भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले. भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
June 22, 2017
कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.
September 26, 2021
मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले.
February 29, 2024
पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. जोग, एस. सी. आर. भट, चिन्मय लाहिरी अशा संगीताभ्यासात बरेच पुढे असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संगीत अध्ययनात प्रगती करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गिंडे यांनी संगीताच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केली होती व माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. हळूहळू पं. गिंडे रातंजनकरांच्या मदतनीसाची भूमिका निभावू लागले. त्याच जोडीला त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान व उमजही वाढत होती. त्यांनीआकाशवाणीवर व वेगवेगळ्या संगीत महोत्सवांत आपल्या गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली. तसेच आपले सहाध्यायी व शिक्षक एस. सी. आर. भट यांच्या जोडीने ते ध्रुपद शैलीत जुगलबंदीही करू लागले. १९५१ मध्ये त्यांनी मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांची भारतीय शास्त्रीय संगीताविषयीची सप्रात्यक्षिक व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होती. पं. गिंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.त्यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त आयोजित समारंभास पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व व पु. ल. देशपांडे अशा संगीत साहित्य क्षेत्रातील प्रभृतींनी आपली उपस्थिती लावली होती. के. जी. गिंडे १३ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
संदर्भ:- इंटरनेट
January 3, 2017
सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.
July 29, 2021
दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पड्द्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण.
January 6, 2022
वालचंद हिराचंद दोशी सार्वजनिक बांधकाम, सागरी वाहतूक, मोटार उद्योग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील नवा कालखंड निर्माण करणारे उद्योगसम्राट! वालचंद हे एक वेगळ्या प्रकारचे उद्योगपती होते. वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ रोजी झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले.
वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-मा.वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले.
बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली.
मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये मा.वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली. ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅ्न्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला.
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅचन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली. प्रीमिअर इलेक्ट्रॉरनिक्सन, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅरक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅएन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शभन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, मा.वालचंद कूपर लिमिटेड, मा.वालचंद नगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. वालचंद हिराचंद यांचे ८ एप्रिल १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ- इंटरनेट
November 23, 2018
जन्म : २७ नोव्हेंबर १९५३
बप्पी लहिरी उर्फ़ अलोकेश लाहीडी यांचे आई आणि वडील दोघेही शास्त्रीय गायक आणि कंपोझर होते. त्यांच्याकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकलो. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. या मुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. व तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले.
डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. बप्पी लहिरींनी संधी मिळाली तेव्हा शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर गाणीही तयार केली आहेत. त्यांची डिस्कोवर आधारित गाणी बरीच लोकप्रिय झाली. बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय आहेत. १९८० च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात. बप्पी लहरी यांची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. ‘बंबई से आया मेरा दोस्त,’‘आय एम अ डिस्को डान्सर’ पासून ते ‘ऊ लाला ऊ लाला’ पर्यंत बप्पींचे गीत आजही लोकांच्या ओठांवर आहेत. काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 27, 2018
खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे.
April 27, 2022
ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्या हलचल या चित्रपटात काम करावयास दिले.
हलचल पासून कबीर बेदी यांनी आपली कारकीर्द सुरू केली. ओ पी रल्हन यांनी अमिताभ बच्चन यांना बंधे हात(१९७३) या चित्रपटात काम करावयास दिले, जेव्हा अमिताभ बच्चन यांची सुरवात होती. ‘फूल और पत्थर’च्या यशानंतर मा.ओ. पी. रल्हन याने मोठी झेप घेताना या ‘तलाश’ चित्रपटाची निर्मिती केली. प्रमुख भूमिकेत बलराज साहनी, राजेन्द्रकुमार, शर्मिला टागोर व स्वत: ओ. पी. रल्हन. तर चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांचे. यातील ‘खाई है रे हमने कसम संग रहने की’ आजदेखील तितकेच सुमधुर आहे, १९७१ चा हा चित्रपट आहे. त्याच्या पूर्वप्रसिद्धीची तयारी करताना ‘एक कोटीचा तलाश’ यावर सगळा जोर होता.
चित्रपटाच्या प्रसिद्धीत ‘निर्मिती खर्चाचा आकडा’ खेळवण्याचे हे पहिले उदाहरण. त्या काळात काही लाखांत चित्रपट निर्माण होत. (किती पैशात चित्रपट बनतो, त्यापेक्षा कसा बनतो, कोण बनवतो याला खूप महत्त्व असल्याचे ते दिवस होते.) रल्हनचे एक कोटींवर जोर देण्यामागचे कारण तोच जाणे. जास्त खर्चिक चित्रपट चांगलाच असेल असे प्रेक्षक समजतील (तशा दृष्टीने पाहतील) असा त्याचा समज असावा. एकदा चित्रपट आवडला की ‘तो किती खर्चात बनला’ व ‘तो किती रुपयांत आपण पाहतोय’ याला आपला चित्रपट प्रेक्षक फारसे महत्त्व देत नाही.) ‘तलाश’चे मुख्य चित्रपटगृह अप्सरा होते, तेथेच प्रीमियर झाला. ओ पी रल्हन यांचे १२ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti