सदाशिव अनंत शुक्ल यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्यात महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म २६ मे १९०२ रोजी झाला. स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.
स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्नं केला. लिखित साहित्याबरोबर स.अ. शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता.
ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले. मा.स.अ.शुक्ल हे १९६७ साली पुण्यात भरलेल्या ४८व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.स.अ.शुक्ल यांचे २७ जानेवारी १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
स.अ. शुक्ल यांची गाणी
एकटीच भटकत नदीकाठी गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
कुठला मधु झंकार गायिका श्यामा चित्तार. संगीत यशवंत देव
कुणाला प्रेम मागावे गायक मास्टर बसवराज
चकाके कोर चंद्राची गायक-गायिका - जी.एन्. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्. जोशी
चल रानात सजणा गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
जादुगारिणी सखे साजणी गायक आणि संगीत जी. एन्. जोशी
तू तिथे अन् मी इथे हा गायक-गायिका - जी.एन्. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्. जोशी
दूर व्हा सजणा येऊ नका गायक-गायिका मन्नाग डे, आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक
दे चरणि आसरा गायक राम मराठे
प्रीतिचा नव वसंत गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक
बोल हांसरे बोल प्यारे गायिका निर्मला जाधव, संगीत शंकरराव सरनाईक, चित्रपट सौभाग्यलक्ष्मी
ब्रिजलाला गडे पुरवी गायिका हिराबाई बडोदेकर, संगीत केशवराव भॊळे-हिराबाई बडोदेकर, नाटक - सं. साध्वी मीराबाई; राग मिश्र पिलू
लाविते ग सांजदिवा गायिका आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक
हले झुलत डुले पाळणा गायिका लता मंगेशकर, संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - चिमुकला पाहुणा
त्यांनी पुढे वेगवेगळ्या महिलांच्या इंग्रजी मासिकांसाठी रेखाटने केली. त्यानंतर त्यांनी ड्रेस डिझायनींगला सुरवात केली. ह्या ड्रेस डिझायनींगच्या यशामुळे त्यांना हा आपल्या करिअरसाठी वेगळा मार्ग सापडला. त्यांनी हा व्यवसाय करता करता गुरुदत्तच्या चित्रपटांसाठी ड्रेस डिझायनींग करायला सुरवात केली. गुरुदत्तच्या १९५६ साली आलेल्या सी. आय. डी. पासून त्यांच्या ड्रेस डिझयानींगला सुरवात झाली आणि त्या गुरुदत्तच्या टीमचा एक भागच बनल्या.
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते. १९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयदेव यांचा जन्म ३ आॅगस्ट १९१९ रोजी झाला. काही गाणी पहिल्या भेटीत फक्त कुतूहल निर्माण करतात.. तर काही स्लो पॉयझनिंगसारखी आपल्यात भिनत जातात. काही त्यातल्या चमत्कृतीपूर्णतेनं आपले लक्ष वेधून घेतात. तर काही आपल्या माधुर्याने गारूड करतात. अशा काही गाण्यांबद्दल आणि त्यांच्या संगीतकारांबद्दल.. त्यांतले पहिले मानाचे पान जाते ते संगीतकार जयदेव यांना!
‘ये दिल और उनकी निगाहोंके साए’, ‘मैं जिंदगी का साथ’, ‘अभी न जाओ छोडम्कर’ यांसारखी सुरेख गाणी देणारे जयदेव एक अत्यंत प्रयोगशील संगीतकार. मा.जयदेव यांचा लुधियानात बालपण आणि मुंबईत कारकीर्द असा प्रवास असणाऱ्या जयदेव यांनी चित्रपटांत अभिनय करण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘वामन अवतार’, ‘काला गुलाब’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यावर ते उस्ताद अली अकबरखाँ साहेबांकडे सरोद शिकले. ‘आँधियाँ’, ‘हमसफर’ यांसारख्या खाँ साहेबांचं संगीत असलेल्या चित्रपटांसाठी संगीत साहाय्यकाचीही त्यांनी भूमिका निभावली. दरम्यान, सचिनदेव बर्मनदादांनाही ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘कालापानी’ यांसारख्या चित्रपटांच्या संगीतात सहाय्य केलं. जयदेव यांचं उर्दू-हिंदी काव्याचं ज्ञान, अनवट संगीतरचना श्रवणीय करण्याचं कसब बर्मनदा जाणून होते आणि ही जबाबदारी म्हणूनच त्यांच्यावर सोपवीत होते. (‘कालापानी’) ही रचना खरंतर जयदेव यांची.
गायकीला वाव देणाऱ्या अनवट जागा (phrases) आपल्या गाण्यात गुंफणारे, गीताचा ढाचा (Structure) मुळापासून बदलू शकणारे जे अत्यंत मोजके संगीतकार झाले, त्यात जयदेव यांची गणना करावी लागेल. नव्हे, त्यांचे स्थान मानाचे असेल. यासाठी लागणारी प्रतिभा, काळाच्या पुढे असणारी नजर आणि सौंदर्यदृष्टी पुरेपूर होती. त्यांच्याकडे नशिबाची साथ नसेल कदाचित (नव्हतीच), पण प्रतिभेने साथ सोडली नाही. अनेक संगीतकारांचा सृजनाचा आलेख हा पुढे ओसरता उतार दाखवतो, पण एस. डी.नंतर जयदेव हे असे एकमेव संगीतकार म्हणावे लागतील की, शेवटच्या चित्रपटापर्यंत (‘अनकही’) गाण्यांचा दर्जा आणि जयदेव टच कायम होता. मानवी भावसंबंध, नात्यातली गुंतागुंत, स्वभावातले कंगोरे, काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवणं जसं कर्मकठीण, तसेच हे सगळं सुरावटीत बांधणं किती अवघड असेल. मग झाली चाल अवघड त्याला काय करणार? म्हणूनच बर्मन सल्ला देत बहुतेक की, थोडी सोपी चाल बांध! जयदेव यांच्या चाली नेहमीच वेगळ्या अर्थानी आव्हानात्मक होत्या.. जिथे जिथे त्या सोप्या करता येऊ शकल्या असत्या असं वाटतं, तिथे हा मोह टाळलेला आहे. आपल्या गळ्यातून त्या जागा अलवारपणे जाव्या याचा ध्यास लागतो, असं काही विलक्षण या चालींमध्ये आहे. पाहा ना, ‘प्रभु तेरो नाम’ (‘हम दोनो’) सारखं गाणं, पुढच्या ओळीत- ‘तेरी कृपा हो जाए’- या शब्दांना दोन वेगळ्या चाली का? याला उत्तर नाही.
अंतऱ्यात ‘हर बिगडी बन जाए’मध्ये जाऽऽए वरची तान मोत्याची लड ओघळावी, तसे अनवट स्वरसमूह घेऊन येते. केवळ अप्रतिम! या प्रकारची त्यांची कितीतरी गाणी- ‘कभी खुदपे, कभी हालात पे’ या गाण्यात या ओळीलासुद्धा लगेचच वेगळ्या चालीत गुंफले आहे. शास्त्रीय संगीतातल्या improvisation (बढत) या सौंदर्यतत्त्वाचा हा किती सुंदर आविष्कार! जयदेवजींच्या गाण्यांतल्या, मुरक्या किंवा खास (phrases) हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. काही जागा खास गायकी अंगाच्या! गमक, मींड, फिरत अशा गाणाऱ्याला स्वत:ची सारी आयुधं परजायला लावणाऱ्या जागा. किंबहुना ही आयुधं परजल्याशिवाय जयदेव यांच्या गाण्यांना हात (गळा) लावूच नये!
कितीतरी उदाहरणं ‘ये दिल और उनकी’मध्ये ‘उनकी’वरची जागा, ‘हर आस अश्कबार हैं’मध्ये ‘तेरे बगैर जिन्दगी’वरची जागा, ‘आपकी याद आती रही’मध्ये ‘आपकी’वरची मोहक करामत..
गाणं एका विशिष्ट तालात चाललेलं असतं. दादरा-केरवा आणि मध्येच एखादी ओळ त्या तालाच्या कचाटय़ातून पूर्णपणे सुटून पुन्हा, त्याच्या कवेत अलगदपणे विसावते. हे अप्रतिमच! अत्यंत कमी काळासाठी तालापासून घेतलेली ही फारकत इतकी गोड की पुन:पुन्हा गाण्याचा मोह पडावा. एखादी वेडी-वाकडी उडी मारून जिम्नॅस्टने दोन पायांवर नीट उभं राहावं, अगदी तसंच ‘तुम्हे हो ना हो’ (‘घरोंदा’)मध्ये अशी एक ओळ येते. ‘मगर फिर भी इस बात का तो यकीन है’- ‘तू चंदा मैं चाँदनी’ या गाण्यातही ‘अपने हाथों से पिया मोहे लाल चुनर ओढा’हीसुद्धा अशीच कसरत- लाजबाब.. जयदेव यांचं ‘गंधार’ स्वरावरचं विलक्षण प्रेम कधी कधी अवचित समोर येतं. कित्येक गाणी गंधाराचं प्राबल्य मुखडय़ात घेऊनच येतात. तो गंधार एखाद्या guiding star सारखा समोर येत राहतो. लुभावत राहतो. ‘आपकी याद आती रही’, ‘अल्ला तेरो नाम’, ‘सीने में जलन’ अशी कितीतरी गाणी.
गौडसारंग (‘अल्ला तेरो नाम’), धानी (‘रात भी हैं कुछ’), पहाडी (‘ये दिल और उनका’), तिलक कामोद (‘ये नीर कहाँ से बरसे हैं’), माँड (‘तू चंदा मैं चाँदनी’) असे राग भारदस्तपणे जयदेवजींच्या गाण्यांत डोकावतात, पण गाण्यांवरचा जयदेव ठसा हाच खरा त्या गाण्यांचा स्थायीभाव आहे.
काही काही स्वरसमूह जयदेवचे लाडके होते आणि विशिष्ट सेन्सुअस गाणी असली की हमखास हे स्वरांचं मोहोळ रंग जमवतं. दोन मध्यम आणि कोमल गंधाराचं हे अफलातून कॉम्बिनेशन ‘रात भी हैं कुछ, प्यास थी फिर भी तकाजा न किया’ (‘आलिंगन’), ‘जब से लगन लगायी’ (‘रेश्मा और शेरा’) या गाण्यात जादुई प्रभाव करते.
सुनील दत्तची कामुक नजर, वहिदाचं अप्रतिम सौंदर्य आणि हा स्वरसमूह यांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोमांचकारी अनुभव आहे. ‘रात भी हैं कुछ भीगी भीगी’ हा स्वरसमूह दत्ता डावजेकरांच्या ‘चांदणे फुलले माझ्या मनी’ या गाण्यातही आढळतो. डीडी आणि जयदेव हे असोसिएशन होतंच नाही. तरी गाण्यांचा पोत, त्यांचा भाव, visualisation power गाणं प्रत्यक्ष पडद्यावर न पाहता निर्माण होणारं दृष्टिचित्र याबाबतीत या दोन प्रतिभावंतांमध्ये साधम्र्य आढळतं.
गाण्याच्या बंदिस्त चौकटीत मन न रमणाऱ्यांपैकी जयदेव असल्याने अनेकदा अंतरे, मुखडा यांच्या रचनेत वेगळ्याच कल्पना साकार होतात. पहिला अंतरा सप्तकाच्या खालच्या भागात lower middle बांधणं (जे जोखमीचं ठरू शकतं) ही अशीच एक धाडसी शैली. धाडसी अशासाठी की ऐकणाऱ्याचं लक्ष गाण्यावरून उडण्याची भीती अशा वेळी असते. जयदेव यांच्या समकालीन संगीतकारांमध्ये उंच पट्टीत मुखडे-अंतरे बांधण्याची लाट येत असताना हे धाडसच.
‘पहाडों की चंचल किरन चूमती है’ (‘ये दिल और उनकी’), ‘अभी अभी तो आई हो’ (‘अभी न जाओ छोडकर’), ‘इन भूलभुलैया गलियों में’ (‘दो दिवाने शहर में’), ‘संस्कृती के विस्तृत सागर में’ (‘कोई गाता मैं सो जाता’).
जयदेवजींच्या गाण्यांत अंतऱ्याची शेवटची ओळ मुखडय़ाला अशा अजोड, अतूट धाग्याने विणलेली असते की तो ‘जोड’ खटकू नये. ही काही गाणी जयदेव साहेबांची
‘अस्मानी, या आसमानी!
अस्मानी रंग की आँखों में
बसने का बहाना ढूँढते हैं- ढूँढते है।
आबोदाना, ढूँढते है, इक आशियाना ढूँढते है’ (‘दो दिवाने’)- (‘घरोंदा’).
‘कोई मेरा सिर गोदी में रख सहलाता – मैं सो जाता- कोई गाता मैं सो जाता’ (‘आलाप’).
सगळं कसं सलग-अव्याहत. अंतऱ्यातून मुखडय़ावर आलो कसे अलगदपणे- कळणारही नाही. वाद्यवृंदाचा orchestration वापर जयदेवजींनी अगदी नेमका केल्याचं आढळतं. जयदेव यांचे निधन ६ जानेवारी १९८७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / लोकसत्ता
प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे मा.दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला. दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. दिनकर द. पाटील यांचा वडीलांना विद्यापीठ हायस्कूलचे ‘भक्ती ईश्वेराची-सेवा मानवाची’ हे ब्रीदवाक्य इतके आवडले, की त्यांनी दिनकरचे नाव त्याच शाळेत घातले. या शाळेत त्या वेळी मा.विनायक व मा.गजानन जागीरदार हे शिक्षक होते. मा. विनायक विद्यार्थ्यांना देशप्रेमाच्या कविता शिकविताना एखाद्या जहाल देशभक्ताप्रमाणे विलक्षण तेजाने तळपत. त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावली व त्यांच्यावर ‘साहित्याचे संस्कार’ घडविले. त्या काळात शाळा-कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते - वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके. विद्यापीठ हायस्कूलमधील साहित्याने झपाटलेले ‘साहित्यप्रेमी’ दर रविवारी विनायकांच्या घरी जमत. मा. विनायक त्यांना ‘किलरेस्कर’ मासिकात छापून आलेल्या फडके-खांडेकरांच्या कथा वाचून दाखवत. अशा प्रकारे दिनकरमधला साहित्यिक मा. विनायकांनी घडविला. पुढे उच्च शिक्षणासाठी दिनकरने राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे कादंबरीकार ना. सी. फडके व ‘प्रेमाचे शाहीर’ कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन त्यांना शिकवायला होते. त्यांच्या प्रेरणेने दिनकर लिहायला लागला.
राजाराम कॉलेजच्या ‘राजारामियन’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. विद्यार्थीदशेतच त्यांनी सेवक, सत्यवादी अशा कोल्हापूरच्या वर्तमानपत्रातून लिहायला सुरुवात केली आणि लवकरच ‘किलरेस्कर’ मासिकाच्या कथास्पर्धेत दिनकरला ‘एरिना’ या कथेसाठी पहिला पुरस्कार मिळून तो मान्यवर लेखक झाला. याच सुमारास दिनकर ‘शारदा मंडळ’ नावाची एक साहित्य संस्था चालवित होते. त्या संस्थेने एकदा मुलींची वक्तृत्व स्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेत मुलींच्या शाळेतली सुमन शिंदे नावाची विद्यार्थिनी पहिली आली. दिनकर ‘शारदा मंडळा’चे प्रमुख असल्यामुळे, त्यांचा सुमनशी परिचय झाला. पुढे तो इतका वाढला, की दिनकर चक्क सुमनच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले. दिनकरच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण समजले, तेव्हा ते चिडले, पण दिनकर आपल्या निर्णयावर ठाम होता, त्यामुळे वडलांनी त्याला घराबाहेर काढले. मा. विनायक यांना हे समजताच त्यांनी दिनकरला बोलावून घेतले व त्यांच्या ‘हंस पिक्चर्स’मध्ये सहायक म्हणून दाखल करून घेतले. तेव्हापासून म्हणजे, सन १९४१ पासून ते विनायकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४७ पर्यंत सुमारे सहा वर्षे दिनकर विनायकांकडे होते. विनायकांच्या ‘हंस पिक्चर्स’ चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले व पुढे नवयुग बंद पडल्यावर, विनायकांनी स्वत:ची ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ ही नवी चित्रसंस्था कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत सुरू केली.
‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे ‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ’ व ‘चिमुकला संसार’ हे चित्रपट निघाले. दुसर्या् जागतिक महायुद्धामुळे त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने प्रत्येक चित्रपट संस्थेने ‘युद्ध प्रचार’ करणारा चित्रपट काढलाच पाहिजे, असा फतवा काढला. त्या वेळी विनायकांनी ‘बडी माँ’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘भारतमाता ही आपली आई आहे व तिचे रक्षण करताना प्राणार्पण करणे हा तिच्या पुत्राचा धर्म आहे’- असा ‘बडी माँ’चा विषय होता. या चित्रपटाची गाणी इतकी चांगली होती, की त्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीच एका धनिक इसमाने तो प्रचंड किमतीत विकत घेतला. त्या पैशातून मग विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे मुंबईला स्थलांतर केले. ‘प्रफुल्ल’चा सारा स्टाफ विनायकांनी मुंबईला आणला. त्या सर्वांची त्यांनी मुंबईला नाना चौकातील शंकरशेठवाड्यात राहायची सोय केली. दिनकररावही त्यांच्याबरोबर मुंबईला आले. मुंबईत विनायक ‘प्रफुल्ल’चा ‘मंदिर’ नावाचा एक चित्रपट तयार करीत होते. याचवेळी दिनकररावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक अतिशय हृद्य प्रसंग घडला. जुन्या ‘हंस पिक्चर्स’चे व्यवस्थापक वामनराव कुलकर्णी हे विनायकरावांना भेटायला मुंबईला आले होते. तिथे त्यांना दिनकररावसुद्धा भेटले. दिनकररावांची व त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी सहज दिनकररावांना विचारले, ‘तुझ्याकडे एखादी ठणठणीत स्टोरी आहे का?
‘खणखणीत म्हणजे’? दिनकररावांनी विचारले.. ‘अरे, खणखणीत म्हणजे बंद्या रुपयासारखी वाजणारी..’ वामनराव. ‘अच्छा.ऽ म्हणजे जिच्यावर चित्रपट धंदा करेल अशी!’ दिनकरराव.
‘करेक्ट! नाही तर मग हा धंदा करायचाच कशाला?’ वामनराव.
दिनकररावांची ‘वाघ्यामुरळी’ नावाची एक ग्रामीण कथा त्या वेळी ‘किलरेस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती वामनरावांना दाखवली. त्यांना ती आवडली. त्यांना त्यांच्या ‘मंगल पिक्चर्स’ या नवीन चित्रसंस्थेसाठी पहिलाच चित्रपट काढायचा होता. या चित्रसंस्थेचे सूत्रधार होते बाबूराव पेंढारकर. त्यांनाही ही कथा खूप आवडली. इतकी की त्यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद दिनकररावांनीच लिहावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिनकरराव त्या वेळी विनायकांकडे ‘मंदिर’च्या कामात व्यस्त होते. त्यांनी विनायकांकडे पंधरा दिवस रजा मागून कोल्हापूरला जाऊन आपल्या ‘वाघ्यामुरळी’ या कथेवरून पटकथा-संवाद लिहून काढले. चित्रपटाचे नाव ठरले - ‘जय मल्हार’.
बाबूराव पेंढारकरांच्या मनात या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांनीच करावे, असे होते. बाबूरावांनी मग विनायकरावांना भेटून तशी परवानगी मागितली. कारण, दिनकरराव त्या वेळी विनायकरावांकडे काम करीत होते; पण विनायकरावांनी बाबूरावांना स्पष्ट सांगितले - ‘दिनकर माझा सहायक आहे. त्याला दिग्दर्शक मीच करणार!’ नियतीचा खेळच इतका विचित्र असतो, की विनायकरावांचे हे शब्द लवकरच निराळ्या अर्थाने खरे झाले. मंदिर पूर्ण होण्याआधीच विनायकरावांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिलेला ‘मंदिर’ पूर्ण करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकररावांवर सोपवली. आणि अशा रीतीने विनायकरावांनी आपल्या मृत्यूचे मोल देऊन आपला शब्द खरा केला. त्यांनीच दिनकररावांना दिग्दर्शक केले!
‘मंदिर’पासून दिनकरराव दिग्दर्शक झाले, तर ‘जय मल्हार’पासून ते कथा-पटकथा-संवाद लेखक झाले. ‘जय मल्हार’पासून मराठीत लावणीप्रधान ग्रामीण चित्रपटांचे युग सुरू झाले. मराठी चित्रपट समीक्षक गमतीने म्हणाले, ‘जय मल्हार’पासून मराठी चित्रपट पाटलाच्या वाड्यात घुसला!’
दिग्दर्शनाबाबतीत दिनकरराव विनायकरावांचे शिष्य होते. त्या वेळी दिग्दर्शनाच्या बाबतीत - भालजी पेंढारकर स्कूल, व्ही. शांताराम स्कूल व विनायक स्कूल ऐनभरात होते. दिनकरराव दिग्दर्शक म्हणून जरी ‘विनायक स्कूल’चे असले, तरी संवाद लिहिताना त्यांना भालजींची खटकेबाज शैली अनुकरणीय वाटली. दिनकररावांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलेय - ‘अनुकृती हा बाल्याचा, अनुरक्ती हा तारुण्याचा आणि अनुभूती हा प्रौढत्वाचा आत्मा असतो. या न्यायाने आताशा माझी म्हणून एक खटकेबाज संवादाची भाषा तयार झाली आहे. बाबांना (भालजी) ती पसंत पडली असावी. कारण, एकदा ते माझ्या माघारी बोललेले मला कुणी तरी सांगितले, बाबा म्हणाले होते - ‘माझे शिष्यत्व सांगणारे कुणी असोत नसोत; पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल, तर दिनकर पाटीलच!’
खरी गंमत पुढेच आहे. भालजींनी त्यांच्या स्वत:च्या ‘मायबहिणी’ या चित्रपटाची पटकथा-संवाद दिनकररावांना लिहायला सांगितले. (कथा भालजींची होती) इतकेच नाही, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांवरच सोपवले होते. त्यावर दिनकररावांनी गमतीने लिहिलेय - ‘एकलव्याप्रमाणे बाबांचे शिष्यत्व मी पत्करले होते खरे, माझी तयारी पाहून गुरुदक्षिणेपोटी बाबांनी माझा अंगठाच कापून मागायला हवा होता. पण तसे काही न करता या आधुनिक द्रोणाचार्याने आपले धनुष्यच मला बहाल करून टाकले होते!’ ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून दिनकररावांनी चित्रनिर्मिती सुरू केली. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन (यात दहा अनुबोधपट होते) केले. साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच म्हणावी लागेल.
पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर, प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. मा.दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मधू पोतदार
दिनकर पाटील यांचे चित्रपट
वरदक्षिणा
https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o
उमज पडेल तर
http://www.dailymotion.com/video/xv8jdm_umaj-padel-tar_people
मल्हारी मार्तंड
http://www.dailymotion.com/video/xv5iza_malhari-martand_shortfilms
जय मल्हार
https://www.youtube.com/watch?v=y49H5kUndXU
त्यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली.
जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसयाचा.
जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले. हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांपैकी अमृतानुभव भावार्थमंजिरी, पासष्टीभावार्थदीपिका, श्रीगुरूचरित्र सारामृत, श्रीगोदा महात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थबोधिनी व मंत्रार्थप्रकाशिका, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीशनिप्रताप, श्रीशंडिल्यभक्तिसूत्र भावदीपिका हे प्रमुख ग्रंथ त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष पटवितात.
“पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, “अब के हम बिछडे‘, “रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, “तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या.
दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८च्या प्रारंभी ‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले.
चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.
कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.
अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.
Copyright © 2025 | Marathisrushti