगर या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती. १९९०च्या सुमारास वेल्स एक ऑनलाइन ग्रुप चालवत होते. त्यात आयन रँड या तत्त्ववेत्त्या लेखिकेच्या ऑब्जेक्टिव्हिजम या तत्त्वज्ञानाची चर्चा होत असे. त्यातूनच त्यांचा सँगर यांच्याशी परिचय झाला होता. या दोघांनी मिळून नूपीडिया चालवताना येत असलेल्या अडचणींचा वेध घेऊन, त्यात सुधारणा करून, १५ जानेवारी २००१ रोजी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने ‘विकिपीडिया’ हे संकेतस्थळ सुरू केले.

    विकिपीडिया हे साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस 'विकी विकी वेब डॉट विकी' हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. लोकांनी आपणांस हव्या त्या विषयावरील माहिती या संकेतस्थळावर अपलोड करावी. उपलब्ध माहितीत भर घालावी, ती संपादित करावी, असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. आज इंग्रजी विकिपीडियामध्ये असे सुमारे ४८ लाखाहून अधिक लेख आहेत. असे माहितीपूर्ण लेख एकाच ठिकाणी असणे ही काही साधी गोष्ट नाही. कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते.

    आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती 'ओपन सोर्स लायसन्स'प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोश म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेला विश्वकोश असे त्याबद्दल म्हणता येईल.

    ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तसा प्रत्येकालाच - एखाद्या विषयावर लेख लिहिताना, प्रोजेक्ट तयार करताना, निबंध लिहिताना, शाळेचा गृहपाठ करताना जेव्हा आपण विकिपीडियाकडे धाव घेतो तेव्हा - येत असतो!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर

    सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.

  • प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ

    ‘निसर्गराजा ऐक सांगतो’, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय गीतांसह ‘कुदरत’ चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले गायक म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, पंडित गोविंदप्रसाद जयपूरवाले, पंडित मनोहर चिमटे, पंडित सदाशिवराव जाधव यासारख्या दिग्गजांकडे त्यांनी गायनाचे शास्त्रोक्त धडे घेतले होते. ऑर्केस्ट्रा क्षेत्रमध्ये त्यांनी आपल्या गायना कारकीर्दीची सुरुवात केली.

    एका कार्यक्रमात संगीतकार राम कदम आलेले असताना त्यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून ,चित्रपटात पाश्र्वगायनाची त्यांना संधी दिली. पुढे अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून एकापेक्षाएक सुरेल गाणी सादर करुन कानसेनांना अक्षरश: मंत्रमुगध केले. त्यांचे “कुदरत” चित्रपटातील “सुखदुख की हर एक माला” आणि “अशांती” चित्रपटातील “शक्ती दे मां” ही गीतं आज देखील रसिकांच्या मनात घर करुन आहे. तर मराठीत “निसर्गराजा ऐक सांगतो”, “कोण होतीस तू, काय झालीस तू”, “अजून आठवे ती रात पावसाळी”’, “अरे कोंडला कोंडला देव”, “दूर का तू साजणी”, “जाई ग जाई पांडोबा”, “पांडोबा पोरगी फसली पांडोबा ”, “माणसं रे माणसं”, “देवमानुस देवळात आला”, “अन्‌ हल्लगीच्या तालावर”, “अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत निसर्गात भरूनी राहे अनादि अनंत” ही गाडगीळ यांची आवाजातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली!

    तसंच ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा” या गीतातील दोन कडवी गाडगीळ यांनी स्वरबद्ध केली होती. मराठीमध्ये राम कदम तर हिंदीत आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवींद्र जैन अश्या संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे. केवळ गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही चंद्रशेखर गाडगीळ यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी चित्रपटांमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रीत झालेल्या अनेक गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे.

    मन्ना डे आणि महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचा त्यांनी अभ्यास केला होता. गायिका रश्मी समवेत त्यांनी “रश्मी ऑर्केस्ट्रा”ची स्थापना केली. पुढे चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. “माणसापरिस मेंढरं बरी” या चित्रपटातील एका गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून चंद्रशेखर गाडगीळ यांना राज्य शासनाच्या पुरस्काराने, तर २०१० यावर्षीच्या “राम कदम कलागौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. चंद्रशेखर गाडगीळ यांचे २ ऑक्टोबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- सागर मालाडकर

  • संगीतकार व गायक शंकर महादेवन

    प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.

    भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.

    केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.

    १९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कॅसेट टेप आणि सीडीचे शोधकर्ते लू ओटन्स

    १९६३ मध्ये ओटन्स यांचा कॅसेट टेपचा शोध हे जगभरात एक मोठे यश होते. १९६३ मध्ये शोध लावल्या पासून १०० अब्जाहूनही अधिक कॅसेट विकल्या गेल्या आहेत. परंतु सीडीच्या उदयानंतर या कॅसेटचा वापर कमी झाला.

  • ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यकलावंत डॉ. स्वाती दैठणकर

    पंचकन्या’ हा त्यांचा एक प्रयोग, ज्यामध्ये त्या स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करतात. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न त्या पंचकन्या हा सादर करतात. तसेच कमलपुष्पाचे वाङ्मयीन सौंदर्य आणि वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन करून डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी ‘पद्मिनी’ हे पुस्तक लिहिले आहे.

  • विनोदी अभिनेता देवेन वर्मा

    अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. देवेन वर्मा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते. देवेन वर्मा यांनी १४९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते. मा.देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट