हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.
अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्याात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं.
प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलोअर' मिळाला. आजच्या पिढीला कदाचित अरुण सरनाईक हे नाव तेवढे अवगत नसेल पण ७०-८० च्या दशकात अरुण सरनाईक हे मराठीतील सुपरस्टार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला.
त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता.
"पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन' मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यनक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वेगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट
दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला !
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला.
ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.
आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायलेल्या दीदींनी त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. यासाठी मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची आभारी आहे.
रामानंद सागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले. मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले.
१९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले.
१९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखननिर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले.
कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते. १९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले.
‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली.
१९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. ‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.
फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शरद मेहेत्रे.
कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे.
कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले.
स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले.
यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज बॉलिवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले.
१९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तर'मधून मिळाली. या सिनेमातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत.
उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
पंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत.
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. २००४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले.
महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या ‘झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत ‘अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली.
१९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले. गुगलने महाश्वेता देवी यांच्या स्मृतीदिना निमित्त डुडल केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
व. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स , पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे , त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात.
Copyright © 2025 | Marathisrushti