त्यांच्या लेखनात गुन्हेगारी थ्रिलर्स, निबंध, साहित्यिक टीका, कथा यांचा समावेश असतो. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत.
विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव आहे. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे.
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला.नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. लहानपणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच मा.वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. “राधिका’ या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत “अनोखा प्यार’मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती. नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला.
हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर त्यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले “समाधी’, “सरगम”, “मिस्टर एक्सु’, “काफिला’, “मुकद्दर’ हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या “कालापानी’ या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. "कालापानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या उत्कृष्ट सहअभिनेत्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले. मा.नलिनी जयवंत यांच्याशी अशोक कुमार यांचे संबंध असल्याचे सांगण्यात येत असे. १९५० साली हे दोघे एका चित्रपटात काम करीत असताना या अफवांना अधिक ऊत आला होता. अर्थात मधुबाला यांच्याप्रमाणेच चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर या दोघांमधील अंतर वाढले. त्याच काळात त्यांच्या भूमिकांमुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी..
पहिल्या महायुद्धात मॅडम क्युरी यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी फिरती रेडिओग्राफीची एक मोटार तयार केली आणि अनेक जखमी सैनिकांवर उपचार केले. या मोटारीकरिता लागणारी ऊर्जा रेडियम निस्सारणातून निर्माण होणा-या रंगहीन वायूमधून मिळत असे. हा वायू म्हणजे रेडॉन हे नंतर समजले.
तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .
पॅरिसमधील एका भव्य व्यावसायिक संकुलाची सजावटीत जगभरातील सात सुलेखनकाराच्या बरोबर अच्युत पालव यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून देवनागरी लिपीला पॅरिसमध्ये पोहोचवली आहे.
गोविंदा यांचे खरे नाव गोविंदा अरुण आहूजा आहे. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी झाला. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये त्यांना गोविंदा या नावाने लोकप्रियता मिळाली.
गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. नव्वद च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. गोविंदाच्या डान्सचे आजही अनेक चाहते आहेत. गोविंदाने जवळजवळ सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र गोविंदाला नीलमसोबत काम करायला अधिक आवडायचे.
गोविंदाला तिच्याशी लग्नही करायचे होते. मात्र त्यांची ही जोडी केवळ रील लाईफपुरतीच मर्यादित राहिली. गोविंदाने १९८६मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली. इल्जाम हा त्याने केलेला पहिला चित्रपट. हा चित्रपट त्या वर्षातील पाचवा सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटाच गोविंदाची हिरोईन म्हणून नीलमने काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि पाहता पाहता ही जोडी हिट झाली. लोकांनी या जोडीला डोक्यावर घेतल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स यांना आल्या.
विनोदी संवाद फेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. गोविंदाचा अभिनय, विनोदाचे टायमिंग, संवादफेक एवढेच नाही तर खास गोविंदा स्टाईल नृत्य आजही अफलातून आहे. गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. अभिनेता गोविंदा यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव नर्मदा आहे. तिने किशोर नमित कपूर इन्स्टिट्यूटमधून अभिनय क्षेत्राचा कोर्स केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. 'आला क्षण गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.
शंकर वैद्य यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे नव्या लेखक, कवींबरोबरच विद्यार्थ्यांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असायचा. केवळ कवी म्हणूनच नव्हे तर उत्तम समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही ते सर्वपरिचित होते. शंकर वैद्य यांना तल्लख स्मरणशक्तीचे वरदान लाभले होते. त्यांचे सूत्रसंचालन हा साहित्य रसिकांसाठी अवर्णनीय अनुभव असायचा. भूतकाळातील काव्य लेखनाचे अनेक किस्से ते साहित्य रसिकांपुढे जसेच्या तसे उभे करायचे. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.
२७ वर्षानंतर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रसिध्द केला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली. शंकर वैद्य यांनी काव्य विश्वात स्वत:चा अमीट ठसा उमटवला होता. शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हदयांमुधुनी अरुणोदया झाला..., स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई या त्यांच्या कविता आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. कविता, कथांबरोबरच त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतेही लिहिली होती.
"गोष्ट धमाल नाम्याची‘, "चिमणराव गुंड्याभाऊ‘ या चित्रपटांतील गीते त्यांच्या लेखणीतून उतरली होती. कवी, गीतकार, सूत्रसंचालक, उत्तम वक्ता, समीक्षक, ललित लेखक असे ते बहुपेढी व्यक्तिमत्त्व होते. मा.शंकर वैद्य यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी सॅन होजे येथील पहिल्या विश्वर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मा.शंकर वैद्य यांचे २३ सप्टेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti