मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस.
वसंत बापट यांचा पहिला ‘ बिजली ‘ हा काव्यसंग्रह १९५२ साली प्रकाशित झाला. वसंत बापट यांनी ४५ वर्षात ३४ पुस्तके लिहिली आहेत.
कवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती. ‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले .
आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत.
सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत.
‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कार मिळाले.
सी.आर.व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Mix - C. R. Vyas: http://www.youtube.com/watch?v=tIrkjXHuhAM&list=RDEMo4QrwPFd2TenRo1GtfPcVg
सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव का नाम ससुराल, हमारा नाम दामाद, पोंगा पंडित, जिसने लाहोर नही देखा या सारख्या असंख्य नाटकांद्वारे त्यांनी रंगमंचावर अक्षरशः राज्य केले.
"जहरीली हवा' हे भोपाळ विषारी वायू पीडितांवरील त्यांचे नाटकही कमालीचे गाजले. पद्मश्री, पद्मभूषण या सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले व राज्यसभा सदस्य होण्याचा मान मिळालेले तन्वर यांची नाट्य क्षेत्रातील अभिरुची उच्च कोटीची होती. प्रयोगशीलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायिभाव होता. याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. हबीब तन्वर यांचे निधन ८ जून २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.
शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.
कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.
अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.
स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.
विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.
सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.
चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.
त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे
‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
त्याच्या शायरीवर फैज व अहमद नदीम कासमीच्या भावुक व संवेदनशील शैलीचा प्रभाव होता. सामाजिक संदर्भ त्यांच्या गज़लेपेक्षा कवितेत प्रकर्षांने साकारतात. ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
अहमद फराज यांचे वडील सय्यद मोहम्मदशाह परख पेशावर विद्यापीठात प्राध्यापक होते. फराजच्या काव्यलेखनाचा आरंभ असा झाला. ते दहावीत शिकत असताना त्यांनी पहिला शेर रचला अन् तो वडिलांच्या उशाशी ठेवला.
जब कि सब के वास्ते लाये है कपडे सेल से
लाये है मेरे लिए कैदी के कंबल जेल से
१९५१ मध्ये फराज पेशावरहून कराचीला आले. एक वर्ष कराची रेडिओवर कार्यक्रम करीत होते. ती नोकरी सुटली. अन् पेशावरला परतले. अन् १९५४ साली बी. ए. करतानाच त्यांचा ‘तनहा- तनहा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी फारसीमध्ये एम.ए. केलं. अन् ते पेशावर रेडिओवर निर्माते झाले. अन् वडील सेवानिवृत्त होताच पेशावर विद्यापीठात लेक्चरर झाले. पाकिस्तान नॅशनल सेंटर इस्लामबादचे डायरेक्टरही झाले. १९८२ ला त्यांना हद्दपार करण्यात आलं तेव्हा ते लंडनला राहिले. सरकार बदलल्यावर ते पाकिस्तानात परतले. त्यांनी पाच-सहा नाटकंही लिहिली. जानाँ’, ‘बे-आवाज गली-कूचों में’ ‘नाबीना शहर में आईना’, ‘असासा’.
अहमद फराजच्या शायरी संग्रहाची नावे अशी, ‘दर्द-आशोब’,‘तनहा-तनहा’, ‘शब खून’, ‘नायाफ्त’, ‘जानाँ. ज्येष्ठ उर्दू समीक्षक शमीम हनफीच्या मते फराजच्या भाषेवर व कथनशैलीवर फारसी व क्लासिकल उर्दू गजलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा इत्यादीचे शेर फराजच्या गज़लांचे वैशिष्टय़ होते.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोडम्के जाने के लिए आ
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
‘दर्द-आशोब’ या फराजच्या पहिल्या संग्रहातील गज़ला मेहदी हसनने गाऊन जगभर पोहचवून लोकप्रिय केल्या. मेहदी हसन मात्र गज़ला गाताना शायराचे नाव अवश्य नमूद करत असत.
अहमद फराज यांचे २५ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :-लोकसत्ता/ डॉ. राम पंडित
आपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.
निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण म्हणून नूतनजी ओळखल्या जात. त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला. नूतन यांचे माहेरचे नाव नूतन समर्थ, सासरचे नाव नूतन बेहल. मिलन चित्रपटातलं 'सावन का महिना', सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' , कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी...व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसण...
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका करून गेल्या. नूतन यांचा आवाज चांगला होता; आणि स्वत:ची गाणी स्वत: गावीत असे त्यांना मनापासून वाटायचे॰ त्याच्या आईने निर्माण केलेल्या ” छबिली ” या चित्रपटात इच्छा पूर्ण झाली॰ त्याची त्यातील दोन गाणी बरीच लोकप्रिय झाली; त्यामुळेच त्यांनी सुभाष देसाई या निर्मात्याच्या मागे लागून त्याच्या ती नायिकेची भूमिका करत असलेल्या ” छलिया ” चित्रपटातील गाणी आग्रहाने, हट्ट करून गायली॰ नूतन १९५१ साली ‘ मिस इंडिया ‘ या किताबाची मानकरी ठरली होत्या॰ १९७४ मध्ये केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री ‘ पुरस्कार प्रदान केला. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti