(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पत्रकारितेतील गुरु जोसेफ पुलित्जर

    पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात.

      April 11, 2022


  • आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित

    "देवकी पंडित"....मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव.....सारेगमप मधला त्यांचा "पण" नेहमीच अचूक असयचा.....एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला.
    आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार....आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी व्यासपीठावर गाणे गाऊन श्रोत्यांच्या ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. सुरांच्या काटेकोरपणाबद्दलचा त्यांचा आग्रह, परखडपणा हे त्यांचे वैशिष्टय़ असूनही सामान्य रसिकांच्या मनात स्थान मिळविणारे हे नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी सुरुवातीला आपली आई उषा पंडित यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या. पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे. तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. ‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी पंडित या घराघरांत पोहचल्या. ‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकी पंडित यांच्या मधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    देवकी पंडित यांनी गायलेली काही गाणी
    जाळीमधी झोंबतोया गारवा
    तुम्ही जाऊ नका हो रामा
    वादळे उठतात किनारे
    सप्तसुरांनो लयशब्दांनो जगेन
    सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा
    माझी उदास गीते तू ऐकतोस

    https://www.youtube.com/shared?ci=e-aIoBrIpJY

    https://www.youtube.com/shared?ci=JB8x9xCvQmc

    https://www.youtube.com/shared?ci=0xW4b9zNlc4

      March 6, 2017


  • संगीतकार व गायक शंकर महादेवन

    प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.

    भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.

    संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला. केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली.

    संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.

    १९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

      March 4, 2017


  • कविवर्य प्रा. शंकर वैद्य

    ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’,‘शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा’, ‘पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई’ अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर अनेक दशके गारूड करणारे प्रा. शंकर वैद्य यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच कवितेची गोडी लागली.

      June 15, 2021


  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे

    आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.

    अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅनव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅान्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.

    विनय आपटे यांची गाजलेली नाटके.
    रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
    विनय आपटे यांचे गाजलेले चित्रपट.

    एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 7, 2021


  • कमर जलालाबादी

    ओमप्रकाश भंडारी हे कमर जलालाबादी यांचे मूळ नाव. अमृतसरनजीकचे जलालाबाद हे त्यांचे मूळ गाव. कमर यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. लहानपणी त्यांच्या या छंदाला वेडेपणा म्हणून हिणवण्यात आले. मात्र अमर नावाच्या एका शायराने कमर यांच्या शब्दांतील जादू हेरली. त्यांनी कमरच्या काव्यलेखनाला प्रोत्साहन दिले. कमर शिक्षणासाठी लाहोरला गेले. शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेकडे ओढा वाढला. लाहोरच्या अनेक नियतकालिकांतून त्यांची मुशाफिरी चाले. मात्र चित्रपटांचे वेड आणि आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच मनासारखे लिखाण करता यावे, यासाठी त्यांनी स्वत:चे ‘स्टार’ नावाचे चित्रपटविषयक साप्ताहिक सुरू केले. मात्र चित्रपटांबद्दल लिहिण्यापेक्षा चित्रपटांसाठी लिहावे, ही ईर्षा वरचेवर उचंबळून येत होती. चित्रपटाच्या या वेडानेच पुढे त्यांना पुण्यात आणले. दलसुख पांचोली तेव्हा ‘जमीनदार’ नावाच्या चित्रपटात व्यग्र होते. त्यांनी कमरविषयी ऐकले होते. ‘जमीनदार’च्या गीतलेखनाची जबाबदारी त्यांनी कमरवर टाकली. कमरने मग ‘दुनिया मे गरीबों को आराम नहीं मिलता...’ अशा आशयघन गाण्यातून सर्वांना बेचैन केले. या संधीने कमरला चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. कमर या प्रतिभावंताला मग विष्णुपंत दामले-फत्तेलाल-व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात फिल्म्स’मध्ये संधी मिळाली. ‘चाँद’ या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी केले. ‘चाँद’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुस्नलाल-भगतराम या पहिल्या संगीतकार जोडीने दिलेले संगीत. यातील ‘दो दिलों को ये दुनिया मिलने नहीं देती’, ‘मेरे दिलरुबा आ जा’ आणि ‘ए दिल मुझे रोने दो’ ही कमर यांची गाणी चांगलीच गाजली. नंतर ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांसाठी कमर यांनी संवाद, गीतलेखन केले. ‘प्रभात’च्या अस्तानंतर कमर यांचे सूर जुळले ते फेमस स्टुडिओशी. ओघवती शैली, सरळसाधे परंतु काळजाला भिडणारे शब्द, भाव-भावनांना उपमांनी सजवलेला साज व त्यातून सहज लयीत गुंफलेल्या शाब्दिक फुलो-यातून रसिकांच्या हृदयाला घातलेला हात हे कमर जलालाबादी या शायराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य. इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, बहते हुए आँसू रुक न सके, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा..(प्यार की जीत)मधली प्रेमभंगाची भावना, त्याच चित्रपटातले ओ दूर के जानेवाले वादा न भूल जाना, रोते हुई अंधेरी तुम चांद बन के आना...मधली प्रेमाची भावना हीच तर आहे कमर यांच्या लेखणीची जादू. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी कमर यांची वेव्हलेंथ ख-या अर्थाने जुळली होती. पिया पिया न लागे मोरा जिया(फागुन), मैं सोया अंखियाँ मीचे, तेरी जुल्फों के नीचे, इक परदेसी मेरा दिल ले गया (फागुन), छून-छून घुंगरू बोले (पतंगा), छोटा सा बलमा, मैं बंगाली छोकरा, मेरा नाम चिन-चिन चू (हावडा ब्रीज), आइए मेहेरबां बैठिए जानेजां (हावडा ब्रीज), रुक रुक कहा चली दीवानी अशा अनेक माइलस्टोन गीतरचना कमर-ओपी या कॉम्बिनेशनचे प्रत्यंतर देतात. ओपींनंतर कमरचे सूर जुळले ते संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याशी. डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा, छलिया मेरा नाम, मेरे टूटे हुअेा दिल से, तेरी राहों में खडे हैं (छलिया), मै तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार न कर (हिमालय की गोद में), तुम ही मेरे मीत हो (प्यासे पंछी), दीवानों से ये मत पूछो (उपकार) अशी अनेक अवीट गोडीची गाणी या कॉम्बिनेशनने दिली. ‘शहीद भगतसिंग’मध्ये सरफरोशी की तमन्ना... सारखे देशभक्तिपर गीत लिहिणा-या कमर यांनी हमने तेरी जफा का वफा नाम रख दिया (चले हैं ससुराल) असा टोकाचा भावही अनेक गाण्यांतून व्यक्त केला. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या गीतरूपी चांदण्यातून कमर जलालाबादी यांच्या गाण्यांनी नेहमीच रसिकांच्या मनाला शीतलता दिली. मात्र प्रेमात धोका देणा-यांना खडसावण्यात त्यांच्या लेखणीने कधीच कसूर केली नाही. दोनों ने किया था प्यार मगर, मुझे याद रहा तू भूल गयी (महुआ) अशा कमर म्हणजे चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्रमा. चंद्राची शीतलता, चंद्राला ग्रहण लागल्यानंतरचा विरक्त भाव, टिपूर चांदण्यातील प्रेमळ झुळूक आणि अर्थपूर्ण गीतांतून चंद्रप्रकाशाचा हवाहवासा शिडकावा कमर जलालाबादी यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवाला येतो. ‘कमर’ यांच्या गीतांच्या चांदण्याने रसिकांच्या मनाचे अंगण नेहमीच चमकत राहील. ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे गाणे अजून ही एक तारखेला रेडीओ सिलोन वर लागते. ते गाणे मा.कमर जलालाबादी यांचेच. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेल्या आणि किशोरकुमारच्या आवाजाने नटलेल्या या गाण्याचे रसिकांच्या मनात वेगळे स्थान आहे. रसिकांच्या मनातील भाव-भावनांना सोप्या, आशयसंपन्न शब्दांत गुंफणारा गीतकार हीच कमर जलालाबादी यांची खरीखुरी ओळख होती. कमर जलालाबादी यांचे निधन ९ जानेवारी २००३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट / अजय कुलकर्णी

      January 11, 2017


  • क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई स्मृतिदिन

    १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.

      July 2, 2021


  • दाते पंचांग’चे मोहन दाते

    सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. आता ‘दाते पंचांग’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या पंचांगाची धुरा नाना दाते यांचे नातू आणि पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांचे पुत्र मोहनराव दाते यांच्यावर आहे. १९७७ सालापासून मोहनराव दाते या व्यवसायात आहेत. १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. त्यांचा जन्म ११ जुलै १९५४ रोजी झाला. पंचांग कार्यात अधिकारवाणीने भाष्य करणारी व्यक्ती म्हणून मोहनराव दाते यांनी नावलौकिक प्रश्नप्त केला आहे. मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल नुकतीच दिल्लीच्या ‘जैन प्रश्नकृत भाषा भवन’ या संस्थेने घेतली आणि मोहनराव दाते यांची आचार्य कुंदकुंद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या आधी सोलापूरचे डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांची त्यासाठी निवड झाली आहे. जैन समाजाशी संबंधित असलेल्या संस्थेने पंचांगक्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल घेऊन कुंदकुंद पुरस्कारासाठी त्यांची निवड केली हे विशेष. एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे येत्या ३ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात आचार्य श्री विद्यानंदजी आणि बेळगावचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित बाहुबली उपाध्ये यांच्या उपस्थितीत मोहनरावांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित आदी विषयातील लोकोपयोगी अभ्यासासाठी आणि या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मोहनरावाची या पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थच मानावी लागेल. यंदाच्या वर्षी २१ जून रोजी ज्योतिषी म. दा. भट गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. आता कुंदकुंद पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मोहनराव दाते यांनी ‘दाते पंचांग’ लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग, कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. पंचांगकर्ते कै. लक्ष्मणशास्त्री दाते, कै. धुंडीराजशास्त्री दाते, कै. श्रीधर लक्ष्मण दाते यांनी लोकप्रिय केलेले ‘दाते पंचांग’ आता मोहनराव दाते यांनी आणखी लोकप्रिय केले आहे. मोहनरावांच्या समवेत त्यांचे पुत्र ओंकार आणि श्रीधर लक्ष्मण दाते यांचे पुत्र विनय हेही या क्षेत्रात आहेत. पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेऊन वेबसाइटच्या माध्यमाद्वारेही पंचाग सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पंचागकर्ते दाते करीत आहेत. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी. लहानपणापासून घरातील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले मोहनराव दाते सोलापूरच्या समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. सध्या ते या बँकेचे संचालक आहेत. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या कार्याशीही ते संबंधित आहेत. सोलापूरच्या नावलौकिकात ज्यांनी भर टाकली आहे त्यात पंचांगकर्ते दाते यांचे नाव कित्येक वर्षापासून अग्रणी आहे. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनीही त्या लौकिकात आणखी भर टाकली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 17, 2017


  • वारकरी संप्रदायाचे सोनोपंत दांडेकर

    सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

      July 29, 2021


  • मराठी लोकशाहीर अमर शेख

    *आज २० ऑक्टोबर *
    आज ख्यातनाम मराठी लोकशाहीर मा.अमर शेख यांची जयंती
    जन्म:- २० ऑक्टोबर १९१६
    मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
    कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे मा.अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.अमर शेख यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश

      October 20, 2016