आज हिंदी चित्रपटसृष्टीतील २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी सर्वाधिक ३,४०० गाणी लिहिल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदले गेलेले ख्यातनाम गीतकार #समीर_अंजान_पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ #समीर यांचा वाढदिवस.
“कन्नड कोकिळा" अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३७ पासून सवाई गंधर्वानी कुंदगोळ या हुबळीपासूनच्या जवळच्या गावात त्यांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाऊन गंगुबाई शिकत होत्या, त्या वेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तेथे दुसरे सहाध्यायी होते. नंतर ते गंगुबाईंचे गुरुबंधू झाले. १९३८ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाई हनगळ यांचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ साली पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे.
गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वयगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षणा नंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली.
मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक जी. एन जोशी व गंगूबाई हनगळ यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत असत. गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल यांना अनेक पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे.त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात.
गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. फक्त पाचवी शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९२ ते १९९४ त्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या. गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता.
सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.
प्रदर्शित तारीख १८ जून १९६४
राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वत: राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूर यांनी निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन के. अब्बास यांनी ‘संगम’ची कथा लिहिली. ही कथा प्रभावीपणे गुंफताना राज कपूर यांनी जी कल्पकता दाखवली, जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही.
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, कलादिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, पाश्र्वसंगीत या सर्वच आघाडय़ांवर हा चित्रपट लक्षणीय ठरला. संगममधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘मेरे मन की गंगा’ या गाण्याचा किस्सा तेव्हा खूप गाजला होता. नायिकेच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाचा बरेच दिवस होकार येत नसल्याने आरकेने म्हणे तिला तार करून प्रश्न विचारला होता, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही..’ आणि तिनेही ठसक्यात उत्तर दिलं होतं, ‘होगा, होगा, होगा!’ पुढे महान गीतकार शैलेंद्रने हे गाणं पूर्ण केलं आणि एसजेंनी त्याला सहज-सोप्या चालीत गुंफलं. गाण्यात नायिकेचा आवाज वापरण्याची कन्सेप्ट तेव्हा नवीनच होती. त्यानंतर अनेक नायिकांनी याचं अनुकरण केलं.
रफी यांनी गायलेल्या ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ने लाखो कानसेनांवर मोहिनी घातली होती. इफ्तेकार, राजेंद्र कुमार, राज मेहरा, नाना पळशीकर, ललिता पवार, अचला सचदेव आणि हरी शिवदासानी हे सहयोगी कलाकार म्हणून कामे केली आहेत. हा चित्रपट दासरी नारायण राव यांनी तेलुगू आणि कन्नड भाषांत ‘स्वप्न‘ नावाने निर्माण केला॰ हिबरू भाषेतही हा चित्रपट ‘ Desperado Square ‘ या नावाने निर्माण झाला होता. या चित्रपटाला लागणारा वेळ २३८ मिनिटे (४ तास) होता॰ याला दोन मध्यंतरे होती; आणि Interval ऐवजी First Intermission / Second Intermission असे शब्द वापरले होते. त्यामुळे एका दिवसात ४ ‘खेळ‘ दाखवणार्या चित्रपटगृहांना पहिला ‘खेळ‘ सकाळी ७ वाजता सुरू करावा लागत असे. हा ‘आरके फिल्म्स‘चा पहिला रंगीत चित्रपट॰ म्हणून त्याची जाहिरात सिलोन रेडियोवर ‘आग‘ से लेकर ‘जिस देशमे‘ तक मनोरंजन के नऊ युग थे |
अब ‘संगम‘से दसवा रंगीन युग शुरू होता है I ‘, अशी अमीन सायानीच्या आवाजात होत असे. संगमसाठी राज कपूर यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार तर वैजयंतीमाला यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाले.
या चित्रपटाची कथा अशी होती॰ एका गावात सुंदर, राधा आणि गोपाळ ही तीन मुले लहानपणापासूनच सवंगडी म्हणून एकत्र वाढत असतात॰ सुंदरचे राधावर प्रेम असते आणि त्याने तिच्याशीच लग्न करण्याचे पक्के केले असते॰ सुंदरने वेळोवेळी आपले राधावरचे प्रेम व्यक्त केलेले असते॰ मात्र, राधा मनोमन गोपाळवर प्रेम करत असते॰ अंत:र्मुख असणारा गोपाळ आपले तिच्यावरचे प्रेम कधीच बोलून दाखवत नाही॰ सुंदरची हवाई दलात निवड होते॰ तो कश्मीरात लढाईवर जातो॰ जाताना तो गोपाळकडून राधावर लक्ष ठेवण्याचे वचन घेतो॰ युद्धात सुंदरच्या विमानाला अपघात झाल्याची आणि सुंदर मृत झाल्याची बातमी येते॰ काही दिवसांनी राधा आणि गोपाळ एकमेकांवर प्रेम करू लागतात॰
अचानक सुंदर सुखरूप परत येतो॰ गोपाळ आपल्या प्रेमाचा त्याग करतो आणि राधा–सुंदरचे लग्न होते॰ सुंदरच्या गैरहजेरीत गोपाळ राधाला सही न केलेले प्रेमपत्र लिहितो॰ राधा ते आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून जपून ठेवते॰ राधा-सुंदर मधुचंद्रासाठी युरोपमधील काही देशांत फिरून येतात॰ नंतर राधा गोपाळला त्यांच्या आयुष्यातून दूर जाण्यास सुचवते॰ एक दिवस सुंदरला ते सही न केलेले प्रेमपत्र सापडते॰ मग चिरपरिचित फिल्मी नाट्य॰ सुंदर पिस्तूल घेऊन येतो, मधल्या काळात न्यायाधीश झालेला गोपाळ त्याच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून घेतो॰
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रकाश चांदे
"संगम" चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=8wSC6ti_ly4
"संगम" चित्रपटातील गाणी.
https://www.youtube.com/watch?v=MISzXVVVFUo
अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला.
मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले.
खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते. परंतु त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चार पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले.
यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली.
१८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत.
१९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली.
खाँसाहेबांना दहाबारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्य म्हणजे त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. मंडळी आहेत.
अल्लादियाखाँ यांचे १६ मार्च १९४६ रोजी निधन झाले. कोल्हापुरात देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जगातील पहिली व सर्वात चलाख महिला हेर माता हारी यांचा जन्म ७ ऑगस्ट १८७६ रोजीनेदरलँडमधील लियुवर्डेन या छोट्या गावी झाला.
गुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं. या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं!
जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!
माता हारी हे त्यांच टोपण नाव. एका डच कुटुंबात या असिम सौदर्यवतीचा जन्म झाला. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. त्यांचे सौदर्य आणि अद्कारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या. माता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.
आपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते. “माता हरी” या जर्मन सेनेकडून काम करायच्या. पहिल्या जागतिक युद्धाच्या काळात आपल्या मादक नृत्याने शत्रूसेनेतील अनेक ऑफिसर्सना भुलवून, त्यांच्याशी जवळीक निर्माण करून अत्यंत गौप्यनीय माहित गोळा करण्याचे काम माता हरी यांनी केले. प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि जर्मन सेनेला पुरवायच्या. माता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला. याच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.
माता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य! नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले. फ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहित्य पुरवतात या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हतें, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये १५ ऑक्टोबर १९१७ रोजी माता हारी यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार' प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला.
मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना पाय गमावावा लागला. त्यानंतरही त्यांनी जिद्दीने "झी टीव्ही'वरील ‘पवित्र रिश्ता' मालिकेत काम सुरू केले. 'झी' टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' ही त्यांची शेवटची मालिका होती.
अजय वढावकर यांचे २७ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला .
तीथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले.
१९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली.
जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका ,रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.
त्यांना दोन अपत्य ,आनंदशंकर व ममताशंकर.
आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.
सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.
बहुदा ती पहिली भारतीय, हॉलीवुड चित्रपटात काम करणारी कलाकार असावी.
उदयशंकर यांच्या कलेने भारतीय न्रुत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti