‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ या नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या नावाप्रमाणेच सतत हसतमुख असणारी मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर रोजी झाला.
सुरुवातीच्या काळात पडद्यावर मुख्य नायिकेच्या मागे नृत्य करत असतानाच, डोळयात आपणही एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचं स्वप्न बघून, मोठ्या जिद्दीने त्यांनी आपल्या कारकिर्दीला नवं सुरेख वळण दिलं आणि थोड्याच कालावधीत त्यांनी उत्तम 'अभिनेत्री' म्हणून आपलं स्वतःचं असं निराळं स्थान निर्माण केलं.
'कथा अकलेच्या कांद्याची', 'राजकारण गेलं चुलीत', 'चिरंजीव आईस', 'कुलकर्ण्याचं स्थळ', 'मंगळसुत्र' आणि 'सासुबाईंचं असंच असतं' अशा अनेक नाटकांमधून. तर, 'आई शप्पथ!', 'आज झाले मुक्त मी', 'आम्ही दोघे राजा राणी', 'गडबड घोटाळा', 'धग', 'मानाचं कुंकू', 'हिरवा चुडा सुवासिनीचा', 'माहेरची साडी' अशा अनेक मराठी, तर, 'कथा', 'वक्त के पहले', 'सिंघम' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या लाजवाब अभिनयाने कधी खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत रसिकांच्या मनात घर केले.
विजय पटवर्धन
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
चित्रपटांचा चालता बोलता इतिहास असलेले आणि 'सॅल्युलाईड मॅन' अशी ओळख असलेले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया) संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी. के. नायर यांचा जन्म ६ एप्रिल १९३३ रोजी केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे झाला.
परमेश कृष्णन नायर म्हणजेच पी के नायर यांचे तिरूअनंतपुरम येथेच शालेय आणि उच्च शिक्षण देखील झाले. मोठे होत असताना, त्यांच्यावर तमिळ भाषेमधील पौराणिक चित्रपटांचा विशेष पगडा होता आणि तेंव्हापासूनच त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी केरळ विद्यापीठातून पदवी मिळवली, पण त्यांचे सर्व लक्ष मात्र चित्रपटांकडे होते आणि शेवटी १९५३ साली, ते केरळमधील सगळे सोडून मुंबईमध्ये आले आणि त्यांचा एक अनोखा प्रवास सुरु झाला. विशेष म्हणजे नायर यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडे सहायक म्हणून, त्या काळी काम केले आहे. नावेच घ्यायची झाली, तर बिमल रॉय किंवा मेहबूब खान, तसेच ऋषिकेश मुखर्जी आणि अजून अनेक मान्यवर दिग्दर्शक. पण त्यांना चित्रपट बनवण्याची कला शिकताना हे उमजले, की ते चांगले दिग्दर्शक कदाचित होऊ शकणार नाही. त्यासाठी लागणारे कौशल्य किंवा प्रतिभा त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच १९६१ साली त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया’ (एफ.टी.आय.आय) येथे रिसर्च असिस्टंट हे पद स्वीकारले. नॅशनल फिल्म आर्काइव ऑफ इंडिया संग्रहालयाची सुरुवात देखील याच संस्थेतून झाली. १९६४ साली संग्रहालयाची स्थापना झाली आणि त्यानंतरच नायर यांची नेमणूक असिस्टंट क्युरेटर म्हणून तिथे करण्यात आली. नायर यांना ‘प्रभात फिल्म कंपनी’, ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि ‘जेमिनी स्टुडियो’ने बनविलेल्या चित्रपटांच्या संग्रहाचा खूप अभिमान होता. तसेच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक, हे त्यांचे खास मित्र होते आणि त्यामुळे त्यांचे अनेक चित्रपट आज चित्रपट संग्रहालयात शाबूत आहेत. ऋत्विक घटकांची ‘मेघे ढाका तारा’ त्यांना नायर यांना खूप आवडायची.
नायर यांनी शून्यातून हे संग्रहालय उभे केले आहे. त्यांनी जवळपास १२००० चित्रपट संग्रहित केले आणि त्यामधील तब्बल ८००० चित्रपट भारतीय आहेत. जुन्या चित्रफिती, भारताच्या काना कोपऱ्यातून शोधणे आणि त्यांचे संवर्धन करून त्या कायमच्या संग्रहित करणे, या कामाने नायर झपाटलेले होते. त्यांनी अनेक जुने, हरवलेले असे चित्रपट मिळविले आणि शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संवर्धन केले. भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.
२०१२ साली शिवेंद्रसिंग डुंगरपुर या चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने नायर यांच्या आयुष्यावर एक माहितीपट बनविला आणि तो म्हणजे ‘सेल्युलॉईड मॅन’. या माहितीपटाने नायर यांचे आयुष्य पूर्णतः उलगडले आणि त्यांच्या कामाचे महत्व लोकांसमोर आणले. या माहितीपटाला २ राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. हा माहितीपट बनवला गेला नसता, तर खूपच कमी जणांना नायर यांच्या कामाची माहिती आणि महत्व कळाले असते. ‘सेल्युलॉईड मॅन’ने नायर यांचे आयुष्यच संग्रहित केले आहे. नायर यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. पी. के. नायर हे पुण्यातील आशय फिल्म क्लबचे अध्यक्षही राहिले होते.
पी. के. नायर यांचे ४ मार्च २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला.
साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
लॉर्ड कावस हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा जन्म १९११ रोजी पुणे येथे झाला. लॉर्ड कावस यांचा पुण्याच्या सधन पारशी कुटुंबात लॉर्ड कॉवस यांचा जन्म झाला. घरची आíथक परिस्थिती उत्तम. छोटय़ा कॉवसचे सांगीतिक मन तिथे रमत नव्हते. डोळय़ांत स्वप्न आणि डोक्यात फक्त एक विचार, मला सांगीतिक विश्वात करिअर करायचे आहे. आपला छंद जोपासण्यासाठी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आई बरोबर मुंबईत मामाच्या घरी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.
मुंबईत जिथून जसे संगीत शिकता येईल ते शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मेजर गुंडलखान या पठाण मिलिटरी अधिकाऱ्याकडून बॅग पाइप वाजविण्यास शिकले. दिवसातून दहा दहा तास ड्रम वाजविण्याचा सराव केला. पारंपरिक भारतीय तालवाद्यांची माहिती असावी म्हणून संगीतकार गुलाम मोहोम्मदकडे तबलाही शिकले. मि. वालिसकडून ट्रम्पेट आणि मि. लुईस मोरेनो या स्पॅनिश कलाकाराकडून कास्टनेट (हे छोटेसे वाद्य स्पॅनिश नर्तक दोन्ही हातांच्या मुठीत धरून वाजवत असत.) वाजविण्यास शिकले. ड्रम्सवर मात्र स्वत: अभ्यास करून प्रावीण्य मिळविले. ‘आलम आरा’ या पहिल्या हिंदी बोलपटाचे संगीतकार होते फिरोजशहा मित्री व बहराम इराणी.
बहराम हे लॉर्ड कॉवसचे चुलतमामा. त्यांच्याबरोबर कॉवसनी ‘आलम आरा’च्या पाश्र्वसंगीतात ट्रम्पेट वाजवून फिल्मी संगीतात प्रवेश केला. पुढे दोन-तीन वर्षे ब्रिटिश आर्मीमध्ये त्यांच्या बँडपथकात नोकरी केली व कॅप्टनपदापर्यंत पोहोचले. त्यामुळे माìचग ड्रम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. सुनील दत्तच्या ‘उसने कहा था’ फिल्ममधील ‘जानेवाली सिपाही से पुछो’ गाणे आठवते? त्यातील माìचग ड्रम लॉर्ड कॉवस यांनी वाजविला आहे. दुसरे महायुद्ध संपले आणि त्यांची आर्मीमधील नोकरी संपुष्टात आली. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व मिळाले होते, परंतु त्यांनी ते नाकारून मुंबईत राहणे पसंत केले.
४० व्या दशकात काही काळ ताज हॉटेलमध्ये बारमनची नोकरी करत असताना तिथे अनेक विदेशी बॅण्ड पाहायला व ऐकायला मिळाले. त्या वादकांशी दोस्ती करून तीन वर्षांत सर्व प्रकारची लॅटिन अमेरिकन वाद्य्ो ते वाजविण्यास शिकले. इतकेच नव्हे तर त्यांनी मिळेल त्या किमतीत ती वाद्य्ो विकत घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात ऑस्टोरिया, व्होल्गा, रिटज, व्हेनिस आदी ठिकाणी बॉलरूम डान्स चालत असे अनेक नाइट क्लब सुरू होते, तिथे पाश्चात्त्य नृत्य चालत असे. नौशादचा ‘जादू’ चित्रपट पाहिला असेल तर त्याची कल्पना येईल! ताजच्या बाजूला त्या काळच्या जाझ संगीतप्रेमींचे अत्यंत आवडते ग्रीन्स हॉटेल होते. इथे मोठमोठय़ाने ड्रम वाजविण्यास मुभा होती. पहाटेपर्यंत चालत असे, लॉर्ड कावस यांनी या हॉटेल्सच्या बॅण्डमध्ये वाजविण्यास सुरुवात केली.
१९४५ च्या सुमारास गोव्याहून प्रसिद्ध जाझ ट्रम्पेट वादक चिकचॉकलेट (चिको बाज) मुंबईला आले, त्यांनी आपला बॅण्ड चालू केला, लॉर्ड कावस आता त्यांच्या बॅण्डमध्ये वाजवू लागले. अॅककॉíडयनवादक गुडी सिरवाईना कावसनी आपल्या बॅण्डमध्ये बोलावून घेतले. सुट्टीमध्ये ते सर्व मसुरीच्या क्लबमध्ये बॅण्डवादन करत असत. त्यादरम्यान लाहोरहून कुक्कू डान्सर मुंबईत आली. आपल्या नृत्यसंगीताच्या कार्यक्रमांसाठी तीही एका चांगल्या बॅण्डच्या शोधात होती.
लॉर्ड कावस, जेरी फर्नाडिस व चिको वाजनी ‘जिरोम एॅण्ड हिज जाईव्ह क्लब बॉईज’ हा बॅण्ड तयार केला होता. कुक्कू त्यामध्ये सामील झाली. तिच्या पहिल्या फिल्मी नृत्याचे ध्वनिमुद्रण याच बॅण्डने केले. सी. रामचंद्र म्हणजे कल्पक व तल्लख बुद्धीचे संगीतकार. सतत काही तरी नवे आणि वेगळे संगीत देण्याच्या प्रयत्नात ते असत. जाझ संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. दिवसभर गाण्यांचे ध्वनिमुद्रण करून मध्यरात्री ते बॅण्ड ऐकायला ग्रीन्स हॉटेलमध्ये चिक चॉकलेटकडे येत असत. त्यांना लॉर्ड कॉवस यांचे विविध पाश्चिमात्य तालवाद्यांवर असलेले प्रभुत्व भावले. त्या बॅण्डमधील सर्व कलाकारांना घेऊन पाश्चिमात्य शैलीचे संगीत देण्याचे त्यांनी ठरविले.
नेमकी त्याच काळात मुंबई इलाख्यात दारूबंदी जाहीर केली गेली. नाइट क्लब बंद झाले. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. लॉर्ड कावस, त्यांचा मोठा मुलगा केरसी, गुडी, जेरी सारे सी. रामचंद्रांच्या वाद्यवृंदात सामील झाले. कावसनी आपल्याबरोबर विविध प्रकारचे जाझ, ड्रम्स, बोंगो, कोंगो, कबास, रेसो, एॅकॉíडयन, कॅस्टनेट, ट्रांगल, खंजिरी, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, व्हायब्रोफोन आदी लॅटिन अमेरिकन वाद्य्ो सोबत आणली आणि या सर्वानी एक नवीन प्रकारचे फिल्मी संगीत तयार केले. आमा ‘आना मेरी जान संडे के संडे,’ ‘जवानी की रेल चली जाएगी’ (शहनाई), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी), ‘मोम्बासा मोम्बासा’ (सरगम), ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा) या गाण्यांनी सर्वत्र धमाल उडवून दिली. संगीतकार सी. रामचंद्र प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. संगीताची ही नवीन शैली यशस्वी होताच सर्व संगीतकार लॉर्ड कावस यांच्या मागे लागले. लॉर्ड कावस यांनी पारंपरिक िहदी फिल्मी संगीताला आपल्या असामान्य वादन शैलीने, कल्पकतेने आधुनिक वळण दिले.
हॉलीवूडच्या ‘लव्ह ऑफ कारमेन’ चित्रपटावरून कारदारनी ‘जादू’ या वेषभूषाप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील गाण्यांसाठी लॉर्ड कावसनी प्रथमच कॅस्टनेट यामूळ स्पॅनिश वाद्याचा उपयोग केला, गाणे होते ‘जब नन मिले ननों से, लारा लूं, लारा लूं’ आजही फिल्मी संगीतात सिंगल कॅस्टनेट वाजविणारे होमी मुल्लर, वकील बाबा, दीपक बोरकरसारखे काही कलाकार आहेत. परंतु डबल कॅस्टनेट वाजविणारे कलाकार फक्त दोन होते. लॉर्ड कावस आणि त्यांचा धाकटा मुलगा बजी. महमूदच्या ‘शबनम’ फिल्ममध्ये डबल कॅस्टनेट आहे, ‘हर नजर में सौ अफसाने.’ खंजिरीचा उपयोग यापूर्वीही भारतीय संगीतातून केला जात होता. वादक तालासाठी धातूच्या चकत्यांचा वापर करीत. लॉर्ड कावस यांनी खंजिरी वादनात अमेरिकन शैली आणून ते पूर्ण वाद्य वाजविण्यास सुरुवात केली.
अनेक लोरींमध्ये (अंगाई गीतात) हळुवार घंटानाद ऐकू येतो. फिल्मी संगीतात हा नवीन प्रकार लॉर्ड कावस यांनी आणला. घोडय़ांच्या टापांचा आवाज निर्माण करण्याचे प्रथम श्रेय आर. सी. बोराल व पंकज मलिकला जाते. (चले पवन की चाल) परंतु घोडय़ांच्या टापांचा अस्सल ध्वनी निर्माण करण्याची किमया लॉर्ड कावस यांचीच! दोन रिकाम्या करवंटय़ा फरशीवर वाजवून त्यांनी तो आभास निर्माण केला होता. ‘अनमोल घडी’, ‘उडन खटोला’, ‘नया दौर’, ‘तुमसा नहीं देखा’ आदी चित्रपटांतून त्यांनी वादन केले आहे. केवळ घोडय़ांच्या टापांचाच नाही तर बुटाच्या टापांचा (फूट स्टेपचा) अफलातून ध्वनीही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केला आहे.
सी. रामचंद्रच्या ‘इना मिना डीका’ (आशा) गाण्यावरील वैजयंतीमालाच्या नृत्यात त्यांनी फूटटॅप डान्ससाठी, तिच्या पायातील बुटांच्या टापांचाही ध्वनी निर्माण केला आहे. काचेवर दोन नाण्यांनी वादन केले. मिष्किलपणा त्यांच्या रक्तातच होता. रेकॉìडगमध्ये ते खूप गमतीजमती करीत असत. ‘दिल का हाल सुने दिलवाला’ (श्री ४२०) मधील ‘चुकचूक’ आवाज ही त्यांचीच कल्पना होती. अलबेलामधील ‘ओ बेटा जी’ गाण्यात त्यांनी किचनमधील भांडी वाजवली तर नोकरीमधील किशोरच्या ‘अर्जी हमारी’ गाण्यात चक्क टाइपरायटर वाजवला आहे. गाईडमधील ‘पिया तोसे नना’मधील घुंघरांची साथही त्यांची होती.
भगवानचा ‘अलबेला’ त्यातील संगीतामुळे तुफान लोकप्रिय झाला. त्याचे बरेचसे श्रेय लॉर्ड कावस यांना द्यावे लागेल! ‘शोला जो भडके’मधील सुरुवातीचे बेंगो पीस व ‘दिवाना परवाना’मधील पाश्चिमात्य ऱ्हिदम काकांनी दिला. ‘दिवाना परवाना’च्या चित्रीकरणप्रसंगी भगवानदादांनी ते गाणे वाजविणाऱ्या प्रमुख कलाकारांनाही (चिक चॉकलेट, फ्रान्सिस, जेरी फर्नाडिस, सहृद कार) आपल्या समवेत नाचायला लावले आहे. बोंगो, कोंगो, चायनीज ब्लॉक, वूडब्लॉक, ड्रम, व्हायोब्रोफोन वादनात तर त्यांचा हात धरणारा कुणीही कलाकार फिल्मी संगीतात नव्हता. पुढील गाणीच त्याची साक्ष देतील!
‘जाने क्या तूने कहीं’ - प्यासा (चायनीज ब्लॉक), ‘आई ए मेहरबां’ - हावडा ब्रिज (बोंगो व वूडब्लॉक), ‘हूं अभी मं जवां ऐ दिल’ - भाई भाई (बोंगो), ‘लो प्यार की हो गई जीत’ - जादू (बोंगो), ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ - पतिता (बोंगो), ’जाता कहा हैं दीवाने‘ - सीआयडी (बोंगो), ‘ये रात ये चांदनी’ - जाल (बोंगो).
आर.डी.बर्मन यांच्या संगीतामध्ये लॉर्ड फॅमिलीचे प्रचंड योगदान आहे. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात बोंगो - कावस लॉर्ड, एकॉíडयन - केरसी लॉर्ड, व्हायब्रोफोन - बजी लॉर्ड यांनी वाजविला आहे.
१९४० ते १९९० या कालखंडात असा एकही संगीतकार नव्हता की ज्याचे गाणे लॉर्ड कावस यांनी वाजविले नाही. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर त्यांची कमालीची पकड होती. नारळाच्या करवंटय़ा, टाईपरायटर, बुटांच्या टापांच्या आवाजाचा वापर करून त्यांनी सदाबहार गाण्यांना जन्म दिला. कावस म्हणजे हिंदी फिल्मी संगीताचा चालताबोलता इतिहास होता. लॉर्ड कावस यांचे २४ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अरुण पुराणिक
शरद पिळगावकर यांचे गाव 'पिळगाव'. शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं.
'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,'अपराध मीच केला' हे नाटक शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता 'कमांडर नानावटी खटला'.
सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट. सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॅटमॅन, कॉनन दी बारबॅरिअन आणि जेम्स बाँडसारख्या लोकप्रिय व्यक्तिरेखा कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच यांचा जन्म. २३ फेब्रुवारी १९४८ रोजी शिकागो येथे झाला.
डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल!
‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली. त्यांनी ‘प्लॅनेट ऑफ दी एप्स’च्या कथाही लिहिल्या. डग्लस माँच यांना इंकपॉट अॅवॉर्ड, इगल अॅवॉर्ड, हॅक्स्टर अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
प्रसिद्ध साहित्यिक मधूसुदन कालेलकर आणि संगीतकार राम कदम यांच्या सोबतच्या बैठकीत पुणेकरांनी अवघ्या १५ मिनिटात हे गाणं लिहिलं होतं. हे गाणं गोविंद म्हशीलकर आणि पुष्पा पागधरे यांनी गायलं होतं. तर प्रसिद्ध अभिनेते निळू फुले, शरद तळवळकर आणि उषा चव्हाण यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. हे गाणं ऐकल्यानंतर निळू भाऊंनी पुणेकरांना जवळ बोलावून घेतलं. छान लिहिलंस. असंच लिहीत राहा, प्रगती करा, असं निळूभाऊंनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. हा किस्सा ते आजही अभिमानाने सांगतात.
गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भास्कर सोमण हे भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते.
लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti